बिकिनी भागातील इनग्रोन हेअरचा त्रास असा करा कमी

बिकिनी भागातील इनग्रोन हेअरचा त्रास असा करा कमी

बिकिनी वॅक्सिंग हा वॅक्सिंगमधील नवा ट्रेंड आहे जो तसा जुना असला तरी आता महिला अगदी आवर्जून करुन घेतात. व्हजायनल स्वच्छतेचे महत्व जाणत हल्ली अनेक ठिकाणी हे वॅक्सिंग केले जाते. एकाचवेळी योग्यपद्धतीने केस निघण्यासाठी ही पद्धत योग्य असली तरी देखील काही जण आधी शेव्हिंग किंवा क्रिमचा उपयोग करुन मग वॅक्सिंगकडे वळतात. असे केल्यामुळेच इनग्रोन केसांचा त्रास होतो. ज्यामुळे केसांची वाढ ही एकसारखी होत नाही. शिवाय बिकिनीकडील जागाही अस्वच्छ आणि काळवंडलेली दिसते. बिकिनीकडील इनग्रोन हेअरचा तुम्हालाही असेल त्रास तर तुम्ही अशा पद्धतीने इनग्रोन हेअर करु शकता कमी

*बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

इनग्रोन हेअर म्हणजे काय?

शरीराच्या कोणत्याही भागावरील केस काढल्यानंतर त्या ठिकाणी नव्या केसांची मुळापासून वाढ होत असते. काही वेळा केस काढताना केसांची वाढ एकत्रितपणे होत नाही असे दिसते. काही केस हे त्वचेच्या आतच राहून जातात. ते बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागतो. हे केस त्वचेच्या आतच राहिले की, वर त्वचेची वाढ होत राहते. त्यामुळे अशा केसांना बाहेर येण्यासही अडथळा निर्माण होते. अशा केसांना बाहेर काढण्यासाठी प्लकरचा उपयोग केला जातो. तो आतून काढून मगच काढला जातो. जे अधिक डोकेदुखी देणारे ठरते. 

अनावश्यक केस काढण्यासाठीच नाही तर या कारणांसाठीही रिका वॅक्स आहे बेस्ट

 

असा कमी करा इनग्रोन केसांचा त्रास

Instagram

बिकिनीकडील भाग हा फार नाजूक असतो.आपण स्वत:च  तो भाग नीट पाहू शकत नाही. शिवाय तो भाग इतका झाकलेला असतो की, त्याला म्हणावा तितका ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तेथील केसांची वाढ असली तरी देखील इनग्रोन केसांचा त्रास या भागात सर्वाधिक असतो. प्लकरच्या मदतीने येथील एक एक केस काढणेही फार कठीण असते. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स 

  •  केसांची वाढ होऊ द्या पूर्ण 

जर तुम्हाला महिन्यातून एकदा बिकिनीवरील केस काढण्याची सवय असेल तर थोडा ब्रेक घ्या. साधारण आणखी 10 दिवस पुढे जात बिकिनीवरील केस काढू नका. जर तेथील केसांच्या मुळांची योग्य वाढ झाली की, त्वचेतून ते केस सहज बाहेर येण्यास मदत मिळेल. त्यानंतर जर तुम्ही केस काढले तर इनग्रोन केसांचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. 

  • करा स्क्रब 

कधी कधी इनग्रोन केसांचा त्रास इतका झालेला असतो की.तो सहजपणे निस्तरता येत नाही. इनग्रोन केस म्हणजे त्वचेच्या आत केस झाकला जाणे. त्याला वर येण्यासाठी जागाच मिळत नाही. केसांची छिद्र बंद झाल्यामुळे असे होते. अशावेळी स्क्रब केल्यामुळे तेथील पोअर्स उघडायला मदत होते. एखादे माईल्ड स्क्रब घेऊन बिकिनी भागावर रगडल्यामुळे तेथील त्वचा सैल होते. पोअर्स ओपन होतात. त्यामुळे केस निघण्यास मदत मिळते. 

  • रेझर टाळा 

अनेकदा रेझरचा उपयोग केल्यामुळेही इनग्रोन केसांची समस्या निर्माण होते. रेझर केस काढण्यासाठी सोप आणि काम वाचवणारा उपाय असला तरी देखील त्याच्या वापरामुळे त्वचेवर मृत त्वचा तयार होते. अशी मृत त्वचा तयार झाली की, इनग्रोन केसांचा त्रास उद्भवतो. त्यामुळे रेझरचा अति वापर करणे टाळलेलेच बरे!

 

आता बिकिनी भागातील इनग्रोन केसांची समस्या वारंवार उद्भवत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा.

कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स वापरुन झटपट आणि सुरक्षित पद्धतीने काढा अनावश्यक केस

Beauty

WIPEOUT Germ Killing Hand Cream

INR 149 AT MyGlamm