लहान मुलांच्या केसांसाठी असं तयार करा घरीच तेल

लहान मुलांच्या केसांसाठी असं तयार करा घरीच तेल

बाळाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या अंगावर नाजूक लव असते आणि डोक्यावरही पातळ केस असतात. मात्र हळूहळू जस जशी त्यांची वाढ होत जाते तस तसे त्यांच्या डोक्यावरील केस वाढू लागतात. जर तुमच्या मुलांचे केस मोठेपणी दाट आणि मजबूत व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर लहानपणीच त्यांच्या केसांची योग्य काळजी घ्यायला हवी. लहान मुलांच्या केसांवर लावण्याचे तेल वेगळे असते. ज्या तेलात जास्त प्रक्रिया केलेल्या नसतात. कारण अशा बाजारातील विकतच्या तेलामुळे बाळ्याच्या नाजूक त्वचेचं आणि केसांचं नुकसान होऊ शकतं. बऱ्याच बाळांना बाजारातील तेल लावण्यामुळे अंगावर अॅलर्जी उठते. यासाठी आम्ही तुमच्यासोबत लहान मुलांसाठी घरच्या घरी तेल कसं तयार करावं याची एक सोपी पद्धत शेअर करत आहोत. 

बाळाच्या केसांच्या पोषणासाठी कोणत्या घटकांची आहे गरज -

तुमच्या बाळाचे केस मोठं झाल्यावर घनदाट आणि मजबूत व्हावे असं वाटत असेल तर त्यांच्या केसांच्या पोषणाची योग्य काळजी आतापासूनच घ्या. यासाठी बाळाला होममेड हेअर ऑईल लावणं फायदेशीर ठरू शकतं. ज्या तेलामध्ये  बदाम, तूप अथवा ऑलिव्ह ऑईल तेल तुम्ही वापरू शकता.

बदामाचे फायदे -

बदामामध्ये मॅग्नेशिअम आणि अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या बाळाच्या केसांचे योग्य पोषण होते. बदामामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि फॉलिकल्सचे पोषण होते. बदामामध्ये असलेल्या ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे बाळाच्या स्काल्पचं संरक्षण  होतं आणि त्वचेखालील रक्तप्रवाह सुरळीत होतो. याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो आणि बाळाची त्वचाही चमकदार होते. 

Shutterstock

ऑलिव्ह ऑईलचे फायदे -

ऑलिव्ह ऑईलने बाळाच्या केसांना मसाज केल्यामुळे त्याच्या स्काल्पखालील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे बाळाची टाळू लवकर भरते. शिवाय केसांच्या फॉलिकल्सला प्रोत्साहन मिळाल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ऑलिव्ह ऑईल बाळाची त्वचा मऊ आणि मॉईस्चराईझ ठेवण्यास मदत करते. या तेलामुळे बाळाचे केस मजबूत आणि घनदाट होतात. 

Shutterstock

बाळासाठी होममेड हेअर ऑईल कसं तयार करावं -

बाळासाठी घरच्या घरी हे तेल तयार करणं अगदी सोपं आहे. यासाठी फक्त लागणारं साहित्य शुद्ध आहे का याची खबरदारी घ्यावी लागेल.

साहित्य -

  • साजूक तूप
  • बदाम
  • ऑलिव्ह ऑईल

तेल तयार करण्याची पद्धत -

एक स्टीलची पॅन घ्या. त्यामध्ये चमचाभर तूप टाका. तूप विरघळल्यावर त्यामध्ये बदाम टाका. मंद गॅसवर बदाम  परतून घ्या. बदाम काळ्या रंगाचे झाले की गॅस बंद करा. बदाम थंड झाल्यावर ते एका काचेच्या बरणीत भरा आणि त्यावर ऑलिव्ह ऑईल टाका. या तेलात बूडवून ठेवल्यामुळे बादामाचा अर्क तेलात उतरेल आणि बाळाच्या केसांचे पोषण होईल. बाळाच्या केसांना मालिश करताना हे तेल फक्त थोडं कोमट करून घ्या आणि मग ते त्याच्या केसांना लावा. ज्यामुळे तुमच्या बाळाचे केस मऊ आणि घनदाट होतील. 

Instagram

आम्ही शेअर केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बाळासाठी हे हेअर ऑईल तयार केलं का आणि त्याचा तुमच्या बाळाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm