त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. आता फिटनेसचे महत्व लक्षात घेता अनेक जण फिटनेसच्या बाबतीतही फार सजग झालेले आहेत. पण फिटनेस आणि त्वचेची तुम्ही जितकी काळजी घेता तुम्ही दातांच्या स्वच्छतेकडे तितके लक्ष देता का? आजही अनेकांच्या कामांच्या किंवा काही करण्याच्या यादीमध्ये दातांची काळजी फारच कमी असते. खूप जण केवळ दात दुखल्यानंतरच दातांच्या डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे दातांच्या बाबतीत आपण किती सजग असतो हे आपल्याला यातून लक्षात आलेच असेल. अगदी साध्या साध्या गोष्टीतून आणि काळजींमधून दातांची स्वच्छता राखता येते. दातांच्या स्वच्छतेसाठी मिळणारा ‘डेंटल फ्लॉस’ चा उपयोग नेमका कसा करायला ते आज आपण जाणून घेऊया.
डेंटल फ्लॉस हा एक पांढऱ्या रंगाचा पातळसा दोरा असतो. ज्याच्या मदतीने दोन दातांमधील अडकलेली घाण काढण्यास मदत होते. तुमच्या दातांमध्ये जर अजिबात फट नसली असे जरी तुम्हाला वाटत असेल तरी देखील अशा फटींमध्ये जाऊन दातांमध्ये अडकलेले अन्न कण काढून टाकतो. दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकले की, दात कुसण्याची, दातांना दुर्गंधी येण्याची शक्यता असते. पण डेंटल फ्लॉसच्या मदतीने दातांमध्ये अडकलेले कण काढण्यास मदत होते. डेंटल फ्लॉस हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळतात. यामध्ये रिळ किंवा एखाद्या ट्विझरला लावलेल्या तारेप्रमाणेही डेंटल फ्लॉस मिळते. या दोन्ही फ्लॉसचे काम तुमच्या दातांची स्वच्छता करणे असते.
जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)
आता डेंटल फ्लॉस म्हणजे असा घट्ट दोरा जो काही केल्या तसा तुटत नाही. त्यामुळे तुम्हाला तशी घाबरण्याची शक्यता नसते. तुम्ही अगदी सहज यांचा वापर करु शकता. याचा वापर कसा करायचा ते आता जाणून घेऊया.
आता दातांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही अशाप्रकारे फ्लॉसचा उपयोग करा.
जाणून घ्या दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय- Home Remedies For Toothache In Marathi