नवीन वर्ष म्हणजे नवा उत्साह, नवीन आशा आणि जगण्याची नवी उमेद... मग या उत्साहाला खतपाणी घालण्यासाठी स्पेशल दिसणं हे ओघाने आलंच. प्रत्येक वर्षी अशा प्रकारे फॅशन आणि मेकअपचे नवीन ट्रेंड फेमस होत असतात. कारण प्रत्येकाला येणाऱ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्पेशल आणि हटके दिसायचं असतं. हेअर कट (Haircut)चा लुकमध्ये सर्वात मोठा वाटा असतो. कारण फक्त हेअरकट करूनही तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे दिसू शकता. यासाठीच जाणून घ्या येणाऱ्या नवीन वर्षी कोणकोणते हेअरकट ट्रेंड (Haircut Trands in 2021) मध्ये असतील.
ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार होताना बॅग्स हेअरकट करावा. कुरळे कसे मेंटेन करावे अथवा अशा केसांची कशी स्टाईल करावी असा प्रश्न तुम्हाला नेहमी सतावत असतो. अशावेळी हा हेअरकट तुम्हाला एक परफेक्ट लुक देईल. ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या आणि हटके दिसाल. कुरळ्या केसांसाठी यंदा हा हेअरकट नक्कीच ट्रेंडमध्ये असेल.
जर तुम्हाला हेअरकट करताना नॅचलर बॅंग्ज अथवा फ्रिंज हवे असतील तर तुम्ही असा हेअरकट यंदा करू शकता. ज्यामुळे तुमचा लुक नैसर्गिक पद्धतीने बदलून जाईल. हेअरकट केल्यावर जसजसे तुमचे केस वाढू लागतील तुमचा हेअरकट तितका अधिक सुंदर दिसेल. ज्यांचा चेहरा गोलाकार आहे अशा मुलींवर हा हेअरकट अधिक चांगला दिसतो. त्यामुळे यावर्षी हा हेअरकट नक्कीच ट्राय करा.
केस लांबसडक असावे असं प्रत्येकीला वाटत असतं. मात्र लांब केसांची अधिक निगा राखावी लागते. आजकालच्या धावपळीच्या काळात इतका वेळ केसांसाठी देणं नक्कीच शक्य नसतं. म्हणूनच अनेकजणी शॉर्ट हेअरकट करणंच पसंत करतात. यंदा शॉर्ट केसांमध्ये ब्लंट हेअरकटचा ट्रेंड असणार आहे. तेव्हा तुम्हीदेखील शॉर्ट ब्लंट ट्राय करा आणि प्रोफेशनल दिसा.
जर तुम्ही लांब केसांची योग्य निगा राखू शकत असाल आणि तुमच्याकडे त्यासाठी पुरेसा वेळ असेल तर तुम्ही तुमचे केस लांबदेखील ठेवू शकता. लांब केसांसाठी तुम्ही वन लेंथ हेअरकट ट्राय करू शकता. लांब असूनही केसांना स्टायलिश लुक देण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. शिवाय तुमचा लुकही यामुळे पूर्णपणे बदलून जाईल. लांब केसांसाठी हा हेअरकट यंदा चांगलाच ट्रेंडमध्ये असेल.
लेअर्सची फॅशन कधीच जात नाही. तुमचे केस लांब असतील तर हादेखील ऑप्शन तुमच्यासाठी चांगला आहे. शिवाय तुमचा चेहरा कोणत्याही आकाराचा असेल तुमचा स्कीन टोन कोणताही असेल तरी तुम्ही हा हेअरकट करू शकता. मात्र यंदा लेअरकट करताना त्यामध्ये हेव्ही पॅरामीटर लेअर्सचा ऑप्शन निवडा. ज्यामुळे तुमचे केस लांब तर दिसतील शिवाय केसांना एक छान बाऊंसही मिळेल.
आम्ही सूचवलेले हे हेअरकट तुम्हाला कसे वाटले आणि त्यातील कोणता हेअरकट तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ट्राय केला हे आम्हाला जरूर कळवा.