कोरोनाच्या काळात प्रेग्ननंट महिलांनी अशी वाढवावी प्रतिकार शक्ती

कोरोनाच्या काळात प्रेग्ननंट महिलांनी अशी वाढवावी प्रतिकार शक्ती

गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि आनंदी अनुभव असतो. मात्र सध्या सर्व गर्भवती महिलांसाठी भीतीदायक परिस्थिती आहे. कोरोना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आधीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. कारण त्यांना आता स्वतःसोबत गर्भातील नवजात बाळाचीही काळजी घ्यायची आहे. अ‍ॅड्रोइट बायोमेड लिमिटेडचे स्ट्रॅटेजिक मेडिकल अफेयर्स डॉ. अनीश देसाई आणि वैद्यकीय व्यवहार कार्यकारी अधिकारी डॉ. सुनैना आनंद (फार्मा डी) यांच्या मते, संपूर्ण जग विशेषत: गर्भवती स्त्रिया सध्या संभ्रमात आहेत कारण त्यांना स्वतःचे आणि त्यांच्या जन्माला येणाऱ्या बाळांचे संरक्षण कसे करावे याबद्दल काहीच माहिती नाही. जगभरातील कोट्यावधी गर्भवती महिलांना कोविड 19 च्या संसर्गाचा धोका आहे. गर्भधारणेदरम्यान, आईचे शरीर वाढत्या गर्भाला सामावून घेण्यास सक्षम आहे याची खात्री रोगप्रतिकारक शक्ती देत असते. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीही प्रतिकार शक्ती मजबूत असण्याची गरज असते. म्हणूनच अशा संवेदनशील कालावधीत व्हायरस / बॅक्टेरिया किंवा इतर कोणत्याही रोगजनकांद्वारे हल्ला टाळण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं आहे.

व्हायरल इन्फेक्शन प्लेसेंटा ला पार करून गर्भापर्यंत पोहोचण्यास सक्षम असते, त्यामुळे इनफेक्शनचा बाळावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे संसर्गामुळे प्रसूती क्रियेदरम्यानही बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो. सध्याच्या काळात अशी अनेक उदाहरणे  घडली आहेत की ज्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन मुळे मुदतपूर्व कळा येऊन बाळाचा आधीच जन्म झाला. अशा समस्या टाळण्यासाठी या काळात गरोदर महिलांनी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

Shutterstock

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार का आहे महत्त्वाचा

या तणावग्रस्त परिस्थितीत, गर्भवती महिलांना हायड्रेटेड रहाणे, ताण कमी करणे, सौम्य शारीरिक श्रम किंवा हलका योग करणे, पुरेशी झोप आणि निरोगी आहार घेण्याचा तज्ञ्ज सल्ला देतात. गर्भधारणेदरम्यान अशा महिलांमध्ये कर्बोदके, प्रथिने, चरबीची आवश्यकता वाढते.  केवळ आईच नाही तर तिच्या गर्भाशयातल्या बाळालाही त्यांची आवश्यकता असते. त्यामुळे गरोदर स्त्रीने यासाठी पूरक आणि पोषक आहार घ्यावा. गर्भवती महिलांना फोलिक अॅसिड, जीवनसत्त्वे आणि लोह यासारखे पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ज्यांच्यामध्ये पोषक घटकांची कमतरता, मळमळ आणि उलट्या, एकापेक्षा अधिक गर्भधारणा, अयोग्य आहार इत्यादी आहे त्यांना या पुढील पूरक गोष्टीही खाण्यास सांगितल्या जातात. कारण गर्भधारणेदरम्यान न्यूट्रस्यूटिकल्स, अन्न पूरक सुरक्षित मानले जाते.

उत्तम संतुलित आहार

व्हिटॅमिन सी -

कारण या व्हिटॅमिनमुळे बाळाच्या शरीराची वाढ चांगली होते, आईच्या हाडांची शक्ती वाढते, जखमेवर उपचार केले जातात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते  आणि शरीरात लोह शोषण्याच मदत होते.

व्हिटॅमिन डी -

व्हिटॅमिन डी मुळे दात, हाडे आणि स्नायू निरोगी राहतात. मात्र पस्तीशी आणि चाळीशीनंतर शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू लागते. गरोदरपणात महिलांच्या शरीराला गर्भधारणा, गर्भाचे पोषण आणि सुलभ प्रसूतीसाठी या व्हिटॅमिनची जास्त गरज असते. त्यामुळे त्यानुसार आहारात बदल करायला हवेत. 


कॅल्शियम -

कॅल्शिअम हाडांच्या योग्य विकासात मदत होते. बाळाच्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी या काळात महिलांनी कॅल्शिअमयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. 


लोह -

गर्भधारणेदरम्यान, आई गर्भाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवते, म्हणून तिच्या शरीराती लोहाची मागणी पूर्वीपेक्षाही दुप्पट होते जेणेकरून रक्त पुरवठ्यात वाढ होते. यासाठीच गर्भवती महिलांना हिरव्या पालेभाज्या आणि सलाड खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तिच्या शरीराला पुरेसं लोह मिळू शकेल. 


झिंक -

झिंक डीएनएचे उत्पादन, दुरुस्ती आणि कामकाजासाठी जबाबदार आहे. शिवाय यामुळे सर्दीची लक्षणे देखील दूर होतात, बाळाची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी  आणि  आईने आजारपणापासून दूर राहण्यासाठी तिच्या आहारात झिंकचे योग्य प्रमाणात असलेले पदार्थ असावेत. 


 मॅग्नेशिअम -

 गर्भधारणेमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तीव्र उच्च रक्तदाब आणि अकाली प्रसव होण्याचा धोका वाढू शकतो आणि  मुदतपूर्व जन्मासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी गरोदर महिलांच्या आहारात मॅग्नेशिअमदेखील असायला हवे. 


आयोडीन -

गर्भाच्या वाढीसाठी आणि विशेषत: मेंदूच्या विकासासाठी  आयोडीन किती आवश्यक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आयोडीनचा मुख्य पूरवठा होत असतो मीठातून त्यामुळे या काळात महिलांनी आयोडीन युक्त मीठाचाच अन्नात समावेश करावा. 

 

सेलेनिअम -

 गर्भधारणेनंतर महिलांमध्ये थायरॉईड फंक्शनच्या विकृतीचा धोका निर्माण होतो.  त्यामागे खरंतर अनेक कारणं असू शकतात. मात्र थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आहारात सेलेनिअम असणं गरजेचं आहे. 

 

फॉलिक आम्ल -

मेंदू आणि मेरुदंडातील जन्मातील दोष टाळण्यासाठी हे शरीराला पुरेसे फॉलिक अॅसिड आवश्यक असते. जर तुमच्या आहारात फॉलिक अॅसिड पुरेसं असेल तर बाळाच्या मेंदूचा योग्य विकास होतो.


आले -

गरोदर महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवतो. यासाठी या काळात घरगुती उपचार करण्यासाठी आल्याचा उपयोग केला जाऊ शकतो. आलं प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करत असल्यामुळे तुम्ही त्यामुळे आजारपणापासून दूर राहता. यासाठी चहातून आलं टाकून पिण्याची सवय लावा. 

 


शेवटी,  गर्भधारणा ही एक गतिशील अवस्था आहे;  गर्भधारणेच्या टप्प्यावर रोग प्रतिकारशक्तीच्या वेगवेगळ्या यंत्रणा बदलू शकतात.  अशा संवेदनशील कालावधीत संक्रमणाविरूद्ध लढा आणि प्रतिकारशक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे.  न्यूट्रस्यूटिकल्स आहार पूरकांद्वारे रोगांचे प्रतिबंध किंवा उपचार प्रदान करतात.  जीवनसत्त्वांच्या कमतरतेच्या दुय्यम परिस्थितीस प्रतिबंध करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान हे अत्यंत महत्वाचे ठरते.

Shutterstock

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm