अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी वापरा आईच्या वॉर्डरोबमधील या गोष्टी

अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी वापरा आईच्या वॉर्डरोबमधील या गोष्टी

आई ही आपली सर्वात पहिली मैत्रीण असते आणि आयुष्यभरासाठी तिच्याशिवाय आपलं पान हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. लहानपणापासूनच आईची चप्पल, तिची ओढणी घेऊन साडी नेसणे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आरशासमोर जाऊन आईसारखं दिसण्याचा आपला लहानपणीचा प्रयत्न मोठेपणीही सुटत नाही. त्यामुळेच बऱ्याचदा स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत आपलं सर्वात पहिलं प्रेरणास्थान असते ती म्हणजे आपली आई. प्रत्येक मुलीने आपल्या फेअरवेल पार्टीला आईची साडी ही नेसली असणारच. मोठं झाल्यानंतरही आईच्या कपड्यांवर डोळा तर असतोच. नव्या ट्रेंड्स आणि फॅशनच्या नादापायी आपला वॉर्डरोब वेगळा भरला असला तरीही जेव्हा घरच्या कार्यक्रमाची वेळ येते तेव्हा सर्वात पहिले नजर जाते ती आईच्या कपड्यांवर अर्थात तिच्या साड्यांवर. आईच्या कपाटातील काही युनिक आणि क्लासिक एव्हरग्रीन, विंटेज आणि अप्रतिम स्टाईल्सचा खजिनाच अशावेळी आपल्या मदतीला येतो हे नक्की. पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ करून केलेली ही स्टाईल नेहमीच अप्रतिम आणि आकर्षक दिसते याद नक्कीच कोणाचे दुमत नसेल. वेगवेगळ्या कार्यक्रमांना तुम्हीही आईच्या वॉर्डरोबमधील या काही गोष्टी घेऊन दिसू शकता अधिक आकर्षक 

आईची साडी

बनारसी असो वा नारायण पेठ असो आईच्या कपाटामध्ये अनेक साड्यांच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतात. इतक्या की कदाचित त्यामुळे तुम्ही एक शो रूमही उघडू शकता. जेव्हा घरातील कार्यक्रम अथवा अन्य ठिकाणी साडी नेसून जायची वेळ येते तेव्हा आईची साडी हा उत्तम पर्याय असतो. तुम्हाला कितीही आधुनिक फॅशनच्या साड्या दिसत असल्या तरीही आईच्या साडीची तोड कुठेच येणार नाही. अशावेळी आईच्या कपाटातील एखादी तुमच्या आवडत्या रंगाची साडी उचला आणि आपल्या तऱ्हेने या साड्यांची फॅशन करा. ही साडी नेसताना अगदी जुन्या पद्धतीनेच नेसायला हवी असे नाही. तर तुम्ही तुमच्या आधुनिक पद्धतीने नेसा त्यावर क्रॉप टॉप, जॅकेट्स अथवा ब्लेझर अथवा बेल्टचा वापर करून त्याला वेगळा लुक तुम्ही देऊ शकता. 

सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

ओढण्यांची व्हरायटी

Instagram

साड्यांप्रमाणेच आईकडे असणाऱ्या ओढण्याही सुंदर असतातच. आपण बऱ्याचदा वेस्टर्न कपड्यांकडे जास्त आकर्षित होतो. पण कोणताही सण आला की, भारतीय पोषखालाच प्राधान्य दिले जाते. मग अशा वेळी आईकडे असणाऱ्या ओढण्या जास्त उपयोगी ठरतात. तुमच्याकडे असणाऱ्या कुरत्यांवर त्यापैकी एखादी ओढणी मिसमॅच करून घेतली तर तुम्हालाही कळून येईल की आपण आईच्या फॅशनकडे किती दुर्लक्ष करून आपलंच नुकसान करून घेत असतो. फुलकारी, चिकनकरी, बांधणी असे अनेक ओढणीचे डिझाईन्स तुमच्या कोणत्याही कपड्यांवर सहज मॅच होतात. तुम्ही या ओढण्यांनी वेगवेगळी स्टाईल करून जीन्स क्रॉप टॉपसहदेखील फॅशन करू शकता. डेनिम आणि कुडत्यांसह या ओढण्या सुंदर दिसतात. यासह मोठे कानातले घालून तुमचा लुक अधिक फॅशनेबल करता येतो. 

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा मेळ

Instagram

तरूण मुलींकडे सहसा जंक ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी असते. पण पारंपरिक कोल्हापुरी साज अथवा अशा दागिन्यांना महत्व येते ते लग्न अथवा अशा समारंभामध्ये पण त्यासाठी आपण आपले दागिने बनवून घेत नाही. तर अशा वेळी मदतीला धाऊन येतात ते आईचे दागिने. तुम्हाला वाटतं की आईचे दागिने हे जुन्या पद्धतीचे आहेत. पण अशावेळी तेच दागिने अधिक सुंदर वाटतात. पारंपरिक साड्यांवर अथवा समारंभासाठी घातल्या जाणाऱ्या कपड्यांवर असे दागिने अधिक शोभून दिसतात. तुम्ही आईचे सोन्याचे कानातले इव्हिनिंग गाऊन्स अथवा ड्रेसवर नक्की घालू शकता. आईकडे कुंदन दागिने असतील तर यासह तुम्ही तुमच्या साडी अथवा शरारा मॅच करून घालू शकता. ट्रेडिशनल चांदीचा छल्ला अथवा कंबरपट्टा असेल तर तो लाऊन तुम्ही साडीला सेक्सी बोहेमियन लुकही देऊ शकता.

‘रंग माझा वेगळा' मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

आईची शाल

Instagram

आता हे वाचून तुम्हाला वाटेल आईच्या शालीचा कसा काय उपयोग करायचा? तर आईकडे नेहमीच वेगवेगळ्या शालींचा खजिना असतो. तुम्ही त्याची स्टाईल करू शकता. आतापर्यंत केवळ थंडीत वापरण्यासाठी शाल असंच पाहिलं जात होतं. पण आता शालीचा उपयोग फॅशनसाठीही केला जातो. तुम्ही तुमच्या एथनिक आऊटफिट्ससह शालीचा वापर करू शकता. वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही डेलिवेअर कॅज्युअल आऊटफिट्ससह पेअर करू शकता. केवळ लेअरिंसाठीच हा चांगला पर्याय आहे असं नाही तर तुम्ही याचा वापर केल्याने अधिक चांगली स्टाईल कॅरी करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक