सनग्लासेस विकत घेताना या गोष्टी ठेवा लक्षात

सनग्लासेस विकत घेताना या गोष्टी ठेवा लक्षात

उन्हाळा जवळ आला की सर्वजण आवर्जून सनग्लासेसची खरेदी करतात. मात्र सध्या सनग्लासेस वापरण्याची गरज तुम्हाला बाराही महिने लागू शकते असं वातावरण आहे. कारण वर्षभर दुपारचं ऊन हे प्रखर आणि डोळ्यांसाठी हानिकारक नक्कीच असतं. शिवाय सनग्लासेस घातल्यामुळे तुमच्या डोळ्यांचे धुळ, माती, प्रदूषण अशा गोष्टींपासूनही संरक्षण होते. त्यामुळे प्रवासात तुमच्याजवळ सनग्लासेस असायलाच हवेत. जर तुम्ही तुमच्यासाठी खास सनग्लासेसची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी फक्त लुक्सचा विचार न करा युव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस विकत घेण्यावर भर द्या.  यासाठी सनग्लासेस विकत घेताना या गोष्टी जरूर तपासून घ्या.

युव्ही प्रोटेक्शन -

आजकाल बाजारात विविध स्टाईल आणि प्रकारचे सनग्लासेस विकत मिळतात. तुम्ही सनग्लासेस विकत घेताना एखाद्या खास ब्रॅंडचे चाहते असाल तर त्यामध्ये युव्ही प्रोटेक्शन ची सुविधा आहे का हे अवश्य तपासा. कारण शंभर टक्के युव्ही प्रोटेक्शन देणाऱ्या सनग्लासेस मुळे तुमच्या डोळ्यांचे सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून संरक्षण होते. सनग्लासेसवर या गोष्टींची माहिती देणारा टॅग असतो. ज्यावरून ते युव्ही प्रोटेक्शन देणारे आहेत का याची खात्री तुम्हाला पटू शकते.

Instagram

जीवनशैलीचा विचार करा -

सनग्लासेस मध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे,  मटेरिअलचे, रंगाचे प्रकार मिळतात. त्यामुळे ते विकत घेताना तुम्ही नक्कीच गोंधळात पडू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला सनग्लासेस खरेदी करायचे असतील तेव्हा तुमची जीवनशैली आणि गरज यांचा विचार करा.  कारण जर तुम्ही खेळाडू असाल अथवा तु्म्हाला सतत घराबोहर कामानिमित्त जावं लागत असेल तर लुक्सपेक्षा तुमचे डोळे पूर्ण झाकले जातील आणि डोळ्यांना आराम मिळेल असे सनग्लासेस विकत घेणं गरजेचं आहे. 

Instagram

सनग्लासेसचा आकार कसा असावा -

लहान आकाराच्या सनग्लासेसपेक्षा मोठ्या आकाराचे  सनग्लासेस तुम्हाला जास्त सुरक्षा देतात हे सांगण्याची गरज नाही. कारण त्यामुळे तुमचा डोळा पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे तुम्हाला स्टायलिश दिसणं गरजेचं आहे की डोळ्यांची सुरक्षा यानुसार सनग्लासेसचा आकार निवडा.

आधी बजेट ठरवा मग खरेदी करा -

कोणतीही गोष्ट खरेदी करताना आधी बजेट ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण दुकानात गेल्यावर तुम्हाला निरनिराळ्या प्राईझ रेंजचे सनग्लासेस बघायला मिळतात. एवढ्या  सर्व रेंज पाहून तुमचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. यासाठी आधीच तुमचं बजेट ठरवा. ज्यामुळे त्या बजेटमध्ये चांगल्या गुणवत्तेचे सनग्लासेस निवडणं  तुम्हाला सोपं जाईल. 

Instagram

लेंसचा रंगदेखील आहे महत्त्वाचा -

सनग्लासेसच्या लेंसचा रंग वेगवेगळा असतो. जास्तीत जास्त डार्क रंगाची  लेंस घेतल्यामुळे तुम्हाला जास्त संरक्षण मिळेल असं मुळीच नाही. तुम्ही  काळ्या रंगासोबत, राखाडी अथवा हलक्या रंगाची लेंसदेखील निवडू शकता. तुमच्या स्कीन टोननुसार अथवा ड्रेस नुसार लेंसचा रंग निवडा ज्यामुळे तुम्ही सुंदर दिसालच शिवाय तुमच्या डोळ्यांचे योग्य संरक्षणही होईल.

आम्ही शेअर केलेल्या या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Sunset Sienna

INR 950 AT MyGlamm