ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
कोरोनाच्या काळात ऑफिस कॅंटीनमध्ये लंच करताना लक्षात ठेवा या गोष्टी

कोरोनाच्या काळात ऑफिस कॅंटीनमध्ये लंच करताना लक्षात ठेवा या गोष्टी

कोरोनामुळे आता माणसाच्या जीवनशैलीतच हळूहळू बदल होत चालला आहे. कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे आजही अनेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य दिलं जात आहे. मात्र ज्या ठिकाणी अशी सुविधा देणं शक्य नाही तिथे मात्र कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसला जाणं नक्कीच भाग आहे. खरंतर लॉकडाऊननंतर दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अशा काळात ऑफिसमध्ये लंच करताना अथवा कॅंटीनमध्ये काहिही खाताना काय काळजी घ्यावी हे तुम्हाला माहीत असायलाच हवं.

पूर्ण शिजलेले अन्न खा –

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जाहीर केलेल्या सूचनांनुसार घराबाहेर पडल्यावर काहिही खाताना अथवा पिताना काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे. असं असलं तरी आतापर्यंत खाण्यातून संक्रमण झाल्याचं कोणतंही उदाहरण आढळलेलं नाही. मात्र हा धोका टाळण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शिजवलेलं अन्न खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. सॅलेड, दही,सॅंडविच अथवा फळांचे रस असे पदार्थ खाणं  सध्या नक्कीच धोक्याचं ठरू शकतं. यासाठी ऑफिसमध्ये लंच करताना तुम्ही खात असलेले पदार्थ पूर्ण शिजलेले आहेत ना याची खात्री करून घ्या.

Shutterstock

ADVERTISEMENT

कॅंटीनमध्ये सुरक्षित अंतर पाळा –

जर कामानिमित्त कॅंटीनमध्ये खाण्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नसेल तर सुरक्षित अंतर पाळत तुम्ही तिथे नक्कीच खाऊ शकता. अन्नातून संक्रमण होत नसलं तरी सर्व्ह करणारे अथवा कॅंटीनमधील इतर माणसे यांच्या माध्यमातून संक्रमण होण्याचा धोका टाळता येणार नाही. यासाठीच कॅंटीनमध्ये खाताना सोशल डिस्टंसिंग पाळणं खूप गरजेचं आहे.

कॅंटीमधील कोणत्याही वस्तूला हात लावू नका –

जर तुम्हाला कॅंटीनमध्ये लंच करणं भागच असेल तर काहीच हरकत नाही. मात्र कॅंटीमध्ये जेवत असलाना तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. तुमची लंच प्लेट आणि पाण्याची बॉटल या व्यतिरिक्त तिथल्या कुठल्याच गोष्टीला स्पर्श करू नका. कारण तिथे असलेल्या टेबल, खुर्ची, ट्रे, मीठ आणि साखरेची भांडी, चमच्यांचे सॅंड अशा अनेक गोष्टींना तुमच्याआधी अनेकांनी हात लावलेला असू शकतो. शक्य असल्यास तुमच्यासोबत एक सॅनिटाईझर स्प्रे घेऊन जा आणि टेबल खुर्ची वापरण्यापूर्वी ते सॅनिटाईझ करा. कटलरीचा वापर करण्यापूर्वी ती टीश्यू पेपरने स्वच्छ करा आणि तुम्ही वापरलेले टीश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाकायला विसरू नका.

Shutterstock

ADVERTISEMENT

गाईड लाईन्स फॉलो करा –

जर तुम्हाला ऑफिसच्या कॅंटीनमध्ये सुरक्षितपणे लंच करायचा असेल तर आधी स्वतः सर्व गाईडलाईन्स नीट पाळा. कारण जर तुम्ही स्वतःपासून सुरुवात केली तर इतरही त्याचे अनुकरण करू शकतील. शिवाय तुम्ही स्वतः नियम पाळत असाल तरच इतर लोकांना नियम न पाळल्यावर सूचना करण्याचा तुम्हाला अधिकार राहील. जर ऑफिस कॅंटीनमध्ये काही गाईड लाईन्स दिलेल्या असतील तर त्या काटेकोरपणे पाळा. ज्यामुळे तुमचे आणि इतरांचे आरोग्य सुरक्षित राहील.

आम्ही सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. घराबाहेर पडल्यानंतर योग्य ती काळजी घ्या आणि कोरोनाच्या काळातही सुरक्षित आणि निरोगी राहा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

उपाशीपोटी सकाळी उठून सर्वात पहिले काय खायला हवे, जाणून घ्या

सुटलेल्या पोटाचा घेर सांगतो तुमच्या शरीरातील कमतरता

हिवाळ्यात ही हंगामी फळं खाण्यामुळे पडणार नाही आजारी, जाणून घ्या फायदे

30 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT