वय कोणतेही असो ‘फॅशन’ ही कोणत्याही वयात करता येण्यासारखी असते. पण फॅशन करताना काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागते. एखादा ट्रेंड आला आहे. म्हणून तो करायलाच हवा असा विचार करताना काही गोष्टींचा विचार करणेही तितकेच गरजेचे असते. उदा. तुमची उंची, जाडी,वय, प्रोफेशन या सगळ्याचा विचार करणे गरजेचे असते. विशेषत: उंची कमी असेल अशा व्यक्तींना काही कपडे निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते. उंची कमी असणाऱ्या मुलींनी नेमकी कशी फॅशन करावी. त्यांच्यासाठी आम्ही काही फॅशन टिप्स काढल्या आहेत.जर तुम्ही कोणतेही कपडे घेताना किंवा एखाद्या खास समारंभासाठी तयार होताना तुम्ही अशा पद्धतीने थोडासा विचार केला तर उंची कमी असूनही तुम्ही चारचौघात उठून दिसाल याची खात्री आम्हाला आहे.
सध्याचा ट्रेंड पाहता लाँग मॅक्सी वेअरची फॅशन फारच चलती आहे. कोणत्याही फॉर्मल फंक्शनपासून ते ट्रेडिशनल इव्हेंटपर्यंत अगदी कोणत्याही प्रसंगी हे लाँग ड्रेस घालता येतात. उंची कमी असली तरी देखील तुम्हाला असे लाँग ड्रेस घालता येतात. कोण म्हणत उंची कमी असेल तर असे ड्रेस घालता येत नाही. उलट तुम्ही काही टिप्स लक्षात घेतल्या तर तुम्ही अशा ड्रेसमध्ये छान उंच दिसता. जाणून घ्या त्यासाठी काही खास टिप्स
उंची कमी असलेल्या सगळ्या मुलींनी लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे प्रिंट्सची निवड. भल्या मोठ्या प्रिंटस आणि काठ असलेल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसत नाहीत. त्यामुळे कपड्यांवर कधीही मोठ्या डिझाईन्स किंवा प्रिंटस निवडू नका. अगदी नाजूक आणि कमीत कमी अशा प्रिंट्सची निवड करा. त्यामुळे तुम्ही अधिक उंच दिसता. जर तुम्ही मोठ्या प्रिंट्स घेतल्या तर त्या तुम्हाला पूर्ण झाकोळून टाकतात.
लाँग ड्रेस म्हटले की, ते पायघोळ आणि घेरदार असावे असे अनेकांना वाटते. पण जर लाँग ड्रेस जास्त घेरदार असतील तर त्यामुळे तुमची उंची ही फारच कमी दिसते. तुम्ही त्या घेरमध्ये पूर्णपणे बुडून जाता. त्यामुळे घेर थोडासा कमी असलेले कपडे निवडा.
उदा. लेहंगा हा घेरदारच असतो. पण उंची जर जास्त दाखवायची असेल तर तो लेंहगा थोडा कमी घेरदार करा. म्हणजे तुम्हाला चालता ही येईल आणि त्यामुळे तुम्ही ग्रेसफुलही दिसाल.
उंची कमी असो वा जास्त हिल्सच्या चपला घालायला अनेकांना आवडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या हिल्समुळे उंची छान उठून दिसते.उंची उठून दिसणे हे जरी हिल्सच्या चपलांचे काम असले तरी त्यांची निवडही उंची कमी असणाऱ्यासाठी योग्य करणे फार गरजेचे असते. जर तुम्ही चुकीच्या चपलांची निवड करत असाल तर तुम्ही या चपला उंची वाढवण्यासाठी घातल्या असेच लक्षात येईल.
काही जणांना उंच चपला जितक्या उंच तितकी उंची जास्त दिसेल असे वाटते. पण असे करणे काही कपड्यांच्या दृष्टिकोनातून चुकीचा निर्णय आहे. कारण असे अति उंच हिल्स निवडल्यानंतर तुमची उंची ही कमी आहे हे लक्षात येते. तुम्ही उंची वाढवण्यासाठी उगीचच हिल्सचा वापर करत आहात हे यामुळे लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही हिल्स निवडताना फार उंच निवडायला जाऊ नका.
अनेकांना हिल्स घालायचे इतकेच माहीत असते. पण हिल्समध्ये वेगवेगळे प्रकार असतात हे प्रकार जाणून घेऊन त्यानुसार त्यांची निवड करायला हवी. स्टिलेटोस हा हिल्सचा प्रकार उंच असतो. तो छट्या कपड्यांवर किंवा टाईट पँट्सवर चांगले दिसत नाहीत. अशा कपड्यांवर तुम्हाला जर हिल्स घालायचे असतील तर तुम्ही हल्ली येणाऱ्या उंच बुटांचा पर्याय निवडा. प्लॅटफॉर्म हिल्स हा प्रकार अशा कपड्यांवर अधिक चांगला दिसतो. त्यामुळे हिल्सची निवड ही देखील फार महत्वाची आहे.
ऑफिस किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी ज्यावेळी फॉर्मल कपडे घालायची वेळ येते अशावेळीही कपड्यांची निवड फार महत्वाची असते. कारण अशा कपड्यांमध्ये उठून दिसायचे असेल तर ते कपडेही फार विचारपूर्वक निवडायचे असतात.
फॉर्मल स्कर्ट हा अनेक जणांना घालायला आवडतो. या कपड्यांमुळे फिगर छान उठून दिसते. पण हाच स्कर्ट जर तुम्ही थोडासा चुकीच्या पद्धतीने घातला तर मात्र तो तुम्हाला थोडा विचित्र दिसू शकेल. शॉर्ट स्कर्टने उंची उठून दिसते असे जर तुम्हाला वाटत असेल तर असे मुळीच नाही. कारण अशामुळे तुम्ही अधिक बुटके दिसता. त्यामुळे हे टाळायचे असेल तर तुम्ही गुडघ्याच्या खाली असलेला स्कर्ट घाला. त्यामुळे तुम्ही उंच दिसाल. शिवाय या कपड्यांवर तुम्ही साधारण इंचभर उंच हिल्स घातल्या तरी त्या तुम्हाला जास्त शोभून दिसतील.
फॉर्मल पँट्स या बॉटम आणि थोड्या सैल फिटिंगमध्येही मिळतात. जर तुम्हाला उंच दिसायचे असेल तर तुम्ही बॉटम असलेल्या घोळदार पँट घालू नका. त्यामुळे तुम्ही अशा वेळी कमी बॉटमच्या पँट निवडा. त्यामुळे तुम्ही उंच दिसता. अगदीच स्किनी पँट निवडू नका. कारण जर तुम्ही बारीक असाल तर खूपच बारीक दिसाल आणि जाड असाल तर अशा टाईट पँट तुम्हाला जाड दिसतील.
फॅशन अॅसेसरीज या तितक्याच महत्वाच्या असतात. कारण उंची कमी असली की, बांधा हा आपोआपच कमी असतो. अशावेळी तुम्ही फार मोठ्या ज्वेलरी घालून चालत नाही. ज्वेलरी अर्थात त्यामध्ये फक्त कानातले किंवा गळ्यातले आले नाही. तर तुम्ही निवडत असलेल्या टोपीपासून ते पायांच्या अँकलेटपर्यंत तुम्ही काय घालायला हवं याचं भान तुम्हाला हवं म्हणजे तुमची उंची उठून दिसेल.
तुम्हाला हेवी ज्वेलरी आवडत असली तरी देखील तुम्ही अशा ज्वेलरी घालणं टाळा. कारण हेव्ही ज्वेलरीमध्ये तुमचे संपूर्ण शरीर भरुन जाते. त्यामुळे फक्त ज्वेलरी दिसते. तुम्ही कुठेही दिसत नाही. फॅशनमध्ये कितीही मोठ्या नथी असल्या तरी देखील तुमच्या चेहऱ्याला शोभेल इतक्याच आकाराची नथ निवडा तरच ती तुम्हाला अधिक खुलून दिसेल आणि तुम्ही उठून दिसाल. नथीचा साज कॅरी करताना तिचा आकार हा देखील महत्वाचा आह
उंची कमी असली की, तुम्हाला नाजूक डिझाईन निवडण्याची उत्तम संधी मिळते. त्यामुळे ही संधी मुळीच घालवू नका. तुमच्यासाठी नाजूक डिझाईन्स निवडा. फुलं, पानं यांच्या नाजूक नक्षी तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही जर सिमेट्रिकल अशा प्रकारच्या ज्वेलरी निवडत असाल तरी काही हरकत नाही. पण त्याचा आकार लहान असू द्या. बेल्ट, हॅट, अँकलेट या सगळ्या गोष्टी घालताना त्या नाजूक असल्या की तुमची उंची उठून दिसते. तुम्ही एखादी फॅशन मुद्दाम केली आहे असे मुळीच जाणवत नाही.
साडी म्हटली की, अनेकांच्या डोळ्यात चांदण्या चमकतात. कारण साडी हा अनेकांचा आवडता पेहराव. उंची कमी असेल तर साड्यांची निवड कशी असावी यासंदर्भात आपण आधीही जाणून घेतले आहे. पण साडीवरील ब्लाऊज हा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे साडीची आवड लक्षात घेत लग्नात आणि इतर वेळी साडी ब्लाऊज निवडताना तो कसा असावा ते जाणून घेऊया.
साडी नेसल्यानंतर आपोआपच उंची वाढते. कारण साडीमध्ये तिच जादू असते की, ती कोणालाही शोभून दिसते. पण साडीवरील ब्लाऊज शिवताना नववधूंना वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न शिवायचे असतात. जो नवा ट्रेंड असेल तो वापरुन पाहायचा असतो. पण असे करताना तुम्ही भरपूर लांब हाताचे किंवा तोकड्या हाताचे ब्लाऊज शिवू नका. कारण लांब हाताच्या आणि तोकड्या हाताच्या ब्लाऊजमुळे तुमच्या हातांची उंची लक्षात येते. जर तुम्ही कोपऱ्यापर्यंत त्याची लांबी घेतली तर तुमची उंची कमी आहे असे मुळीच जाणवणार नाही. शिवाय तुम्ही जर थोड्या प्रकृतीने जास्त असाल तर ते देखील दिसणार नाही.
उंची कमी असो वा जास्त कपड्यांची फिटिंग ही कोणासाठीही फारच महत्वाची असते. आज आपण उंची कमी असलेल्यांसाठी फॅशन हॅक पाहात आहोत. त्यामुळे कपड्यांच्या फिटिंग संदर्भात काही गोष्टी जाणून घेणे फारच महत्वाचे असते त्या कोणत्या जाणून घेऊया
आता काही गोष्टी लक्षात घेत तुम्ही जर हा ट्रेंड कॅरी केला तर उंची कमी असली तरी देखील तुम्ही दिसाल त्या कपड्यांमध्ये एकदम परफेक्ट