हिवाळ्यात मुलांना नका देऊ हे पदार्थ, येऊ शकतं आजारपण

हिवाळ्यात मुलांना नका देऊ हे पदार्थ, येऊ शकतं आजारपण

लहान मुलांच्या आहाराबाबत नेहमीच सावध राहायला हवं. मात्र हिवाळ्यात त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या काळात चुकीचे पदार्थ खाण्यामुळे त्यांना आजारपण येऊ शकतं. लहान मुलांसाठी हिवाळ्यात कोणते पदार्थ खाणं योग्य आणि कोणते पदार्थ खाणं अयोग्य हे प्रत्येक पालकांना माहीत असायला हवं. कारण या काळात छोट्या चुकीमुळेही मुलांना सर्दी, खोकला, ताप, कान दुखणे, जुलाब असे त्रास होऊ शकतात.यासाठीच जाणून घ्या हिवाळ्यात लहान मुलांना कोणते पदार्थ खाण्यास देऊ नयेत.

तेलकट पदार्थ -

तेलकट अथवा तूपकट पदार्थ खाण्यामुळे लहान मुलांच्या छातीत कफ तयार होतो. हिवाळ्यात असं झाल्यास त्यांना सर्दी, तापाचा धोका जास्त वाढतो. यासाठीच हिवाळ्यात मुलांना तेलकट पदार्थांपासून दूर ठेवावे. या काळात लहान मुलांचा स्वयंपाक करताना कमीत कमी तेलाचा वापर करून पदार्थ बनवा. ज्यामुळे त्यांना असा त्रास होणार नाही. 

गोड पदार्थ -

लहान मुलांना चॉकलेट, कॅंडी, केक असे गोड पदार्थ खूप आवडतात. पण अती गोड पदार्थांमुळे त्यांच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना इनफेकक्शन होण्याचा धोका असतो. म्हणूनच लहान मुलांना थंडीमध्ये जास्त गोड पदार्थ खाण्यास देऊ नका. शिवाय अती गोड पदार्थ खाण्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाही वाढण्याची शक्यता असते. तेव्हा असे पदार्थ मुलांपासून दूर ठेवणेच फायद्याचं ठरेल.

मासे आणि मटण -

लहान मुलांची पचन शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असते. शिवाय हिवाळ्यात अन्न पचण्यास सर्वांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. जर या काळात मुलांनी असे पदार्थ खाल्ले आणि ते योग्य प्रकारे पचले नाहीत. तर मुलांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू होतो. शिवाय या पदार्थांमुळे मुलांच्या शरीरात कफ प्रवृत्ती वाढते. यासाठीच मुलांना थंडीच्या  दिवसांमध्ये अधिक मटण आणि मासे खाण्यास देऊ नयेत.  

हिस्टामाईन असलेले पदार्थ-

मेयॉनीज हा पदार्थ आजकाल लहान मुलांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये गेला आहे. सॅंडविज, बर्गर, पिझ्झा सारख्या अनेक पदार्थांमध्ये मेयॉनीज वापरलं जातं. मुलांना असे पदार्थ खाणं आवडतं पण ते त्यांच्यासाठी मुळीच योग्य नाहीत. याचं कारण असं की मेयॉनीजमध्ये हिस्टामाईन भरपूर प्रमाणात असते. वास्तविक ते तुमच्या शरीरासाठी चांगले असले तरी थंडीत ते तुमच्या समस्या वाढवू शकते. यामुळे लहान मुलांच्या शरीरात सर्दी पकडते. घसा खवखवणे किंवा घसा बसणे असे त्रास यामुळे होऊ शकतात. मेयॉनीजप्रमाणे ताक, लोणचं, मशरूममध्येही हिस्टामाईन भरपूर असतं.

डेअरी प्रॉडक्ट -

हिवाळ्यात मुलांना चीझ, पनीर सारखे डेअरी प्रॉडक्टदेखील खाण्यास देऊ नयेत. याचं कारण अशा पदार्थांमध्ये अॅनिमल प्रोटिन्स असतात. जे लहान मुलांसाठी हिवाळ्यात त्रासदायक ठरू शकतात. अशा पदार्थांमुळे मुलांना छातीत कफ साठण्याचा त्रास होतो. थंडीमुळे हा त्रास वाढून इनफेक्शन होऊ शकतं. मात्र असं असलं तरी दररोज एक कप गाईचं दूध मुलांना देण्यास काहीच हरकत नाही मात्र तेदेखील जास्त प्रमाणात देऊ नये. 

हिवाळ्यात लहान मुलांना कोणते पदार्थ खाण्यास द्यावे -

  • काही पदार्थ मुलांना तुम्ही हिवाळ्यात खाण्यास देणं गरजेचं आहे. कारण हे पदार्थ तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.
  • हंगामी फळे हिवाळ्यात आवर्जून लहान मुलांना द्यावी. कारण त्यामधून तुमच्या मुलांना पुरेसं  व्हिटॅमिन सी, प्रोटिन्स आणि फायबर्स मिळतात
  • बदाम, काजू आणि अक्रोड हे तीन प्रकारचे सुकामेवा मुलांच्या आहारात समाविष्ट करा. कारण मुलांचे योग्य पोषण होते.
  • सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या हिवाळ्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे या काळात हिरव्या भाज्या मुलांनी खायलाच हव्या. 
  • हिवाळ्यात मुलं पाणी कमी पितात. त्यामुळे सतत त्यांना पाणी पिण्यास द्यावे जेणे करून त्यांचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm