हिवाळा सुरू झाला की घरोघरी डिंकाचे लाडू बनवण्याची तयारी सुरू होते. कारण हे लाडू दोन ते तीन महिने टिकतात आणि थंडीपासून शरीराचं संरक्षण करतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत घरातील सर्वांनात डिंकाचे लाडू आवडतात. हिवाळ्या शरीरार उष्णता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात एक डिंकाचा लाडू खाणं खूप गरजेचं आहे. सकाळी नाश्त्यासोबत डिंकाचे लाडू खाण्यामुळे दिवसभर उत्साही वाटते.डिंक हा झाडाच्या खोडावर तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळे यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शिवाय हे लाडू नारळाचा किस, साजूक तूप, सुकामेवा यासोंबत तयार केले जातात. हे सर्व पदार्थ हिवाळ्यात शरीराला ऊर्जा पूरवण्यासाठी गरजेचे असतात. यासाठीच जाणून घ्या हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे आणि बनवण्याची सोपी पद्धत
डिंक खाण्याचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात.यासाठीच जाणून घ्या थंडीत डिंकाचे लाडू का खावेत.
डिंकाचे लाडू निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आम्ही तुमच्यासोबत एक अतिशय सोपी पद्धत शेअर करत आहोत. जी वापरून तुम्ही अगदी झटपट डिंकाचे लाडू तयार करू शकता.
साहित्य -
डिंकाचे लाडू बनवण्याची कृती -
तूपात डिंक तळून घ्यावा आणि नंतर कु्स्करून त्याची पूड तयार करावी
सुकामेवा तूपात तळून मिक्सरवर भरडून घ्यावा
कढईत खसखस, सुकं खोबरं आणि खारीक पावडर टप्प्याटप्याने भाजून घ्यावी
सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे थंड झाल्यावर गरजेनुसार तुपाचा वापर करत लाडू वळावे
डिंक हा उष्ण पदार्थ असल्यामुळे अती प्रमाणात डिंकाचे लाडू खाऊ नयेत. दिवसभरात एक पेक्षा जास्त डिंकाचे लाडू खाण्यामुळे शरीरातील उष्णता अती प्रमाणात वाढू शकते. ज्यामुळे अपचन, पोटात दुखणे, पित्त उठणे, तोंड येणे असे त्रास जाणवतात. कोणताही पदार्थ शरीरासाठी तेव्हाच फायदेशीर ठरतो. जेव्हा तो प्रमाणात सेवन केला जातो. यासाठीच डिंकाचे लाडू पोषक असले तरी प्रमाणातच खावे.