मनापासून मागायची असेल माफी तर खास तुमच्यासाठी सॉरी कोट्स (Sorry Quotes In Marathi)

sorry quotes in marathi

बरेचदा आपल्याला समोरच्याला काहीतरी वेगळं म्हणायचं असतं मात्र रागाच्या भरात असे काहीतरी शब्द निघून जातात की आपल्या जवळच्या माणसांना आपण दुखावतो. शब्द हा खरं तर बाणच आहे. एकदा सुटला की सुटला. पण अशावेळी मनापासून मागितलेली माफी सर्व काही नीट करते. काही वेळा ही शब्दांची जखम तशीच राहते पण किमान शब्दांनीच पुन्हा माफी मागून आपण आपल्या आणि समोरच्यातील दुरावा कमी करू शकतो. पण कधी कधी जर माफी मागायची असेल तर नक्की काय सांगायचं किंवा कोणते शब्द वापरायचे हे प्रत्येकाला कळतंच असं नाही. मग त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास माफी स्टेटस मराठीमध्ये (sorry quotes in marathi) घेऊन आलो आहोत. तुम्ही अशा शब्दात समोरच्याला सॉरी म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला माफी मिळेल. विशेषतः गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जास्त भांडणं होतात. अशावेळी अथवा मित्रमैत्रिणींना पाठवायला मेसेज लागतात. काही वेळा नुसती माफी मागूनही काम चालत नाही. कधी कधी समोरून पुन्हा बोलायला हिंमत होत नाही. मग अशावेळी तुमच्या मदतीला धाऊन येतात ते माफी स्टेटस (sorry status in marathi). असे स्टेटस तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना पाठवून त्यांना पुन्हा एकदा मनवू शकता. तर तुम्ही सॉरी शायरीही मराठीतून पाठवू शकता. असेच काही मनापासून माफी मागितलेले मेसेज, स्टेटस आणि कोट्स खास तुमच्यासाठी या लेखातून आम्ही देत आहोत.

Table of Contents

  माफी कोट्स मराठीमध्ये (Sorry Quotes In Marathi)

  Canva

  माफी मागणे हे काही खायचे काम नाही. कधी कधी माफी मागताना शब्द अपुरे पडतात. मग अशावेळी कामी येतात ते माफी कोट्स. असेच काही माफीचे कोट्स तुमच्यासाठी मराठीमधून.

  1. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी सॉरी
  माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूसाठी सॉरी
  तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी मी मनापासून माफी मागत आहे 

  2. चुकी कोणाचीही असू दे 
  नेहमी माफी तीच व्यक्ती मागते
  जिला नात्याची गरज असते 

  3. कोणी चुकले तर त्याला मनापासून क्षमा करावी
  कारण माणसापेक्षा चूक मोठी नक्कीच नसते 

  4. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे 
  चुकीची स्वप्नं पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे
  चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे 

  5. जे भांडल्यावर क्षमा मागतात ते त्यांची चूक असते म्हणून नाही 
  तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून 

  6. आपल्याला जवळच्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा नसते 
  तर त्याने केलेली चूक परत करू नये इतकीच अपेक्षा असते
  त्यामुळे माफी मागितली तरीही ती चूक पुन्हा घडू नये याची खबरदारी जास्त घ्यावी 

  7. माफी मागताना केवळ माफी मागू नये 
  तर ती चूक पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी यातच सर्व आलं 

  8. चूक झाल्यावर सॉरी बोलणं हे सहज सोपं आहे
  पण बोलताना विचार केला तर ही वेळ येणारच नाही याचाही विचार व्हावा 

  9. मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकीचा आहे असा होत नाही
  पण माफी यासाठी मागतो कारण मला तुला गमवायची भीती असते 

  10. माफी देण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं 
  आणि ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही

  11. नेहमी चुकीचा असल्यावरच माफी मागायची असं नाही
  कधीतरी नातं टिकविण्यासाठीही सॉरी म्हणावं लागतं 

  12. तुझ्या भावना दुखावल्याबद्दल मला माफ कर
  मी मनापासून तुझी माफी मागत आहे 

  13. ज्या दिवसापासून मी तुला त्रास दिला आहे 
  त्या दिवसापासून मलाही त्रास होत आहे
  तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी 

  14. मी खूपच वाईट वागत आहे आणि त्यासाठी मनापासून तुझी माफी मागत आहे 

  15. नुसती माफी मागून काहीच होत नाही. 
  चूक झाल्यानंतर ती सुधारून पुन्हा न वागणं हे खरं माफी मागण्याचं लक्षण आहे

  वाचा - कधी कधी रडवणारे कोट्सही देतात आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा

  माफी स्टेटस मराठी मध्ये (Sorry Status In Marathi)

  Canva

  अनेकदा हल्ली व्हॉट्सअपवर आपण स्टेटस ठेवतो. कधीकधी समोरच्याला पटकन सांगता येत नाही. मग अशावेळी अशा स्वरूपाचे स्टेटस ठेऊन समोरच्याला आपल्याला मनापासून वाईट वाटलं आहे हे सांगता येतं. मग माफी स्टेटस येतात मदतीला. 

  1. मी जे काही आता तुला बोललो आहे त्यासाठी मनापासून सॉरी

  2. कृपया जे काही झालं आहे त्यानंतर माझ्याशी बोलणं थांबवू नकोस, 
  जे काही झालं त्यासाठी मनापासून माफी मागत आहे 

  3. मला माहीत आहे काही वेळा केवळ माफी मागून चालत नाही 
  बदलणंही तितकंच गरजेचे आहे 

  4. वागण्यात बदल आणणं हीच खरी माफी मागण्याची योग्य पद्धत आहे...अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही

  5. तुला काहीही बोलणं ही माझी चूक होती. मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे. तुला दुखावलं त्यासाठी सॉरी. कधीतरी असा दिवस येईल जेव्हा तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

  6. तू जसे स्वप्नं पाहिलेस तशी मी नाही यासाठी मला माफ कर. पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजी नाही

  7. रूसून बसणं किंवा रागावून बसणं ही कधीही चांगलं नाही. मात्र माफ करणं हा मनाचा मोठेपणा आहे आणि तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

  8. मीदेखील माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात. बस ही गोष्ट समजून घे आणि राग सोडून मला माफ कर

  9. मी न केलेल्या चुकांसाठी माफी मागून मला थकायला झालं आहे. पण आपलं नातं वाचविण्यासाठी मी हे करत आहे हे लक्षात घे 

  10. आपल्या चुका स्वीकारून त्याची माफी मागणे सर्वांनाच जमतं असं नाही. केवळ मनाने बळकट असणारी व्यक्तीच हे करू शकते 

  11. समोरच्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळी मला वागायला जमेलच असं नाही. पण नाही वागता आलं तर नक्कीच त्यासाठी मनापासून माफी

  12. माफी मागायची मला सवयच लागली आहे असं आता वाटायला लागले आहे

  13. आपल्या नात्यात बऱ्याचदा माझा अहंकार आड येत आहे आणि त्यासाठी तुझी मनापासून मला माफी मागायची आहे. तुझं नेहमी मन दुखावल्याबद्दल सॉरी

  14. माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुझ्याशी भांडण केल्याबद्दल मनापासून माफी 

  15. तुला दुखावून मी स्वतःला जास्त दुखावलं आहे. तुला समजून न घेता तुझ्यावर आरोप केल्याबद्दल मला तुझी मनापासून माफी मागायची आहे

                                                                                       वाचा - कडक आणि रूबाबदार स्टेटस मराठीत

  माफीचे मेसेज मराठीतून (Sorry Messages In Marathi)

  canva

  अनेकदा समोर बसून माफी मागणं थोडं कठीण होतं. मग अशावेळी एखाद्याला पटकन मेसेज करून माफी मागणं सोपं होतं. असेच काही माफीचे मेसेज खास तुमच्यासाठी मराठीतून 

  1. तुला इतकं दुखावल्याबद्दल मला तुझी मनापासून माफी मागायची आहे. मला जे म्हणायचं होतं ते मी शांत शब्दात सांगायला हवं होतं. पण तसं झालं नाही आणि तुला दुखावलं त्यासाठी सॉरी

  2. आपण भांडतो तेव्हा मला खूपच त्रास होतो. पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा मला कळतं की सर्व चूक ही माझीच होती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि झालेल्या गोष्टीसाठी मला माफ कर

  3. पुन्हा असं होणार नाही असं सांगूनही मी कुठे ना कुठेतरी चूक करतेच. मला कृपया समजून घे. मला तुला गमवायचं नाही. मनापासून सॉरी

  4. तुला दुखवायचं हा हेतू माझा अजिबातच नव्हता, पण भावनेच्या भरात आणि विचारांवर नियंत्रण न राहिल्याने शब्द निघाले. मला माफ कर

  5. मला तुला दुखवायचं नव्हतं हे तुलाही माहीत आहे पण रागाच्या भरात माझ्या तोंडून असे शब्द निघाले. त्यामुळे तू दुखावली गेली आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच मला मनापासून माफी मागायची आहे

  6. जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर इतकंच सांगायचं आहे आणि जे काही झालं त्यासाठी मनापासून माफी मागायची आहे. तुला माफ करण्यासाठी जितका वेळ हवा तो घे. पण कृपया मला माफ कर

  7. मी सध्या केवळ वेदनेत तळमळत आहे. मला प्लीज माफ कर आणि एकदा मला रिप्लाय दे

  8. यापुढे तुला त्रास होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेईन आणि अगदी भांडणातही तुला दुखावणार नाही याची काळजी घेईन. प्लीज मला माफ कर

  9. मी चूक केली आहे आणि त्याची तू मला सजा द्यावीस असं मला वाटत आहे. पण म्हणून माझ्याशी बोलणं सोडून देऊ नकोस कारण मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला माफ कर

  10. मी तुझ्यावर वाट्टेल तसा आणि सगळ्यांसमोर राग व्यक्त केला जे मी करायला नको होतं. त्यासाठी मी तुझी हात जोडून मनापासून माफी मागत आहे. तुला जितका वेळ घ्यायचा तो घे पण मला माफ कर

  11. मी राग आल्यानंतर काहीही विचार न करता बोलत सुटते आणि त्याचा तुला त्रास होतो हे मला माहीत आहे. त्यासाठीच मी तुझी माफी मागायला हा मेसेज करत आहे. कारण समोर येऊन माफी मागण्याची माझ्यात कदाचित हिंमत नाही

  12. मी जे काही केलं ते अत्यंत चुकीचे होते आणि त्यासाठी मनापासून सॉरी

  13. माझ्या खोटं बोलण्यामुळे तुला त्रास झाला आणि ते साहजिक आहे. पण तुला दुखवण्यासाठी मी खोटं बोललो नाही. त्यामुळे कृपया नक्की काय परिस्थिती होती ते समजावून सांगण्याची एक संधी मला दे आणि मला माफ कर

  14. आपल्या दोघांमधील दुरावा कधी कमी होईल मला माहीत नाही पण त्याची पहिली पायरी म्हणून मला तुझी माफी मागायची आहे

  15. पुन्हा एकदा माफ करून मला तुझ्या मिठीत घे. कारण तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. मला माफ कर

  वाचा - एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस (Alone Quotes In Marathi)

  पतीसाठी माफी मेसेज (Sorry Message For Husband In Marathi)

  Canva

  हे तसं तर कठीण काम आहे. पण तरीही बरेचदा आपण चुकलो आहे हे पतीसमोर व्यक्त करणंही तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी मराठीतून काही माफीचे मेसेज

  1. मी चुकले आहे आणि मला माहीत आहे तू माझ्यावर जास्त काळ चिडून बसणार नाहीस. मला माफ कर

  2. रागाच्या भरात मी काहीही बोलले तरीही तू नक्कीच समजून घेतोस पण तू दुखवालाही जातोस हे मला माहीत आहे आणि त्यासाठी मला तुझी मनापासून माफी मागायची आहे

  3. नवरा म्हणून तू अत्यंत चांगला आहेस, पण कधी कधी माझ्याकडून होणारी चिडचिड ही चुकीची असते आणि त्यासाठी सॉरी

  4. तू इतका चांगला वागूनही माझ्याकडून वाईट वागलं गेलं आणि त्यासाठी मला स्वतःचीच लाज वाटत आहे. मला तुझी माफी मागायची आहे

  5. माझ्या प्रत्येक हास्यामागे तूच आहेस आणि काल रागाच्या भरात मी तुला काहीही बोलले त्यासाठी मला तुला सॉरी म्हणायचं आहे

  6. जगात कोणाहीपेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. काल मी तुझ्यावर रागावले आणि तुझं ऐकलं नाही त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

  7. तुला दुखवाल्याबद्दल मनापासून सॉरी. मी पुन्हा असं होऊ देणार नाही याची खात्री बाळग. ही चूक पहिली आणि शेवटची असेल

  8. मी जे काही वागले त्याबद्दल मला आता जाणवले आहे आणि त्यासाठी तुझी मनापासून माफी

  9. जे काही वागले आणि त्यानंतरही तुझ्यावरच रागावून बसले यासाठी सॉरी. मला माझी चूक समजली आहे आणि तू मला यासाठी माफ नक्कीच करशील अशी मला आशा आहे

  10. मी अशी चूक केली आहे ज्यासाठी मी तुला जन्मभर सॉरी म्हणायला तयार आहे पण तू मला माफ कर कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही

  11. मी तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी

  12. तू सर्वात चांगला आणि काळजी घेणारा व्यक्ती आहेस आणि तरीही मी तुला दुखावलं. त्यासाठी मनापासून माफी

  13. तू इतर नवऱ्यांसारखा नाहीस आणि मला त्रासही देत नाहीस. खरं तर माझाच तुला बऱ्याचदा त्रास होतो आणि त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

  14. मला तुझी खूप आठवण येत आहे. तुझ्याशी भांडून इथे निघून आल्यावर मला माझी चूक कळली. मला माफ कर

  15. मला तुझी रागवण्याची पद्धत आवडली नाही पण मला कळलं की चूक माझीच आहे. त्यामुळे मनापासून सॉरी

  वाचा - दु:खात साथ देतील अशा शायरी (Marathi Shayari Sad)

  बायकोसाठी सॉरी मेसेज (Sorry Message For Wife In Marathi)

  Canva

  बायकोला बऱ्याचदा असंच गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे दुखावलं जातं. पण आपलं नातं जपायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. पण तिलाही सॉरी म्हणणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे असेच काही मेसेज

  1. तू जगातील सर्वात चांगली बायको आहेस. पण तरीही मी तुला दुखावतो त्यासाठी तुझी मनाासून माफी मागतोय

  2. तू जे सांगतेस ते माझ्या चांगल्यासाठी आणि पुढे चांगलं व्हावं यासाठीच आहे मला माहीत आहे. पण कधीकधी मला ते कळत नाही आणि मी रागावतो त्यासाठी सॉरी

  3. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो आणि तू मला नक्की माफ करशील अशी मला आशा आहे

  4. आपलं नातं अधिक घट्ट व्हावं असं मला वाटत आहे आणि चूक माझी होती त्यासाठी मला माफ कर

  5. मी जे काही केलं ते मुद्दाम केलं नाही अथवा तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला प्लीज माफ कर

  6. माझा स्वभावच असा आहे हे तुला माहीत आहे आणि मी सतत तुला गृहीत धरते यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

  7. कितीही काहीही झालं तरीही मी तुला इतके वाईट शब्द बोलायला नको होते आणि म्हणूनच मला तुझी माफी मागायची आहे

  8. तू मला नेहमीच साथ देत आली आहेस आणि तरीही मी मात्र तुला हवं तेव्हा तुझ्याबरोबर नसतो आणि मला त्याची खरंच मनापासून लाज वाटत आहे. कारण मला तुझ्यासाठी वेळ काढायला हवा होता. त्यासाठी खूप खूप सॉरी

  9. तुझ्याशिवाय माझं जगच नाही. तू माझ्यावर रागावून बसू नकोस. तू बोलली नाहीस तर मला त्रास होत राहातो. मला माफ कर

  10. तू माझं संपूर्ण जग आहेस आणि तरीही मी तुला दुखावतो त्यासाठी सॉरी

  प्रियजनांसाठी माफी (Sorry Quotes In Marathi For Loved One)

  Canva

  प्रिय व्यक्तींना आपण वाटेल तसं बोलतो. पण हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या लक्षात आल्यानंतर तरी किमान त्यांची माफी मागणं गरजेचे आहे. 

  1. तुझ्यासाठी मी कधीही काहीही केलं नाही. नेहमीच तुला गृहीत धरलं त्यासाठी मनापासून सॉरी

  2. तू माझ्या जवळची आहेस कदाचित म्हणूनच मी तुला नेहमी दुखावतो. मनापासून तुझी माफी मागायची आहे

  3. सर्वात जवळच्या व्यक्तीलाच काहीही बोललं जातं पण ते चुकीचं आहे आणि म्हणूनच सॉरी

  4. मला तुला कधीही दुखवायचं नव्हतं पण माझा माझ्यावर ताबा राहिला नाही आणि तुला दुखावलं गेलं. त्यासाठी मनापासून सॉरी

  5. मला कळतं पण वळत नाही आणि तरीही तू माझी साथ तशीच देतोस. दुखावल्याबद्दल सॉरी

  6. मी जे काही केलं आहे त्यासाठी मी स्वतः स्वतःला माफ करू शकत नाही. पण तुझं मन मोठं आहे आणि तू मला माफ करावं असं मला वाटत आहे

  7. माफी ही वागण्यातून येते हे मला माहीत आहे आणि यापुढे मी तुला नक्की दाखवून देईन. मला प्लीज माफ कर

  8. तुझ्याइतका अप्रतिम मित्र मला जगात कुठेही मिळणार नाही. पण तुला दुखावलं आहे त्यासाठी सॉरी

  9. मी तुझ्याकडूनच अपेक्षा करते आणि म्हणूनच माझी चिडचिड झाली. पण मी असं वागायला नको होतं. त्यासाठी मनापासून माफी 

  10. माझ्या मनात काय आहे हे तुझ्याशिवाय कोणालाच कळणार नाही. त्यामुळे मी तुला मुद्दाम नाही दुखावलं. मला प्लीज माफ कर

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक