मऊ आणि मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? असे केस तर सर्वांनाच हवे असतात. त्यासाठी अनेकदा पार्लरमध्ये जाऊन केसांना स्पा करणे अथवा कलरिंग करणे, स्ट्रेटनिंग करणे असे अनेक प्रकार करण्यात येतात. पण तुम्ही घरच्या घरी मेंदी लाऊनही केस अधिक मऊ आणि मुलायम करू शकता. पण काही जणांना मेंदी नक्की कशी भिजवायची हेच माहीत नसतं. मेंदी कशीही भिजवली गेली तर त्याचा हवा तसा योग्य परिणाम केसांना मिळत नाही आणि मग केस खराब होतात अथवा मेंदीने केस लाल होतात असं सर्वांना वाटतं. पण मेंदी भिजवण्याचे एक टेक्निक असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही मेंदी भिजवून केसांना लावली तर तुम्हाला नक्की मऊ आणि मुलायम केस मिळतील. केवळ पांढरे केस काळे करण्यासाठीच मेंदी लावली जाते असं नाही तर केसांची काळजी घेण्यासाठीही मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा उपयोग कोंडा आणि केसगळती थांबविण्यासाठीही होतो. त्यामुळे मेंदी कशी भिजवायची आणि त्याचा कसा उपयोग करायचे ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
मेंदी लावण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा केसांना गरम तेलाचा मसाज करणे अत्यंत आवश्यक आहे. हेअर मसाज करण्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑईल अर्थात एरंडाचे तेल, नारळाचे तेल आणि टी ट्री ऑईल मिक्स करून घ्या आणि तेल गरम करून झाल्यावर ते कोमट होऊ द्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांचा मसाज करा. मसाज केल्याने केस अधिक मजबूत राहतात. तेलाने मसाज करून साधारण एक तासानंतर केस व्यवस्थित माईल्ड शँपूने धुवा.
केस आयुष्यभर दाट आणि काळे राहण्यासाठी मेंदीमध्ये करा हे तेल मिक्स
केसांसाठी जेव्हा मेंदी भिजवता तेव्हा त्यामध्ये रिठा पावडर, आवळा पावडर, शिकेकाई पावडर, 3 अंड्यांंचा पिवळा भाग, थोडीशी कॉफी पावडर अथवा चहाची पावडर या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. केसांना मऊपणा आणि मुलायमपणा देण्याचे काम अंडे आणि रिठा, आवळा आणि शिकेकाई पावडर करते. तर कॉफी अथवा चहा पावडरचा यामधील समावेश केसांना उत्तम नैसर्गिक ब्राऊन रंग देण्याचे काम करतो. मेंदीमुळे केस लालसर व्हायला नको असतील तर तुम्ही कॉफी अथवा चहा पावडर घाला. तसंच यामुळे केस अधिक मऊ आणि मुलायम होऊन केसांना चांगले पोषणही मिळते.
हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या
मेंदी लावण्याची योग्य पद्धतही अनेकांना माहीत नसते. केसांना मेंदी कशी लावायची तेही जाणून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक