स्टायलिश दिसायचं असेल तर तुमच्या बॉडीशेपनुसार निवडा हॅंडबॅग

स्टायलिश दिसायचं असेल तर तुमच्या बॉडीशेपनुसार निवडा हॅंडबॅग

परफेक्ट लुकसाठी तुम्ही तुमच्या ड्रेसपासून ते अगदी अॅक्सेसरिजपर्यंत खूप सावध असता. कारण एक छोटीशी चुक तुमचा लुक खराब करू शकते. ड्रेसनुसार मॅचिंग फूटवेअर, इअररिंग्ज आणि हॅंडबॅग निवडण्यामुळे तुमच्या लुकमध्ये खूप फरक पडतो. बऱ्याचदा यासाठी तुम्ही महागड्या हॅंडब२ग खरेदी करता ज्यामुळे तुम्ही जास्त स्मार्ट दिसाल असं तुम्हाला वाटत असतं. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का ब्रॅंडप्रमाणेच तुमच्या बॅगची साईज आणि डिझाईनही तुमच्या लुकसाठी तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच बॅग खरेदी करताना तुमच्या बॉडीशेपनुसार ती खरेदी करायला हवी. यासाठीच या काही टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुमचा लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.

सर्वात आधी तुमचा बॉडीशेप ओळखा -

तु्मचा बॉडीशेप कसाही असला तरी त्याचा आदर राखा आणि त्यानुसार स्टाईल करा ज्यामुळे तुम्ही मनातून आणि बाहेरून सुंदर दिसाल. 

  • जर तुमचा कंबरेखाली भाग तुमच्या कंबरेच्या वरील भागापेक्षा जाड असेल तर तुम्ही पिअर शेपच्या आहात हे ओळखा
  • जर तुमची कंबर, खांदा आणि हिप एकसमान असेल तर तुम्ही रेक्टॅंगल शेपच्या आहात
  • जर तुमची कंबर तुमच्या खांदे आणि मांड्यापेक्षा मोठी असेल तर तुम्ही अॅपल शेपच्या आहात
  • याचप्रमाणे  जर तुमचे खांदे आणि मांड्यांपेक्षा कंबर बारीक असेल तर तुम्ही हॉरग्लास शेपच्या आहात हे समजून घ्या

रेक्टॅंगल शेप -

जर तुमचा बॉडीशेप रेक्टॅंगल शेपचा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या बॅग वापरायला हव्यात ज्यामुळे तुमच्या कंबरेला सुडौलपणा येईल. अशा शेपच्या महिलांनी लांब स्ट्रिप्सच्या खांद्याला अडकवता येतील अशा बॅग वापराव्या. ज्यामुळे तुमची बॅग खांद्यावर अडकवल्यावर तुमच्या मांड्यांपर्यंत जाईल. शिवाय तुमच्या बॅगचा आकार चौकीनी अथवा आयताकृती असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे ती तुम्हाला जास्त सूट करेल. 

Instagram

पिअर शेप -

जर तुम्हाला तुमच्या कंबरेखालील भाग जास्त मोठा दिसू नये असं वाटत असेल तर खांद्यापर्यंत अथवा छातीच्या भागापर्यंत लांब असतील अशीच ब२ग कॅरी करा. तुम्ही तुमच्या एखाद्या लांब स्ट्रिप्सच्या बॅगचे पट्टे अशा पद्धतीने अॅडजस्ट करूनही ती वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या कंबरेखाली भागावर जास्त फोकस केला जाणार नाही. 

Instagram

अॅपल शेप -

जर तुम्ही अगदी छोट्या आकाराच्या अथवा छोट्या उंचीच्या बॅग कॅरी केल्या जर तुमच्या बॉडीशेपवर आणि पर्यायाने लुकवर चांगला परिणाम होणार नाही. यासाठी अशा बॉडीशेपच्या व्यक्तीने कमीत कमी कंबरेपर्यंत उंचीच्या बॅग वापराव्या. ज्यामुळे त्यांचा  खांदा आणि मांड्या जास्त सुडौल दिसतील आणि कंबेरकडचा भाग झाकला जाईल. 

Instagram

हॉर्सग्लास शेप -

या शेपचा शरीराचा आकार हा परफेक्ट शेप समजला जातो. ज्यामुळे या प्रकारच्या बॉडीशेपच्या महिलांनी कोणत्याही प्रकारची बॅग कॅरी करण्यास काहीच हरकत नाही. जास्त स्टायलिश दिसायचं असेल तर अशा महिलांनी अशा बॅग निवडाव्या ज्यामुळे त्यांचा बॉडीशेप झाकला जाणार नाही.

Instagram

आम्ही तुम्हाला तुमच्या बॉडीशेपनुसार हॅंडबॅग निवडण्याचा सल्ला देत असलो तरीदेखील जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही कोणत्याही साईज आणि प्रकारची बॅग कॅरी करू शकता. कारण बॉडीशेपपेक्षा तुमची आवड तुमच्या स्टाईलवर जास्त परिणाम करते. मात्र जर तुम्हाला तुमच्या बॉडीशेपला योग्य पद्धतीने दाखवायचं असेल तर वर दिलेल्या टिप्स फॉलो करा.