सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

सिंह राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना आहे 23 जुलै ते 22 ऑगस्ट. या राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या व्यक्ती उत्तम लीडर असतात. तसंच या व्यक्तींचा आत्मविश्वास अफाट असतो आणि त्यामुळे समोरच्या माणसावर या व्यक्ती त्यांची छाप सोडतात. तसं तर या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. आपल्या कामात अत्यंत इमानदार असून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडूनही या व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा मनात बाळगतात. पण या व्यक्तींना कोणाचा त्रास झाला तर त्या व्यक्तींना अजिबात या व्यक्ती माफ करत नाहीत. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती जर सिंह राशीची असेल तर ती नक्की अशीच आहे का हे तुम्ही हा लेख वाचून नक्कीच ठरवू शकता. तुमच्या आयुष्यातील सिंह राशीच्या व्यक्तींना करा टॅग आणि जाणून घ्या त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. 

मिथुन राशींच्या व्यक्तिंची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव Leo sign people Positive and Negative Characteristics in Marathi

ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक माणसाचा जन्म हा वेगळ्या वेळी आणि महिन्यात होत असतो त्यानुसार त्याचा स्वभाव आणि इतर गोष्टीही बदलत असतात. प्रत्येक राशीचे वेगळे वैशिष्ट्य असते. याच आधारावर त्या व्यक्तीचा चांगुलपणा आणि वाईटपणा ठरत असतो. आपण या लेखातून सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घेणार आहोत. 

 • राशीचा स्वामी सूर्य असल्याने या व्यक्तींमध्ये नेतृत्वाचा गुण असतोच. प्रत्येक कामामध्ये या व्यक्ती पुढे असतात. ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत या व्यक्ती येतात
 • या व्यक्तींना आपल्या भावनांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात. अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात
 • सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक चढउतार असतात. पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं. आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींना अभिमान असतो. त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच अंशी गर्विष्ठही असतात
 • ऑगस्टमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तींना आपली प्रशंसा ऐकायला खूपच आवडते. तसंच या व्यक्तींना स्वतःबद्दल फुशारकी मारायलाही जास्त आवडते
 • या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा खूपच उत्साही असतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे सर्व काही. सुरूवातीला रोमँटिक डेट्स, गिफ्ट्स आणि आपल्या जोडीदाराची भरपूर काळजी या राशीच्या व्यक्ती घेतात. पण एकदा का त्यांच्या प्रेमाची कबुली मिळाली की या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या माणसाही गृहीत धरतात. यांचे प्रेम स्वीकारल्यानंतर या व्यक्तींचा गर्व अधिक बळावतो

कर्क राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व असते हसमुख, जाणून घ्या वैशिष्ट्ये

 • परफेक्ट मॅच म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तूळ राशीच्या व्यक्ती योग्य आहेत. ही जोडी स्वर्गातूच तयार होऊन आली असल्यासारखे हे परफेक्ट मॅच आहे. दोन्ही व्यक्ती एकमेकांविषयी आदर राखतात आणि प्रेमही व्यक्त करतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी या व्यक्तींना वेळ लागत नाही. एकमेकांना कसं आनंदी ठेवायचं हे या व्यक्तींना योग्यरित्या माहीत असतं. प्रेमाच्या बाबतीत या दोन्ही राशीच्या व्यक्ती एकमेकांना सांभाळून घेतात. या दोघांमधील सामंजस्य पाहून इतर व्यक्तींना नक्कीच यांचा हेवा वाटतो
 • ज्या राशीचे प्रतीकच सिंह आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असणार? तुम्हाला वेगळा अंदाज लावण्याची गरज भासत नाही. यांचा राग कोणालाही आवरता न येणारा असतो. राग आल्यावर या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते आणि या व्यक्ती स्वतःदेखील स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण या व्यक्तींना योग्य कारणांसाठीच राग येतो. कधीकधी आपला राग चुकीचा आहे हे कळल्यावर स्वतःहून माफी मागणंही या व्यक्तींना जमत नाही. 
 • या व्यक्तींना खूपच आत्मविश्वास असतो. लोकांचं ऐकलं तरीही स्वतःच्या मनाचेच निर्णय घ्यायचे हे यांचे वैशिष्ट्य
 • करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास या व्यक्ती अतिशय प्रतिभावान असतात. तसंच पैसा कसा कमवायचा याकडे यांचे जास्त लक्ष असते. या व्यक्ती चांगल्या उद्योगपती, इंजिनिअर, शिक्षक अथवा कलाकार होऊ शकतात. तर बोलण्याच्या बाबतीतही या व्यक्ती पुढे असतात. पण फिल्डवर्कच्या बाबतीत मात्र या व्यक्ती जरा कमी असतात
 • या व्यक्ती अतिशय आळशी असतात. एखादी गोष्ट कोणाहीसाठी केली तर ती केल्याबद्दल सतत या व्यक्ती ऐकवत राहतात. आळस इतका जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामाकडेही दुर्लक्ष करतात. आपल्या मनाचे हे राजा असतात. एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट कशी टाळायची याचे अनेक उपाय या व्यक्तींकडे असतात. मेहनतीच्या कामापासून जास्तीत जास्त दूर राहाता येईल असाच यांचा प्रयत्न असतो. 
 • आपल्या जवळच्या व्यक्तीने त्याच्या मनातील आपली जागा दुसऱ्याला देऊ नये याच गोष्टीची यांना भीती असते. नातं असो अथवा नोकरी असो. ज्यांच्याकडून प्रेम आणि प्रशंसा मिळेल अशाच व्यक्तींना या व्यक्ती आपलं मानतात. 
  पैशाच्या बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात. यांना नेहमी कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. पण खर्च करताना या व्यक्ती खूपच कंजूष असतात. 

वृषभ राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, यांच्यासाठी परफेक्ट मॅच काय आहे घ्या जाणून

भाग्यशाली क्रमांक – 2, 4, 9, 10, 34

भाग्यशाली रंग – सोनेरी, पांढरा आणि लाल

भाग्यशाली दिवस – शुक्रवार आणि रविवार

भाग्यशाली खडा – माणिक, पुखराज (पुष्कराज)

सिंह राशीचे बॉलीवूडमधील कलाकार - काजोल, हुमा कुरेशी, सैफ अली खान, मनीषा कोईराला, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडीज, सुनील शेट्टी, अरबाज खान, कृति सेनन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक