कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी घरगुती उपाय - Home Remedies To Get Rid Of Frizzy Hair

Home Remedies For Frizzy Hair In Marathi

घनदाट, चमकदार आणि मऊ - मुलायम केस हे आपले व्यक्तिमत्व अधिक चांगले दर्शवतात. पण जर केस अधिक कोरडे आणि निस्तेज असतील तर नक्कीच दिसायला वाईट दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोरड्या आणि निस्तेज केसांचा गुंता सोडवणे महाकठीण काम. त्यातही ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना अजूनच कठीण. पण अशा कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही काळजी घेऊ शकता. याचा अर्थ सतत शँपू करणे अथवा तेल लावणे असा होत नाही. तसंच सतत पार्लरमध्ये जाऊन केसांची स्टाईल बदलणं असाही नाही. कारण यामुळे तुमच्या नैसर्गिक केसांची चमक खराब होते आणि कालांतराने केस अधिक कोरडे आणि निस्तेज होतात. पण घरगुती उपायांनी (Home Remedies to get rid of Frizzy Hair) तुम्ही नक्कीच अशा कोरड्या आणि निस्तेज केसांची काळजी घेऊ शकता. अशाच काही सोप्या टिप्स या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल याची आम्हाला खात्री आहे.  

Table of Contents

  केस कोरडे आणि निस्तेज होण्याची कारणे (Causes Of Frizzy Hair In Marathi)

  Shutterstock

  केस कोरडे आणि निस्तेज होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे केसात कमी मुलायमपणा असणे. त्वचेप्रमाणे केसांनादेखील हायड्रेट असणं गरजेचं असतं. केसांचे क्युटिकल्स अर्थात केसांचा बाहेरचा भाग जो डेड स्किनपासून बनलेला असतो आणि केसांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्याचे काम करतो तो केसांना पोषण देण्यासाठी काम करत असतो. पण वातावरणातील अधिक मॉईस्चराईजरमुळे केस अधिक कोरडे आणि निस्तेज होऊ लागतात. तसंच केसांमध्ये अनेकदा केमिकलयुक्त कलर आणि स्टायलिंग केल्यामुळेदेखील केसांवर परिणाम होतो आणि केस अधिक कोरडे (Frizzy Hair) होतात. याशिवाय सतत डिहायड्रेट होत असल्यास, कोरडे आणि निस्तेज केस खराब दिसू लागतात. त्यामुळे शँपू बदलल्याने काहीही परिणाम होत नाही. केसांना अशावेळी योग्य पोषण मिळण्याची गरज असते. त्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. 

  कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Frizzy Hair In Marathi)

  अनेकदा आपण घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करतो. पण खरं तर केसांसाठी घरगुती उपाय अधिक चांगले ठरतात. याचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे. कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी कसे आणि काय घरगुती उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया. घरगुती केसांचा हेयर मास्क कसा बनवायचा ते शिका.
   

  बदाम आणि अंडे (Almond & Egg)

  Shutterstock

  साहित्य 

  • पाव कम बदाम तेल
  • एक कच्चे अंडे 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • बदाम तेल आणि अंडे मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. अंडे फेटूनही तुम्ही केसांना लाऊ शकता 
  • त्यानंतर केसांचे भाग करून हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लावा 
  • साधारण 40 मिनिट्स हे सुकू द्या. सुकल्यानंतर नेहमीप्रमाणे केसांना शँपू लावा आणि केस धुवा 
  • लक्षात ठेवा की चांगल्या शँपू आणि कंडिशनरचा वापर करा. विशेषतः सल्फेटमुक्त शँपूचा वापर करावा 
  • आठवड्यातून एकदा तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता 

  कसे ठरते फायदेशीर 

  बदाम तेल हे नैसर्गिक मॉईस्चराईज आणि कंडिशनरचे काम करते. तर अंड्यामध्ये प्रोटीन असते, जे केसांना नुकसान पोहचू देत नाही. हा घरगुती उपाय गुंता झालेले केस सोडविण्यासाठी उत्तम आहे.

  अवाकाडो मास्क (Avocado Mask)

  Shutterstock

  साहित्य 

  • एक उकडलेले अवाकाडो 
  • एक कप दही 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • अवाकाडो कापून त्यातील बी काढून टाका 
  • नंतर अवाकाडो आणि दही मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या 
  • ही पेस्ट केसांना लावा आणि साधारण पाऊण तास तरी तसंच राहू द्या
  • त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा 
  • हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एक अथवा दोन वेळा वापरू शकता 

  कसे ठरते फायदेशीर

  कोरड्या निस्तेज केसांच्या काळजीसाठी अवाकाडोचा हा हेअर मास्क केवळ स्वस्तच नाही तर परिणामकारक घरगुती उपाय आहे. यामध्ये विटामिन बी आणि ई चा समावेश असतो, जो केसांचे पोषण  करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच केसांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही याचा उपयोग होतो. दही केसांची सुरक्षाच करत नाही तर केसांना चांगले कंडिशनदेखील करते. 

  नारळाचे तेल आणि विटामिन ई (Coconut Oil & Vitamin E)

  Shutterstock

  साहित्य

  • एक भाग विटामिन ई चे तेल
  • चार भाग ऑर्गेनिक नारळाचे तेल 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • दोन्ही तेल मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करा आणि एअर टाईट जारमध्ये स्टोअर करा 
  • आपल्या केसांच्या लांबीनुसार दोन ते तीन चमचे तेल घ्या 
  • हे आपल्या स्काल्पपासून संपूर्ण केसांना लावा 
  • 40 मिनिट्स झाल्यावर केस धुवा 
  • हे तेल तुम्ही आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा केसांना लाऊ शकता. 

  कसे ठरते फायदेशीर 

  विटामिन ई मध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते जे केसांना नुकसान पोहचवणाऱ्या गोष्टींशी लढते. तर नारळाचे तेल हे केसांना अधिक पोषण देऊन त्यांना कंडिशन करतात. आपल्या केसांसाठी योग्य केसांच्या तेलाबद्दल जाणून घ्या.

  मेयोनीज (Mayonnaise)

  Shutterstock

  साहित्य 

  • पाव कप मेयोनीज
  • पाऊण कप शुद्ध बदाम तेल
  • एक अथवा दोन अंडे (केसांच्या लांबीनुसार)

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • मेयोनीज, बदाम तेल आणि अंडे एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या
  • हे मिश्रण आपल्या केसांवर आणि स्काल्पवर नीट लावा आणि गरम टॉवेल अथवा शॉवर कॅपने केसांना झाका 
  • त्यानंतर काही वेळाने शँपू आणि कंडिशनर लावा आणि केस धुवा
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा वापर केसांवर करू शकता

  कसे ठरते फायदेशीर 

  हे मास्क केसांना पोषण देण्यासह केस मजबूत आणि चमकदार बनवते. तसंच यामुळे केसांना अधिक मॉईस्चर मिळते आणि केसांचा गुंता पटकन सुटतो. तसंच केसांचा कोरडेपणा घालविण्यासाठी हे परिणामकारक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मेयोनीज घरीच करा. स्टोअरमध्ये मिळणारे मेयोनीज हे केमिकलयुक्त असण्याची शक्यता असते. 

  केळे (Banana)

  Shutterstock

  साहित्य 

  • एक पिकलेले केळे 
  • दोन चमचा मध 
  • पाऊण कप नारळाचे तेल अथवा बदामाचे तेल 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • केळे नीट मॅश करून घ्या आणि त्यात गुठळ्या ठेऊ नका आणि त्यामध्ये तेल आणि मध मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या 
  • हे मिश्रण केसांना मुळांपासून लावा आणि साधारण अर्धा तास तसंच राहू द्या
  • त्यानंतर केसांना शँपू आणि कंडिशनर लावा आणि केस नीट धुवा 
  • आठवड्यातून एकदा तुम्ही हे केसांना लावा 

  कसे ठरते फायदेशीर 

  केळं हे केसांसाठी उत्तम असून चांगले कंडिशनर आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा याध्ये मध मिक्स करण्यात येते. मधासह असणारे हे मिश्रण केसांना मॉईस्चर करण्याचे काम करते. हा केळ्याचा मास्क उत्तम असून केसांची निगा राखण्यासाठी योग्य आहे. 

  बीअर (Beer)

  Shutterstock

  साहित्य 

  एक ग्लास बीअर 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • एका भांड्यात बीअर काढा आणि ती डिकार्बोनेट करा. रात्रभर तशीच राहू द्या 
  • दुसऱ्या दिवशी केसांना पहिले शँपू करा आणि मग बीअर केसांना लावा आणि हलक्या हाताने मालिश करा 
  • त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा 
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही असं करू शकता 

  कसे ठरते फायदेशीर 

  बीअर तुमच्या केसांना मॉईस्चराईज करते आणि यामध्ये असणारे प्रोटीन आणि विटामिन बी हे केसांना पोषण देते. तसंच केसांना स्वच्छ राखण्यासाठीही मदत करते आणि केसांचे क्युटीकल्स निरोगी राखण्यास फायदेशीर ठरते.

  लिंबू आणि मध (Lime & Honey)

  Shutterstock

  साहित्य

  • दोन चमचे लिंबाचा रस 
  • दोन चमचे मध 
  • एक कप पाणी 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या आणि धुतलेल्या केसांवर लावा 
  • आता काही वेळ मालिश करा आणि 10 मिनिट्स तसंच ठेवा 
  • नंतर केस कोमट पाण्याने धुवा 
  • आठवड्यातून दोन वेळा हा हेअर मास्क वापरा. पण लक्षात ठेवा की इतर दिवशी तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी कंडिशनिंग मास्कचा उपयोग करा

  कसे ठरते फायदेशीर 

  लिंबू आणि मधाचा हा हेअर मास्क केसांवरील धूळ आणि घाण काढून टाकतो आणि केसांच्या क्युटिकल्समध्ये सुधारणा आणतो. यामुळे केस निरोगी होतात आणि केसांमध्ये असणारा गुंता लगेच सुटतो. तसंच यामध्ये असणारे विटामिन सी हे केसांचा विकास होण्यास मदत करते आणि यामध्ये आढळणारे ब्लिचिंगचे गुणे केसांना नैसर्गिक स्वरूपात मऊ आणि मुलायम करते. 

  मध (Honey)

  Shutterstock

  साहित्य

  • दोन चमचे मध
  • दोन कप गरम पाणी 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत

  • मध पाण्यात घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मग हे पाणी केसांना लावा 
  • अर्धा तास तसंच राहू द्या आणि त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा 
  • मध एक चांगले कंडिशनर आहे त्यामुळे केसांना चांगली चमक येते. तुम्हाला जर केसांना जास्त चमक नको असेल तर तुम्ही याचा वापर आठवड्यातून एकदा करा. जर अधिक चमक हवी असेल तर दोन वेळा वापरलेत तरीही चालेल

  कसे ठरते फायदेशीर 

  हा एक सोपा उपाय आहे आणि याला जास्त वेळही लागत नाही. मध नैसर्गिक उपाय असून केसाना चांगले मॉईस्चर देते. तसंच केसांना अधिक मजबूत, घनदाट आणि चमकदार बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. 

  मध आणि दही (Honey & Yogurt)

  Shutterstock

  साहित्य

  • दोन ते तीन चमचे दही 
  • एक चमचा मध 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • एका वाटीत मध आणि दही घेऊन नीट मिक्स करा
  • हे मिश्रण केसांना मुळांपासून लावा आणि साधारण अर्धा तास केसांवर सुकू द्या 
  • सुकल्यावर थंड पाण्याने केस धुवा 
  • केसांना निरोगी आणि मॉईस्चर राखण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी हा हेअर मास्क वापरा

  कसे ठरते फायदेशीर 

  दही केसांना कंडिशन करते आणि मध केसांमध्ये मॉईस्चर टिकवते. केसांना अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी याचा फायदा मिळतो

  अॅपल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

  Shutterstock

  साहित्य 

  • दोन चमचे अॅप्पल साईड व्हिनेगर
  • दोन कप पाणी 

  बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत

  • एक जगमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा
  • पहिले आपल्या केसांना शँपूने धुवा आणि मग अॅप्पल साईड व्हिनेगरच्या पाण्याने धुवा 
  • थोडा वेळ केस असेच राहू द्या. मग केसांना कंडिशनर लावा आणि धुवा 
  • आठवड्यातून एकदा तुम्ही हे करू शकता

  कसे ठरते फायदेशीर 

  अॅप्पल साईड व्हिनेगर तुमच्या केसांचा पीएच स्तर संतुलित करण्यसाठी मदत करतो आणि कोणत्याही खुल्या असणाऱ्या क्युटिकल्स बंद करण्यास मदत करते. त्यामुळे केसांमध्ये मऊपणा राहतो. केसांमध्ये घाण होणे अथवा तेल निर्माण होणे हे थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच केसांमध्ये चमक येते. वापरताना डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. 

  कोरड्या केसांसाठी काही सोप्या हॅक्स (Hacks For Frizzy Hair In Marathi)

  कधी कधी केस कोरडे आणि निस्तेज कसे होतात हे कळत नाही. वेळेवर केसांची काळजी घेतली तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. काही घरगुती उपाय तर आपण पाहिले. पण काळजी घेण्यासाठी काही सोप्या युक्तीही आपल्याकडे असतात. त्याचा तुम्ही वापर करून केसाची काळजी घेऊ शकता. फ्रिज फ्री केस कसे मिळवावेत ते शिका.

  चांगला हेअरकट (Good Haircut)

  Shutterstock

  बऱ्याचदा कित्येक वर्षात काही महिला केस कापतच नाहीत. त्यांना वाटतं लांब केस अत्यंत चांगले असतात. हे खरं असलं तराही ते निरोगी असणं जास्त गरजेचे आहे. लांब आहेत पण पातळ असतील तर काहीही फायदा नाही. त्यामुळे केस अधिक कोरडे आणि निस्तेज दिसतात. त्यामुळे वेळोवेळी केसांना चांगला आणि योग्य हेअरकट द्यायला हवा. केस जास्त कापले जाणार नाहीत आणि केसांची निगाही राखली जाईल असा हेअरकट दर सहा महिन्यांनी तरी किमान तुम्ही करायला हवा अथवा केस ट्रिम तरी करून घ्यायला हवे. यामुळे दुहेरी केसांची समस्या दूर होईल आणि तुमच्या केसांची निगाही राखली जाईल. 

  शँपू आणि कंडिशनर (Shampoo & Conditioner)

  केसांची निगा राखण्यासाठी शँपू आणि कंडिशनर या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. तुमचा शँपू आणि कंडिशनर योग्य नसेल तर कोरड्या आणि निस्तेज केसांची समस्या वाढतच जाते. त्यामुळे याची योग्य निवड करणे गरजेचे आहे. असा शँपू आणि कंडिशनर निवडा जो केसांना हायड्रेट करेल आणि मॉईस्चराईज करेल. ज्या शँपूमध्ये सल्फेट नसेल. सहसा आयुर्वेदिक आणि हर्बल शँपूचीच निवड करा. कारण यामध्ये केमिकलयुक्त पदार्थ नसतात. कंडिनशर लावतानाही याची काळजी घ्या. काही जण केसांच्या मुळांशी कंडिशनर लावातात. पण ही पद्धत योग्य नाही. यामुळे केसगळती होते. त्यामुळे कंडिशनर हे केसांना वरूनच लावायला हवे याची व्यवस्थित काळजी घ्या. ओले केस करकचून टॉवेलने बांधू नका. त्यामुळे तुटण्याची शक्यता असते.  

  अँटिफ्रिज गोष्टींचा वापर करू नका (Don't Use Antifreeze Items)

  तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही कुरळ्या केसांसाठी बनलेल्या गोष्टींचाच वापर करा. बाजारामध्ये अनेक उत्पादनं असतात ज्याचा तुम्ही वापर करू शकता. बाहेर जाण्यापूर्वी केसांना स्कार्फ बांधा. यामुळे धूळ आणि प्रदूषणपासून नुकसान होत नाही.  तसंच केसांमध्ये अधिक गुंताही होत नाही.   

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. केसांना सतत आयर्निंग केल्याने केस कोरडे आणि निस्तेज होतात का?

  केसांना सतत आयर्निंग केल्याने नक्कीच केस कोरडे होतात. कारण केसातील मुलायमपणा आणि नैसर्गिक तेलदेखील सततच्या आयर्निंगमुळे निघून जाते. त्यामुळे केसांची काळजी घेताना याचा वापर शक्यतो टाळा.

  2. कोरड्या केसांसाठी कोणते तेल योग्य आहे?

  कोरड्या केसांसाठी तुम्ही नारळाचे तेल, बदाम तेल, ऑर्गन ऑईल, जोजोबा ऑईल आणि ऑलिव्ह ऑईलचा सहसा वापर करावा. तसंच आठवड्यातून एकदा यापैकी एका तेलाचा वापर करून केसांचा मसाज करावा. जेणेकरून केसांची चमक चांगली राहते आणि निगाही राखली जाते.

  3. कोरड्या केसांसाठी नारळाच्या दुधाचा वापर करता येतो का?

  हो कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी नारळाच्या दुधाचा वापर करणे योग्य आहे. हे दूध गरम करून केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. शँपू आणि कंडिशनरचा वापर करा. तुम्हाला चांगला फायदा मिळतो. केस मऊ आणि मुलायम होतात.

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक