लॅपटॉपसोबत या अॅक्सेसरिज असतील तर काम करणं होईल सोपे

लॅपटॉपसोबत या अॅक्सेसरिज असतील तर काम करणं होईल सोपे

कोरोनामुळे जेव्हा लॉकडाऊन करण्यात आलं तेव्हा अनेक ऑफिस बंद करण्यात आले होते. सोयीसाठी सर्व ऑफिसमधून कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. आजही कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी काही कंपन्यांमधून वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देण्यात येत आहे.  काही ठिकाणी काही दिवस ऑफिसमधून तर काही दिवस घरातून काम करण्याची पद्धत रूजत आहे. थोडक्यात सध्या वर्क फ्रॉम होम हा आपल्या जीवनशैलीचा भागच होत चालला आहे. अशावेळी लॅपटॉपवर आपलं काम अधिक सोयीचं करण्यासाठी तुमच्याजवळ काही अॅक्सेसरिज असणं क्रमप्राप्त आहे. 

लॅपटॉप स्टॅंड -

वर्क फ्रॉम होममुळे तुमचा प्रवासाचा वेळ आणि खर्च जरी वाचत असला. तरी या सुविधेसोबत तुम्हाला अधिक काम करण्याची सवय लावावी लागते. घरीच असल्यामुळे अनेकवेळा जास्त वेळ काम करणं बंधनककारक होतं. अशावेळी बराच वेळ लॅपटॉपवर काम केल्यामुळे तुमची पाठ, मान आणि कंबर नक्कीच दुखू लागते. म्हणूनच लॅपटॉपवर काम करताना तुमची बसण्याची पोझिशन आणि लॅपटॉपचा अॅंगल नीट असायला हवा. यासाठी तुम्हाला गरज लागते एका चांगल्या लॅपटॉप स्टॅंडची.. ज्यामुळे तुम्ही लॅपटॉपचा अॅंगल तुम्हाला हवा तसा अॅडजस्ट करू शकता. 

कुलिंग पॅड -

लॅपटॉप स्टॅंडसोबत हे देखील सध्या खूप गरजेचं झालं आहे. कारण जर तुम्ही नऊ ते दहा तास लॅपटॉपवर सलग काम करत असाल तर तुमचा लॅपटॉप गरम होतो. गरम झाल्यामुळे लॅपटॉप बंद पडणे, हॅंग होणे अशा समस्या जाणवू लागतात. यासाठीच लॅपटॉपच्या खाली कुलिंग पॅड असलेलं स्टॅंड असणं गरजेचं आहे. ज्यामुळे लॅपटॉपचं तापमान नियंत्रित राहील.

Lifestyle

Laptop Stand

INR 599 AT STRIFF

ब्ल्युटूथ माऊस -

ऑफिसमध्ये तुम्हाला कंम्प्युटरवर माऊसच्या मदतीने काम करण्याची सवय असते. लॅपटॉपसोबत माऊस नसला तरी काम करता येतं. मात्र जर तु्म्ही तुमच्या लॅपटॉपला ब्ल्युटूथ माऊस जोडला तर तुमचं काम नेहमीप्रमाणे जलद आणि सोयीचं होतं. त्यामुळे लॅपटॉपसोबत असा माऊस असणं हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. शिवाय हा माऊस वायरलेस असल्यामुळे तुमच्या टेबलवर अती सामानामुळे अडचण होत नाही.

वायरलेस हेडफोन -

जर तुमचं ऑफिसचं काम हे सतत इतरांशी संवाद साधून अथवा व्हिडिओ कॉलवर करण्याचं असेल तर तुम्हाला वायरलेस हेडफोनची मदत नक्कीच होऊ शकते. कारण त्यामुळे तुमच्या घरातील इरतर मंडळी डिस्टर्ब होत नाहीत. शिवाय तुम्हाला तुमच्या ऑफिस सहकाऱ्यांसोबत कामाची चर्चा करणं खूप सोपं जातं. ऑफिसच्या  कामानिमित्त व्हिडिओज अथवा साऊंड  असलेल्या क्लिप्स पाहताना हेडफोन तुमच्याजवळ असेल तर तुमचं काम सोपं होतं. Entertainment

Wireless sport headphone

INR 18,989 AT Bose

वर्क फ्रॉम होम करताना तुमच्या घरात ऑफिसचं वातावरण निर्माण करण्यासाठी, कामावर नीट फोकस करण्यासाठी, घरातील इतर गोष्टी टाळण्यासाठी या गोष्टी तुमच्या नक्कीच मदतीच्या आहे. तेव्हा लॅपटॉपसोबत या गोष्टी खरेदी करा आणि आनंदात काम करा. तुमचा वर्क फ्रॉम होमचा अनुभव आमच्यासोबत जरूर शेअर करा. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm