सतत येत असेल अंगाला खाज, तर करा सोपे उपाय

सतत येत असेल अंगाला खाज, तर करा सोपे उपाय

अंगाला खाज येणे हे शरीरावर येणाऱ्या घामामुळे अथवा एका प्रकारच्या इन्फेक्शनमुळे होते. हात, मान, पाय अथवा शरीरावरील कोणत्याही भागावर ही खाज सतत येत असेल तर तुम्ही वेळीच लक्ष द्यायला हवं. ही खाज केवळ येऊन थांबत नाही तर तुमच्या अंगावर लाल अथवा ब्राऊन रंगाचे चट्टेही होतात आणि यामुळे शरीरावर जखमही होते. ही समस्या कोणालाही होऊ शकते. थोडीशी खाज सुरूवातीला येते आणि त्याची वाढ कधी पटकन होते हे कळतही नाही. पण वेळेवर लक्ष दिले नाही तर यामध्ये पस अर्थात पू होऊन तुमच्या शरीराला त्याचा अधिक त्रास होण्याचा धोका असतो. दुर्लक्ष केल्यास ही समस्या अधिक गंभीर होते. त्यामुळे याची सुरूवात झाल्यावर लगेचच तुम्हाला याकडे लक्ष देऊन त्यावर उपाय करायची गरज आहे. घाबरण्याची अजिबात गरज नाही. यावर काही सोपे आणि रामबाण उपचार आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणते उपाय करता येतात ते पाहूया.

टूटपेस्टचा करा वापर

Shutterstock

तुम्हाला जर अशा स्वरूपाची सतत अंगाला खाज येत असेल तर तुम्ही सर्वात पहिले टूथपेस्ट घ्या. साधारण तुम्ही सकाळी दात घासताना जितकी पेस्ट घेता तितकीच घ्या. यामध्ये तुम्ही एक चमचा कडुलिंबाचे तेल मिक्स करा आणि विटामिन ई ची कॅप्सुल मिक्स करून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता ही तयार पेस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी खाज येत असेल अथवा दाद झाली असेल तिथे आधी डेटॉलने स्वच्छ करून घ्या आणि मग नीट पसरवून लावा. व्यवस्थित त्या ठिकाणी गोलाकार स्वरूपात ही पेस्ट लावा. रात्री झोपताना ही पेस्ट लावा आणि तसंच राहू द्या. सकाळी उठून तुम्ही हे व्यवस्थित धुवा पण धुताना कोमट पाण्याचा वापर करा. तसंच आठवड्यातून किमान 4 वेळा तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

अंगाला खाज का येते आणि काय असतात त्यावर उपाय (How To Get Rid Of Itching In Marathi)

Beauty

WIPEOUT Germ Killing Hand Cream

INR 149 AT MyGlamm

तुळशीच्या पानाचा उपयोग

Shutterstock

तुळशीची पानं व्यवस्थित धुऊन घ्या. त्यानंतर पाण्यात टाकून ती नीट उकळून घ्या आणि त्याच पाण्याने तुम्ही आंघोळ करा. तुम्हाला जर घामुळं आलं असेल तर त्यावरही हा उत्तम उपाय आहे. उन्हाळ्यामुळे होणाऱ्या खाजेवर हा उत्तम उपाय आहे. तुम्हाला जर अंगाला सतत खाज येत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांच्या उपयोगासह लिंबाच्या रसाने त्वचेला आंघोळ करण्यापूर्वी मसाज करा. लिंबाच्या रसामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे त्वचेवरील सर्व बॅक्टेरिया निघून जातात. तसंच तुमच्या त्वचेचा रंगही उजळतो. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून अंगाला येणारी खाज घालवू शकता. 

अंडरआर्म्समध्ये येत असेल खाज तर करा सोपे उपाय, जाणून घ्या कारणे

नारळाचे तेल गुणकारी

Shutterstock

तुम्हाला जर कडक उन्हात गेल्यानंतर त्वचेवर जळजळ होत असेल तर तुम्ही आंघोळ केल्यावर त्वरीत नारळाचे तेल लावावे. कारण तुम्हाला यामुळे अंगावर खाज येण्याची शक्यता असते. नारळाच्या तेलाचा वापर केल्यास अंगावरील खाज कमी होते आणि तुम्हाला यापासून सुटका मिळते. 

यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज

अंगावरील खाज कमी होण्यासाठी अत्यंत सोपे उपाय

  • पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून घ्या आणि अंगावर लावा. दहा मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग आंघोळ करा
  • कडिलिंबाची पाने पाण्यात उकळवून घ्या आणि त्याच पाण्याने आंंघोळ करा 
  • बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडेसे पाणी घाला आणि बनलेली पेस्ट अंगावर लावा. साधारण पाच मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. खाज कमी होते 
  • झेंडूच्या फुलामध्येही अँटिअलर्जिक गुण असतात. यामुळे अंगावरील दाद, खाज याच्या समस्या असल्यास नाहीशा होतात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक