असा असायला हवा तुमचा हनीमून किट

असा असायला हवा तुमचा हनीमून किट

जोडीदारासोबत रोमँटीक हनीमूनला जाणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या ड्रिम डेटवर जाण्यासाठी अनेक जण खूप तयारी करतात. चांगले कपडे, चांगल्या लाँजरीज, चांगले गाऊन असे बरेच काही या खास क्षणांसाठी पॅक केले जाते. पण या व्यतिरिक्तही ही काही गोष्टी असतात ज्या तुम्ही या काळात घेऊन जाणे गरजेचे असते. प्रत्येक मुलीने तिच्या हनीमून किटमध्ये या काही गोष्टी नक्कीच ठेवायला हव्यात. ज्याची गरज तुम्हाला अगदी कधीही जाणवू शकते. यासाठीच आम्ही एक हनीमूट किट तयार केला आहे. जो तुमच्या बॅगमध्ये अगदी कुठेही राहू शकतो. त्यामुळे तो कॅरी करणेही फार सोपे आहे.

‘40’ हॉट आणि सेक्सी हनीमून ड्रेस (Honeymoon Dresses In Marathi)

लिप बाम

Instagram

तुम्ही हनीमूनसाठी बाहेर जाणार असाल तर तेथील वातावरणाला साजेसा असा मेकअप तुम्ही नक्कीच कॅरी करता. पण लिप बामसारखी अगदी साधी गोष्ट अनेक जणं न्यायचं विसरतात.  ओठ कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना असतो.अशा ट्रिपमध्ये जिथे तुम्ही अगदी व्यवस्थित दिसावं असं वाटत असेल अशा ठिकाणी तुमचे ओठ आकर्षक दिसत नसतील तर काहीच उपयोग नाही. म्हणून जोडीदाराला आवडेल अशा फ्लेवरचे आणि रंगाचे लिप बाम तुमच्या पाऊचमध्ये कॅरी करा. 

डेंटल फ्लॉस

Instagram

दातांची स्वच्छता ही तर फारच महत्वाची गोष्ट आहे. हनीमूनला गेल्यानंतर अनेकदा बाहेर जाणे आणि खाणे असे होत राहते.परदेशात हनीमूनला गेल्यानंतर फारसा वेळ परत परत रुमकडे जाण्यासाठी नसतो.सतत बाहेर राहताना खाताना दातात काही अडकण्याची शक्यता असते. दातात अडकलेले कण दिवसभर त्रास देत राहतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येण्याची शक्यता असते. अशी दुर्गंधी आलेली कोणालाही चालत नाहीत. त्यामुळे डेंटल फ्लॉस जवळ ठेवून योग्यवेळी दात स्वच्छ करुन घ्या आणि मोकळेपणाने हसा.

तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

परफ्युम

Instagram

सुंगधी असणे प्रत्येकाला आवडते. हनीमूनला गेल्यानंतर तुमच्या घामाचा वास जोडीदाराला यावा असे तुम्हाला मुळीच वाटणार नाही. त्यामुळे तुमच्या या किटमध्ये एक छान परफ्युम किंवा बॉडी मिस्ट ठेवा. कारण त्याचा मंद सुगंध येत राहतो. परफ्युम निवडताना ते खूपच स्ट्राँग घेऊ नका. कारण असे परफ्युमदेखील उग्र दर्प देऊ शकतात. एखाद्या परफ्युमची मिनीएचर कॉपी तुमच्याजवळ अगदी हमखास असू द्या. ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल 

बेबी ऑईल किंवा मॉश्चरायझर

Instagram

त्वचेची काळजी ही हनीमूनमध्ये फारच महत्वाची असते. बाहेर गेल्यानंतर तेथील पाणी आणि बदलेल्या लाईफस्टाईलमुळे त्वचा रुखरुखीत वाटू लागते. तुमच्या जोडीदाराला तुमच्या त्वचेत आलेला कोरडेपणा जाणवू द्यायचा नसेल तर तुम्ही एखादे मॉश्चरायझर किंवा बेबी ऑईल नक्कीच सोबत ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लावा. बेबी ऑईल हे कमी तेलकट असते. त्यामुळे त्वचा लगेच मॉश्चराईज होण्यास मदत मिळते. 

पँटी लायनर

Instagram

बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सतत वॉशरुममध्ये जाऊन टिश्यू पेपरने व्हजायनाकडील भाग स्वच्छ करायला मिळतोच असे नाही.  जर तुम्ही लघवीला सतत बाहेर जात असाल तर लघवीचे थेंब पँटीलायनरवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या पँटीला दर्प येतो. हा दर्प येत राहिला तर तुम्हाला आणि जोडीदारालाही आवडणार नाही. जर तुम्ही पँटी लायनर वापरली तर तुम्हाला साधारण दोन ते तीन तास तरी अगदी सहज वाईप न करता फिरता येईल. आणि तुम्ही तुमच्या त्या खास क्षणांसाठी तयार राहाल. 


आता तुम्ही हनीमूनला जाणार असाल तर तुम्ही तुमच्या किटमध्ये हे साहित्य अगदी हमखास ठेवा. 

प्रत्येक नववधूच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायला हव्यात या 11 बोल्ड, हॉट आणि सेक्सी लाँजरी - Lingerie For Women in Marathi

Beauty

Treat Love Care Brightening Foundation

INR 995 AT MyGlamm