पहिल्यांदाच करणार असाल आयब्रो थ्रेडिंग तर लक्षात ठेवा

पहिल्यांदाच करणार असाल आयब्रो थ्रेडिंग तर लक्षात ठेवा

आयब्रो अर्थात भुवया कोरल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा लुक पूर्ण बदलतो हे सर्वांनाच माहीत आहे आणि एका ठराविक वयात आल्यानंतर भुवयांना आकार प्रत्येक मुलगी देत असते. तुमच्या भुवया अधिक चांगल्या दिसाव्यात आणि त्याचा आकार योग्य असल्यास, तुमच्या चेहऱ्याचे फिचर्स अधिक शार्प दिसतात. यासाठी आपल्यापैकी बरेच जण हे आयब्रो थ्रेडिंगचा (Eyebrow Threading) वापर करतात. पण आतापर्यंत ज्यांनी आयब्रो थ्रेडिंग केलेले नाही आणि ज्यांना पहिल्यांदाच आयब्रो थ्रेडिंग करायचे आहे त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. बऱ्याचदा आयब्रो थ्रेडिंग करण्याची भीतीही वाटत असते. त्यामुळे काही मुली भुवया कोरण्याचे मनावरही घेत नाहीत. बरेच वर्ष अशाच भुवया ठेवल्या जातात. पण थ्रेडिंग करायचे असेल तर कसा योग्य आकार द्यावा इथपासून ते त्याची काळजी कशी घ्यावी याचा तुम्ही विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही. याबाबत योग्य आणि इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही जर पहिल्यांदाच आयब्रो करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. 

कसे करतात आयब्रो थ्रेडिंग

Freepik.com

थ्रेडिंगद्वारे जेव्हा तुम्हाला आयब्रो अर्थात भुवया कोरायच्या असतात तेव्हा कोणत्याही केमिकलचा अथवा ब्युटी डिव्हाईसचा वापर करण्यात येत नाही. पार्लरमध्ये तुमच्या भुवयांना दोऱ्याने आकार देण्यात येतो अर्थात कोरल्या जातात. तुमच्या भुवयांवर वेगवेगळ्या ठिकाणी आकारात नसलेले केस असतात ते काढून त्याला योग्य आकार देण्यासाठी दोऱ्याचा उपयोग करून हे केस काढून टाकले जातात. यामुळे तुमच्या भुवयांना योग्य आकार देता येऊन तुमचा लुक अधिक शार्प करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

निवडा तुमच्या आयब्रोजसाठी बेस्ट आयब्रो फिलर कसे ते घ्या जाणून

सुरूवातीला थोडेसे दुखते

Freepik.com

आयब्रो करताना दुखते का आणि खूप त्रास होतो का असा प्रश्न सर्वांच्याच मनात पहिल्यांदा येतो. पण महिलांना दुखणे सहन करण्याची ताकद जास्त स्वरूपात असते हे विसरून चालणार नाही. आयब्रो थ्रेडिंगच्या वेळी खूप दुखते असं नाही. दोऱ्याने भुवया कोरताना तुम्हाला थोडासा त्रास नक्कीच होतो. एखादी गोष्ट तुम्हाला खुपत आहे इतपतच त्रास यावेळी होतो. पण तुम्ही हा त्रास सहन करू शकता. हा असा त्रास नाही जो सहनच करता येणार नाही. आयब्रो थ्रेडिंगची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, ही प्रक्रिया अगदी पटकन होते आणि अगदी कमी वेळात तुम्हाला त्रास सहन करूनही आयब्रोचा योग्य आकार मिळू शकतो. तसंच तुम्हाला कोणतेही केमिकल न वापरल्याने इतर त्रासाचाही संभव नाही. 

दाट आणि रेखीव भुवयांसाठी असं वापरा आयब्रोज जेल

अशी घ्या काळजी

एकदा भुवया कोरल्यानंतर प्रत्येक मुलीच्या मनात हे येतेच की आयब्रोचा आकार अधिक काळ कसा टिकवायचा अथवा याची काळजी कशी घ्यायची? कारण सारखे सारखे पार्लरमध्ये जाऊन आयब्रो थ्रेडिंग करून त्रास सहन करायचा नसतो. यासाठी तुम्ही ट्विजरचा वापर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही आयब्रोवरील वाढणारे केस अतिशय पटकन काढून टाकू शकता. तसंच तुमच्या आयब्रोचा आकार जास्त काळ टिकून राखण्यासही तुम्हाला मदत होते. आयब्रोच्या टचअपसाठी हा उत्तम उपाय आहे. अगदीच तुम्हाला हेदेखील करायचे नसेल तर तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर करून आयब्रो फील करू शकता. यामुळे योग्य आकारात आयब्रो दिसतात आणि तुम्हाला सतत पार्लरलाही जावे लागत नाही. 

सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी - Eyebrow Shaping Tips In Marathi

Beauty

LIT Matte Eyeliner Pencil - Slay

INR 445 AT MyGlamm

ही प्रक्रिया महाग नाही

इतर पार्लरमधील गोष्टींच्या तुलनेत ही प्रक्रिया अजिबातच महाग नाही. तसंच अनेक महिला आयब्रो थ्रेडिंगच्या टेक्निकला जास्त प्राधान्य देतात. जास्तीत जास्त 30 रूपयांपासून आयब्रो थ्रेडिंग करण्यात येते. एका सामान्य ब्युटी पार्लरमध्ये इतके पैसे खर्च करावे लागू शकतात. पण तुम्ही महागड्या सलॉनमध्य गेलात तर साधारण 100 रूपयांपर्यंत तुमच्या आयब्रोवर खर्च करावा लागू शकतो. पण त्यापेक्षा अधिक पैसे आयब्रोवर खर्च करावे लागत नाहीत. त्यामुळे बरेचदा सामान्य पार्लरमध्ये जाऊन आयब्रो करून येणं परवडतं. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक