पूर्वीच्या काळी मातीच्या भांड्यांमध्ये जेवण केले जायचे. घरात वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी असायची. मातीचा तवा, मातीचा टोप, मडकं अशा भांड्यांमध्ये जेवण केले जायचे. खिशाला परवडणारी अशी मातीची भांडी असल्यामुळे स्वयंपाकघरात मातीची भांडी असायची. पण बजेटमध्ये असण्यासोबतच मातीची भांडी ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे देखील सिद्ध झाले आहे. मातीच्या भांड्यातून जेवल्यामुळे अनेक पोषक तत्वे मिळतात. हल्लीच्या काळात स्टील, कॉपर बॉटम अशी वेगवेगळी भांडी मिळत असल्यामुळे मातीची भांडी सर्रास आणि फार ठिकाणी मिळत नाहीत. पण अनेकांनी पुन्हा एकदा मातीची भांडी वापरायला घेतली आहेत. पण हल्लीच्या काळात मिळणारी मातीची भांडी ही मातीची आहेत की सिमेंटची ही ओळखता येणे फार कठीण आहे. तुम्ही आणलेली मातीची भांडी सिमेंटची आहे की नाही ते कसे ओळखता येईल ते अशा पद्धतीने जाणून घ्या.
मातीच्या भांड्यांना एक वेगळा सुगंध असतो. हे भांडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाणी किंवा कोणताही पदार्थ टाकल्यानंतर त्यातून एक वेगळा सुगंध येतो.
हे भांडे गरम झाल्यानंतर त्याचा रंग कालांतराने बदलतो. हे भांडे काळे किंवा चॉकलेटी रंगाचे असते. ते जर तुम्ही सतत वापरत असाल तर ते कालांतराने काळे पडत राहते. तुम्ही हे भांडे शेगडीवर वापरत असाल किंवा चुलीवर ते काळेच पडते.
मातीचे भांडे हे गुळगुळीत असते. त्यावर बारीक बारीक छिद्र असतात. हीच मातीची चव जेवण गरम झाल्यानंतर त्यामध्ये माती जात राहते. त्यामुळे जेवणाला चव येत राहते.
मातीचे भांडे आचेवरुन काढले तरी कितीतरी काळासाठी भांड्यामधील खाद्यपदार्थाला आदाण म्हणजेच उकळी येत राहते. हा पदार्थ जास्त काळासाठी गरम राहतो.
मातीची भांडी टिकली तर ती कित्येक वर्ष टिकतात. पण त्यावर जर जोरात दणका बसला तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते.( ही भांडी सहज साध्या धक्क्यांनी तुटत नाहीत त्यावर एखादा फटका पातळ असलेल्या ठिकाणी बसला तर ती तुटतात)
हल्ली मुंबई आणि मुंबई आसपासच्या ठिकाणी मातीची भांडी सर्रास मिळू लागली आहेत. मातीच्या भांडीचे फायदे वाचत अनेक जण मातीची भांडी घेतात खरी. पण ही भांडी मातीची असतातच असे नाही. बरेचदा काही गोष्टींअंती ही भांडी सिंमेंटची असल्याचे सिद्ध होते. तुम्ही आणलेले मातीचे भांडे सिमेंटचे आहे की नाही ते ओळखण्याची ही आहे सोपी पद्धत
सिमेंटचे भांडे गरम झाले की, त्यातून सुंगध नाही तर सिमेंटचा वास येत राहतो. सिमेंटचा वास इतका उग्र असतो की, तुम्हाला ते नक्कीच कळते.
सिमेंच्या भांड्यामध्ये जेवण करायला घेतल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हे भांडे पटकन गरम होते. मातीचे भांडे तुलनेने पटकन गरम होत नाही. ते तापायला थोडा वेळ लागतो.
सिमेंटच्या भांड्यात फोडणी करताना ती फोडणी पटकन करपते आणि त्यातून एक उग्र दर्प यायला लागतो. सिमेंटचे भांडे आचेवरुन उतरवल्यानंतर ते मातीच्या भांड्याच्या तुलनेत लवकर थंड होते.
सिमेंटचे भांडे स्वच्छ करणे हा सगळ्यात मोठा टास्क असतो. मातीचे भांडे अन्नपदार्थ सोडून देते. पण सिमेंटच्या भांड्यामधून मसाला निघणे थोडे कठीण असते. त्याला मसाला हा जास्त काळासाठी चिकटून राहतो.
सिमेंटच्या भांड्यांना मातीचा मुलामा दिलेला असतो.जर हे भांडे जास्त घासले की, थोड्यावेळाने त्याच्या आत असलेले सिमेंट दिसते.
सिमेंटचे भांडे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही त्यामुळे तुम्ही याची खातरजमा करत किचनमधून अशी सिमेंटची भांडी काढून टाका.