नाताळानिमित्त अशी करा घराची सजावट (How To Decorate Your Home For Christmas)

How To Decorate Your Home For Christmas In Marathi

दिवाळीनंतर सर्वांना वेध लागतात ते ख्रिसमस आणि नववर्षांचे... ख्रिसमसाठी दिवाळीप्रमाणेच लाईट्स, डेकोरेशन घरात केलं जातं. ख्रिसमस हा पाश्चात्य संस्कृतीतील सण असला तरी भारतातही तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाताळानिमित्त घर सजवलं जातं, गेट-टु-गेदर आयोजित केलं जातं, घरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीची झालर असली तरी सांताक्लॉजचं स्वागत आणि घरातील लहान मुलांसाठी सिक्रेट सांताने दिलेलं गिफ्ट ही एक आनंद वाढवणारी प्रथा नक्कीच आहे. त्यामुळे यंदा तुम्हीदेखील तुमच्या नाताळासाठी घर सजवण्याचा विचार करत असाल तर या काही सोप्या  टिप्स नक्कीच तुमच्या फायद्याच्या आहेत. 

घराचा मुख्य दरवाज्यावर रिबनने सजावट करा (Wrap Your Front Door With Ribbon)

घराचा मुख्य दरवाजा हा नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रवेशद्वार आकर्षक करणं गरजेचं आहे. याच दरवाज्यातून तुमच्या घरी ख्रिसमससाठी पाहुणे प्रवेश करणार.... हा दरवाजा तुम्ही निरनिराळ्या रिबनने सजवला तर येणाऱ्या लोकांना नक्कीच काही तरी खास डेकोरेशन केलं आहे असं वाटेल. शिवाय ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या घरात या माध्यमातून आनंददेखील घरात प्रवेश करेल. यासाठीच रंगबिरंगी रिबन्स तुमच्या प्रवेशद्वाराजवळ सोडा किंवा या फोटोत दिल्याप्रमाणे रिबन्सचा वापर करा. ज्यामुळे प्रवेशद्वार नेहमीपेक्षा सुंदर दिसू लागेल.

Instagram

ख्रिसमससाठी हॅंगिग बास्केट लावा (Christmas Hanging Basket)

घराच्या मुख्य दरवाज्याजवळ थ्रिसमस हॅंगिग बास्केट लावणे ही आयडियादेखील मस्त आहे. तुम्ही या बास्केटमध्ये एखादं छान फुलझाड लावू शकता अथवा आर्टिफिशिअल झाडं आणि डेकोरेटिव्ह वस्तूंनी ते बास्केट सजवू शकता. असं केल्यामुळे ख्रिसमसनंतरही तुमच्या घराचं एक्टेरिअर आकर्षक दिसेल. जर तुमच्या घरासमोर गार्डन असेल तर अशा बास्केटमुळे गार्डनच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल. तुम्ही अशी बास्केट विकत आणू शकता अथवा घरातच DIY पद्धतीने घरी तयार करू शकता. 

Instagram

आठवणींची भिंत (Memories Of The Year Wall)

एखादा सण अथवा स्पेशल क्षण साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ख्रिसमससाठी तुम्ही असं डेकोरेशन नक्कीच करू शकता. ज्यातून तुमच्या वर्षभराच्या आनंदीक्षणांचा मागोवा घेणं शक्य होईल. आनंद हा वाटण्यातून वाढतो त्यामुळे तुमच्या प्रियजनांसोबत अशा काही आठवणींना पुन्हा उजाळा देण्यात तुम्हाला नक्कीच मजा येईल. या मागील वर्षात जे जे काही चांगलं घडलं त्या क्षणांची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे असं समजा. कारण यातूनच पुढचं वर्षभर तुमच्यावर आनंदाची बरसात होणार आहे.

Instagram

दिवाळी डेकोरेशनचा वापर करा (Utilise Your Diwali Decor)

कोणताही सण साजरा करण्यासाठी लागते ती फक्त प्रबळ इच्छा… ख्रिसमस साजरा करण्यासाठी तुम्हाला ख्रिसमसचे डेकोरेशन विकत आणण्याची गरज नाही. दिवाळीसाठी वापरलेले साहित्य तुम्ही ख्रिसमसच्या डेकोरेशनसाठी नक्कीच वापरू शकता. त्यामुळे आटपून ठेवलेलं  डेकोरेशनचं साहित्य पुन्हा बाहेर काढा आणि कामाला लागा. लाईट्सच्या माळा, कंदील, दिवे असं बरंच काही तुम्ही पुन्हा वापरू शकता. ज्यामुळे ख्रिसमसही साजरा होईल आणि तुम्हाला आनंदही मिळेल.

Instagram

घरी तयार केलेले स्टार्स आणि स्नोफ्लेक्स (DIY Stars and Snowflakes)

ख्रिसमसच्या सजावटीसाठी विकतचं साहित्य आणण्यापेक्षा घरीच स्टार्स आणि स्नोफ्लेक्स तयार करा. तुम्ही कागद, कापूस, कापड अथवा दोरा अशा अनेक घरातील वस्तू वापरून हे डेकोरेशन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम अथवा युट्यूबवर अनेक DIY आयडियाज मिळू शकतात. कागदी स्टार्स तयार करण्यासाठी स्टेन्सिल्सच्या मदतीने स्टार्सचे आकार कापून घ्या. दोऱ्याच्या मदतीने हे स्टार्स तुमच्या घरातील विविध भागी लटकवा. त्यावर ग्लिटर लावलं तर रात्री लाईट्स बंद केल्यावर तुमच्या घरातच तारे चमकत आहेत असं तुम्हाला जाणवेल.

Instagram

ख्रिसमस ट्री (Christmas Tree)

ख्रिसमसच्या डेकोरेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ख्रिसमस ट्री. आजकाल मार्केटमध्ये निरनिराळ्या आकाराचे ख्रिसमस ट्री विकत मिळतात. तुमच्या घराच्या आकारानुसार योग्य त्या ख्रिसमस ट्रीची निवड करा. घराच्या प्रवेश द्वाराजवळ ख्रिसमस ट्री ठेवा आणि त्याच्या प्रत्येक फांदीवर डेकोरेशनसाठी मिळणारे गिफ्ट बॉक्सेस आणि बेल्स बांधा. हिरव्या रंगाच्या ख्रिसमस ट्रीवर चमचमत्या रंगाच्या केलेल्या या डेकोरेशनमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. ख्रिसमस ट्रीवर हलक्या लाईट्सच्या माळा सोडा आणि मस्त फोटोसेशन करा.

Instagram

हॅंडमेट क्रॅकर्सने सजवा तुमचे टेबल (Dress The Table With Handmade Crackers)

पैसे वाचवण्यासाठी अथवा खर्चाचं बजेट वाढू नये यासाठी यावर्षी तुम्ही स्वतःच क्रॅकर्स तयार करू शकता. असंही यावर्षी आपल्या सर्वांनाच पैसे वाचवण्याची आणि प्रदूषण टाळण्याची खूप गरज आहे. तेव्हा कार्डबोर्डचा रोल करा आणि त्यावर एखादी रिबन अथवा क्रेप पेपर गुंडाळा. तुम्ही यामध्ये तुमचे स्वतःचे काही जोक्स लिहू शकता अथवा गुगलवर तुम्हाला बेस्ट क्रॅकर जोक्स नक्कीच मिळतील ते लिहा. पाहुण्यांसमोर असं पर्सनल टच असलेलं डेकोरेशन नक्कीच प्रभावी ठरतं. तुम्ही त्यासोबत ख्रिसमसच्या शुभेच्छा प्रियजनांना देऊ शकता.

Instagram

स्वतः गिफ्ट पॅक करा (Make Your Own Gift Wrap)

सण म्हटला की गिफ्ट देणं हे आलंच. या निमित्ताने प्रियजनांच्या आवडीनिवडी जोपासण्याची एक संधीच आपल्याला मिळत असते. शिवाय सिक्रेट सांताच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात काही क्षण आनंदाचे आणता येतात. या वर्षी तुम्ही तुमच्या आईवडील, मुलं, जवळच्या मित्रमंडळींसाठी जे गिफ्ट घ्याल ते स्वतःच पॅक करा. कारण असं स्वतःच्या हाताने पॅकिंग केलेलं गिफ्ट देण्यात एक वेगळाच आनंद आहे. गिफ्ट पॅकिंगसाठी तुम्ही रंगबिरंगी हॅंडमेड पेपर, लीलनचे कापड, रिबन्स अशा आकर्षक गोष्टींचा वापर करू शकता. पॅकिंग केल्यावर एका कागदी नोटवर तुमच्या शुभेच्छा आणि भावना स्वहस्ताक्षरातच लिहा. ज्यामुळे त्या भेटवस्तूला आपलेपणाचा सुंगध येईल. ख्रिसमसला प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी या आयडियाज तुम्हाला नक्कीच आवडतील

Instagram

डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्सचा वापर करा (Dry Fruit To Make Decorations)

ख्रिसमस डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापरदेखील करू शकता. विशेषतः लहान मुलांना अशी सजावट खूप आवडते. कारण या  सजावटीचा वापर ते खाण्यासाठीही करू शकतात. सजावटीचं साहित्य सण साजरा झाल्यावर बऱ्याचदा वाया जातं. त्यामुळे पैशाचा अपव्यय होतो. जर तुम्ही यंदा ख्रिसमससाठी निरनिरळ्या रंगाचे ड्रायफ्रूट वापरले तर तुमचे पैसे नक्कीच वाया जाणार नाहीत. सजावट झाल्यावर तुम्ही हे ड्रायफ्रूट खाण्यासाठी वापरू शकता. ड्रायफ्रूटचा वापर करून आणि या रेसिपीज ट्राय करत तुम्ही ख्रिसमससाठी खास केक तयार करू शकता.

Instagram

टाकाऊपासून टिकाऊ सजावट (Create Unique Garlands From Recycled Materials)

घरातील टाकाऊ वस्तू, पदार्थांपासून तुम्ही सजावटीच्या माळा तयार करू शकता. ज्यामुळे तुमची  सजावट बजेटमध्ये बसेल. घरच्या घरी पिशवी, दोरे, लेसचा वापर करून तुम्ही घर सजवू शकता. गुलाबाची फुलं अथवा इतर प्रकारच्या फुलांपासून केलेल्या माळा घराची शोभा नक्कीच वाढवतात. लाईटस् सोबत अशा DIY पद्धतीने केलेल्या डेकोरेशनच्या माळा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य द्वाराजवळ नक्कीच लावू शकता. गुलाबाची फुल आणि पानंही लावूनही तुम्ही दरवाजा सजवू शकता.

Instagram

ख्रिसमस काऊंटडाऊन (Countdown to Christmas)

ख्रिसमसला काही दिवस असतानाच तुम्ही ख्रिसमसच्या काऊंटडाऊनला सुरूवात करू शकता. यासाठी घरातच एक मासिक कॅलेंडर तयार करा. ख्रिसमसला किती दिवस उरले हे दररोज आठवण करून देणारी सजावट करा. हा एक दररोज आनंद साजरा करण्याचा एक बेस्ट प्रकार आहे. मुख्य दरवाज्यावर तुम्ही हे काऊंटडाऊन लावू शकता. यंदाचा ख्रिसमस खास करण्यासाठी तुम्ही भारतातील या प्रसिद्ध चर्चमध्येही भेट देऊ शकता.

Instagram

घराची रंगसंगती (Tone Down The Colour)

ख्रिसमसच्या सजावटीची रंगसंगती ही लाल, गुलाबी, व्हाईट या रंगाची असते. त्यामुळे ख्रिसमसच्या महिनाभर तुम्ही या रंगसंगतीने घराची सजावट करू शकता. बेड, खिडक्यांचे पडदे, डायनिंग टेबल क्लॉथ तुम्ही लाल आणि पांढऱ्या रंगाचे करू शकता. ज्यामुळे तुम्हाला ख्रिसमस जवळ आल्याचा फील सतत होत राहील. वर्षाचा शेवट आणि नववर्षाची सुरूवात करण्यासाठी घराच्या सजावटीची थीम अशी करण्यास काहीच हरकत नाही.

Instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम