जास्त वय असल्यावरही होता येतं आई, माईल्ड आयव्हीएफचा करा उपचार

जास्त वय असल्यावरही होता येतं आई, माईल्ड आयव्हीएफचा करा उपचार

आई होण्याचं स्वप्न पाहणा-या वयाने जास्त असलेल्या महिलांना 'माइल्ड (सौम्य) आयव्हीएफ' उपचारपद्धती हा एक आशेचा किरण आहे. स्टिम्युलेशन स्ट्रॅटेजीच्या ( उत्तेजन धोरणाच्या) प्रकारानुसार आय व्ही एफचे तीन प्रकार आहेत – ‘कन्व्हेंशनल (पारंपारिक किंवा नेहमीचे) आयव्हीएफ’’, ‘नॅचरल सायकल (नैसर्गिक चक्र) आयव्हीएफ’’ आणि ‘माइल्ड (सौम्य) आयव्हीएफ’’. वंध्यत्वाच्या समस्येवर जगभरात ‘कन्व्हेंशनल आयव्हीएफ’ ची निवड सर्वाधिक केली जाते. या ‘कन्व्हेंशनल आयव्हीएफ’’ उपचारपद्धतीत बऱ्याचवेळा मोठ्या संख्येने स्त्रीबीजं मिळतात. ज्यामुळे जास्त एम्ब्रियोचे (भ्रूण) निर्माण शक्य होते व त्यातील एक वा दोन एम्ब्रियो गर्भाशयात ट्रान्सफर केल्यावर उरलेले चांगले एम्ब्रियो (भ्रूण) असतील ते क्रायोप्रिझरव्हेशन करून, नंतर त्या स्त्रीला जरूर असल्यास (परत अंडाशयाच्या उतेजनाशिवाय) उपलब्ध होतात. काही ‘कन्व्हेंशनल आय व्ही एफ’ उपचारपद्धती महिलांना शारीरिक व मानसिक द्रूष्ट्या ताणाच्या वाटणे शक्य आहे. तसेच ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (ओ एच एस एस) सारखी गुंतागुंत होण्याचा धोका त्यात असू शकतो. याबद्दल अधिक माहिती घेताना ‘POPxo मराठी’ने चर्चा केली डॉ. स्नेहा साठे, फर्टिलिटी कन्सल्टंट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी,मुंबई यांच्याशी. ‘माइल्ड आयव्हीएफ’’ उपचार पद्धत विकसित करण्याचा हेतू हा पेशंटसाठी अधिक अनुकूल, कमी खर्चिक उपचारपद्धत व कमी धोके/ जोखीम असलेली पद्धत वापरावी हा आहे. ही पद्धत सर्वांसाठी योग्य आहे का? या पद्धतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय...तर करा नैसर्गिकरित्या उपचार

‘माइल्ड आय व्ही एफ’ म्हणजे काय

Shutterstock

‘माइल्ड आय व्ही एफ’ या उपचारपद्धतीत औषधांचा डोस कमी व/ किंवा कमी काळासाठी वापरला जातो. ही औषधे महिलेला तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे दिली जातात. ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (ओ एच एस एस) सारखी गुंतागुंत होण्याचा धोका कमी केला जातो. ‘माइल्ड आयव्हीएफ’’ मध्ये स्त्रीबीजांची उत्पत्ती कमी होते. पण ही स्त्रीबीजे चांगल्या प्रतीची असण्याची शक्यता जास्त असते.

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

‘माइल्ड आयव्हीएफ’ ’ कोणासाठी योग्य आहे?

ही उपचारपद्धत सर्व स्त्रियांसाठी योग्य नाही. अजूनही यशाचा दर पाहिला तर, ॲंटागोनिस्ट प्रोटोकॅाल, गोनॅडोट्रॅापिन योग्य डोस असलेली इंजेक्शन्स (जी पेशंटच्या वैयक्तिक प्रोफाइल ला योग्य असतील) आणि बरोबर देखरेख या प्रमाणे उपयोगात आणलेली ‘कन्व्हेंशनल आयव्हीएफ’’ उपचार पद्धतीची निवड पहिली असू शकते. ज्या स्त्रियांचे वय जास्त असते किंवा ज्यांच्या अंडाशयात स्त्रीबीजं कमी प्रमाणात तयार होतात किंवा ज्यांच्यात ‘कन्व्हेंशनल आयव्हीएफ’ चा फायदा दिसून येत नाही अशा स्त्रियांना ‘कन्व्हेंशनल आयव्हीएफ’ चे सुरूवातीचे साइकल (चक्र) अयशस्वी झाल्यानंतर ‘डोनर एग’ (दुसऱ्या दात्या स्त्रीचे स्त्री बीज घेण्याचा) चा पर्याय बऱ्याच वेळा दिला जातो. बऱ्याच जोडप्यांना ‘डोनर एग’ ची कल्पना तेवढी पसंत नसते व त्यांना स्वत:चे स्त्रीबीज वापरण्यासाठी परत प्रयत्न करायचा असतो. अशा महिलांना ‘माइल्ड आय व्ही एफ’ चा फायदा होऊ शकतो. ज्या महिलांना पॅालिसिस्टिक ओव्हेरिसयन सिंड्रोम (पीसीओएस) असतो त्यांना ‘ कन्व्हेंशनल आयव्हीएफ’ उपचार पद्धतीमध्ये ओ एच एस एस चा धोका अधिक असतो, त्यांच्यासाठीसुद्धा  ‘माइल्ड आयव्हीएफ’’ चा विचार होऊ शकतो.

‘माइल्ड आयव्हीएफ’ तुमच्यासाठी योग्य उपचारपद्धत आहे का हे जाणण्यासाठी तुमच्या डॅाक्टरांबरोबर सल्लामसलत करा.

गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक