सुंदर आणि स्टायलिश दिसणं कोणाला आवडत नाही. सौंदर्याचे मोजमाप रंग, रुप, शरीराचा आकार यावरून केले जाऊ नये. पण समाजात आजही रंग,रूप,बॉडी साईजवरून भेदभाव केला जातो. खरंतर स्टायलिश दिसण्यासाठी या सर्व गोष्टींची नाही तर तुमच्याकडे फॅशन सेंस असण्याची गरजेचं आहे. कोणतंही रंगरूप आणि शारीरिक ठेवण असलेली व्यक्ती तिच्या कपड्यामुळे फॅशनेबल दिसत असते. यासाठी कपडे निवडताना आणि त्यासोबत स्टाईल कॅरी करताना थोडंसं सावध असणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्यासोबत अशाच काही प्लस साईजसाठी स्टायलिंग टिप्स (Tips For Plus Size Women In Marathi) शेअर करत आहोत. ज्या फॉलो करून प्लस साईजच्या मुली नक्कीच सुंदर आणि आकर्षक दिसू शकतात.
ड्रेस, ब्लाऊज मध्ये सर्वात महत्त्वाची असते ती फिटिंग…. कारण फिटिंगनुसार तुमच्या बॉडी शेप लोकांना दिसत असतो. यासाठी कोणताही ड्रेस निवडताना तो अती ढगळ आणि अती घट्ट नसेल याची काळजी घ्या. फिटिंगमध्ये योग्य बॅलन्स साधता आला तर कोणतेही कपडे तुम्हाला नक्कीच सूट होऊ शकतात. कारण अती ढगळ कपड्यांमध्ये तुम्ही लठ्ठ वाटता त्याप्रमाणे अती तंग कपड्यांमध्ये तुमचा बॉडी शेप चुकीच्या पद्धतीने दिसू शकतो. यासाठीच कपडे निवडाताना प्लस साईजसाठी स्टायलिंग टिप्स अवश्य लक्षात ठेवा.
खंरतर बारीक दिसण्याचा हा एक नियमच आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. प्रत्येक ड्रेसमध्ये परफेक्ट दिसायचं असेल तर त्यासोबत शेपवेअर घालणं खूप फायद्याचं ठरेल. यासाठी आजच तुमच्या वॉर्डरोबमध्ये शेपविअर ठेवण्यास सुरूवात करा. तुमच्या लुकला स्टायलिश करण्याचा हा एक बेस्ट पर्याय आहे. बऱ्याचदा अती लठ्ठ व्यक्तीच्या पोट, पाय, मांड्या आणि नितंबावर जास्त फॅट जमा होतं. शेपविअरमुळे हा भाग शेपमध्ये दिसू लागतो. शेपवेअर घालून तुम्ही एखादी स्किनी पॅंट अखवा पार्टीवेअर गाऊन सहज कॅरी करू शकता.
फॅशनचे ट्रेंड सतत बदलत असतात. सध्या पॅंटऐवजी लेगिंग घालण्याचा ट्रेंड आहे. पण तुम्ही जर प्लस साईजच्या असाल तर लेगिंग घालणं टाळा. तुम्हाला ही गोष्ट कदाचित आवडणार नाही. पण जर तुम्ही पॅंटऐवजी लेगिंग घातलं तर तुमचं बॉडी फॅट जास्त दिसू शकतं. कारण लेगिंग फ्री स्टाईल असतात. सर्वांच्या साईजनुसार ते तयार केलेले असतात. मात्र पॅंटमध्ये असं होत नाही पॅंट शिवताना या सर्व गोष्टींचा विचार करून त्या तयार केल्या जातात. ज्यामुळे तुमचा कंबरेखालचा भाग व्यवस्थित झाकला जातो.
जर तुम्ही प्लस साईजच्या मुली असाल तर तुम्हाला बॉडीकॉन ड्रेस वापरता येत नाहीत. कारण त्यामुळे तुमचा बॉडीशेप चांगला दिसत नाही. मात्र तुम्ही पेन्सिल स्कर्ट नक्कीच वापरू शकता. जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर एखाद्या स्किनी पेन्सिल स्कर्टवर एखादं लूज फिटिंगचं शर्ट अथवा टॉप घाला. ज्यामुळे तुमचा बॉडीशेप कंबरेखाली निमूळता वाटेल. शिवाय पेन्सिल स्कर्ट नेहमीच फॅशनमध्ये असतात. तुम्ही एखाद्या बिझनेस मिटिंग, प्रेझेंटेशन अथवा फॉर्मल पार्टीसाठी असा लुक नक्कीच करू शकता. यासाठी या पेन्सिल स्कर्टने दिसा सडपातळ, फॉलो करा या स्टायलिंग टिप्स.
प्लस साईजच्या मुलींची नेहमी एक समस्या असते की त्यांना सतत इतर मुलींप्रमाणे स्टायलिश दिसायचं असतं. पण लक्षात ठेवा स्टायलिश दिसण्याचा आणि बॉडीशेपचा काहीच संबध नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे टीव्हीवरील या प्लस साईज अभिनेत्रींनी त्यांच्या वजनापेक्षा टॅलेंटला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळे वजनाकडे नाही तर स्टाईलवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही एखादं आऊटफिट निवडता तेव्हा त्यासोबत कोणते फूटवेअर घालता हे खूप महत्त्वाचे आहे. कारण नुकते ड्रेस स्टायलिश असून चालणार नाही त्यासोबत मॅच होणारे फूटवेअर घातले तरच तुमचा लुक परफेक्ट दिसेल. फूटवेअर निवडताना पायाच्या अॅंकलवर स्ट्रिप्स नसलेले शूज घ्या कारण अशा स्टाईलमुळे तुमचे पाय छोटे दिसतील. पाय लांबसडक दिसण्यासाठी क्लासिक पम्प नक्कीच सुंदर दिसतील.
फूटवेअरप्रमाणेच तुम्ही तुमच्या ड्रेससोबत कोणती बॅग कॅरी करता हेदेखील महत्त्वाचं आहे. बॅगचा साईजचा प्रभावदेखील तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. अगदी लहान साईजच्या बॅग तुमच्या बॉडीशेपसोबत मॅच होणार नाहीत. कारण त्यामुळे तुमच्या बॉडीशेपवर जास्त फोकस केला जाईल. जर तुम्ही मिडिअम साईजची टोटे बॅग अथवा एखादी मोठी लेदर बॅग कॅरी केली तर सर्वांचं लक्ष त्या बॅगवर जाईल आणि तुमचा बॉडीशेप लक्षात येणार नाही.
एक चांगला टेलर हा प्रत्येक स्त्रीच्या फॅशन आणि स्टाईलचं गुपित असतो. त्यामुळे तुमच्याजवळ असा एखादा परफेक्ट टेलर असायलाच हवा. कारण तुमच्या बॉडीशेपनुसार योग्य फिटिंगचे कपडे शिवणं आणि एखादं कापड तुमच्या बॉडीशेपसाठी योग्य आहे की नाही हे सांगणं ही त्याची खासियत असू शकते. आजकाल बऱ्याच दुकानांमध्ये अथवा बुटिकमध्ये टेलरिंग सर्व्हिस पूरवली जाते. ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तसे कपडे तुमच्या साईजमध्ये बनवून घेऊ शकता. यासोबतच प्लस साईज कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा 11 Tips
स्टायलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी दाखवता आल्या पाहिजेत आणि कमतरता झाकता यायला हव्यात. तुमच्या बॉडीशेपकडे कुणाचं लक्ष जाऊ नये यासाठी तुम्ही स्टेटमेंट ज्वैलरी घालू शकता. गळ्यात एखादं छानसं चोकर घातल्यामुळे तुमचे आऊटफिट आकर्षक दिसू शकतात. एखादं सुंदर कानातलं अथवा गळ्यातलं सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकतं. त्यामुळे प्लस साईझसाठी स्टायलिंग टिप्सच्या यादीत ही गोष्ट अवश्य समाविष्ट करा.
आजकाल रॅप करण्यासारखे अथवा अंगाजवळ गुंडाळले जाणारे ड्रेस ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हाला कोणत्याही शॉपिंग मॉल मध्ये असे ड्रेस मिळू शकतात. अशा ड्रेसमुळे तुमचं शरीर सुडौल वाटू शकतं. कारण हे ड्रेस तुमच्या शरीरातील कमतरता झाकून टाकतात आणि तुमच्या बॉडीशेप परफेक्ट दिसेल याचीं काळजी घेतात. असे ड्रेस खास प्लस साईजच्या मुलींसाठी तयार केलेले असतात. तुम्ही या ड्रेसमध्ये अधिक सुंदर आणि गॉजिअस वाटू शकता. मात्र असा ड्रेस निवडताना त्याचे स्लीव्ज थ्री फोर्थ असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे तुमचे दंड जाड दिसणार नाहीत.
साडी, लेंग्यामध्येही तुम्ही सुंदर दिसू शकता. मात्र जर तुमची छाती मोठी असेल तर ब्लाऊज निवडताना योग्य ती काळजी घ्या. छाती जास्त मोठी वाटू नये यासाठी एब्रॉयडरी अथवा वर्क केलेले ब्लाऊज न घालणं जास्त सोयीचं आहे. कारण असे ब्लाऊज तुमचा पूर्ण लुक खराब करू शकतात. शिवाय त्यामध्ये तुम्ही जास्त जाड वाटाल. ब्लाऊजवर वर्क नसेल आणि त्याचे हात थ्री फोर्थ असतील तर तुमच्यावर लोकांचं लक्ष नक्कीच खिळून राहील. तेव्हा यापुढे साडी अथवा लेंगा घालताना या गोष्टींची काळजी जरूर घ्या.
प्लस साईजच्या मुलींवर डीप नेक अथवा मोठ्या गळ्याचे ड्रेस जास्त शोभून दिसतात. आम्हाला तुम्ही तुमचे शरीर एक्पोज करावं असं मुळीच वाटत नाही. त्यामुळे गैरसमज न करता या गोष्टीचा विचार करा. तुमचं मोठं पोट दिसू नये असं वाटत असेल तर अशा शेपचे ड्रेस वापरा. कारण या शेपमुळे तुमच्या पोटाकडचा भाग योग्य पद्धतीने झाकला जातो. एका छोट्याशा बदलामुळे तुमचे शरीर सुडौल दिसणार असेल तर असा बदल करायला तुमची नक्कीच काहीच हरकत नसेल.
प्लस साईजसाठी स्टायलिंग टिप्स आम्ही आधीच शेअर केल्या आहेत. सुडौल दिसण्यासाठी प्लस साईजच्या मुलींनी ए लाईन ड्रेस, डिप नेकचे ड्रेस, पेन्सिल स्कर्ट, सॅटिन अथवा सिल्कपासून तयार केलेले ड्रेस घालावेत. ज्यामुळे त्यांचा बॉडीशेप चांगला दिसेल.
जर तुमचे पोट खूप मोठे असेल तर ते झाकण्यासाठी कोणत्याही ड्रेसमध्ये शेपवेअर घाला. त्याचप्रमाणे डीप नेकचे ड्रेस निवडा, ड्रेसचे कापड तलम असेल याची काळजी घ्या आणि रॅप स्टाईल म्हणजेच अंगाला गुंडाळलेले ड्रेस घाला.
पोट मोठे असल्यामुळे कंबरेवर पॅंट राहत नसेल तर ती फिट करण्यासाठी योग्य बेल्ट त्यासोबत कॅरी करा. शिवाय अशा वेळी पॅंट निवडताना पॅंटचे कापड स्ट्रेचेबल असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे तुमची पॅंटची फिटिंग चांगली बसेल.