सुंदर आणि ग्लॅमरस दिसायचं म्हणजे भरमसाठ खर्च करायचा असाच अनेकांचा समज असतो. कारण सौंदर्यप्रसाधने आणि ब्युटी ट्रिटमेंटवर खूप खर्च केल्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला असतो. खरंतर तुम्ही अतिशय कमी खर्च करूनही सुंदर दिसू शकता. यासाठी काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्यात. ज्यामुळे तुमच्या मेकअप आणि ब्युटी ट्रिटमेंटवरील खर्च आटोक्यात राहू शकतो.
मेकअप करताना फक्त लिपस्टिक लावली तरी तुमच्या व्यक्तिमत्वात खूप बदल झालेला दिसून येतो. मात्र त्यासाठी अशी लिपस्टिक निवडा ज्यामध्ये नैसर्गिक घटक असतील. तुमच्या लिपस्टिक मध्ये मॉईस्चराईझर असेल ओठांची काळजी करण्याची गरज नाही. लिपस्टिक लावण्यामुळेही तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहू शकतात. शिवाय पिच रंगाच्या लिपस्टिकचा वापर तुम्ही ब्लशर प्रमाणे करू शकता. एकाद्या शिमर लुकच्या लिपस्टिकचा वापर आय शॅडो, हायलायटरप्रमाणे करू शकता. थोडक्यात लिपस्टिक वापरण्यामुळे तुमचा इतर मेकअप प्रॉडक्टवरचा खर्च नक्कीच वाचू शकेल.
केसांच्या समस्या टाळण्यासाठी आणि केसांना फाटे फुटल्यामुळे ते निस्तेज दिसू नयेत यासाठी केस नियमित ट्रिम करा. महिन्यातून एकदा केस ट्रिम केल्यामुळे तुमचे केस स्टायलिश दिसतील. ज्यामुळे तुम्हाला वारंवार हेअर ट्रिटमेंट करावी लागणार नाही. शिवाय महागडी हेअर स्टाईल, हेअर ट्रिटमेंट करण्यापेक्षा हेअर ट्रिम करणं नक्कीच तुमच्या बजेटमध्ये बसू शकतं. नियमित हेअर ट्रिम केल्यामुळे तुमचे केस कमी गळतात, केसांचे आरोग्य राखण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
व्यायाम आणि योगामुळे तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर तुमच्या त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते. नियमित योगासने केल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला आणि केसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. दररोज योगासने केल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि केस चमकदार होतात.
आपल्या स्वंयपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी करू शकता. शिवाय असे घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि सौंदर्यावर केला जाणारा भरमसाठ खर्चही वाचवता येतो. आम्ही तुमच्यासोबत नेहमीच असे dIY उपाय शेअर करत असतो. त्यामुळे त्याचा वापर करा आणि घरच्या घरी लिंबू, मध, हळद, बेसण अशा गोष्टींचा वापर करून ग्लॅमरस दिसा.
स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्याची ही एक बजेट फ्रेंडली युक्ती आहे. प्रत्येक वेळी फॅशनेबल दिसण्यासाठी नवनवीन अॅक्सेसरीज खरेदी करण्याची गरज नाही. एखादा स्कार्फ, पर्स, ज्वैलरी, शूज तुम्ही निरनिराळ्या कपड्यांवर पेअर करून पुन्हा वापरू शकता. ज्यामुळे तुमचा शॉपिंगवरील खर्च कमी होईल. कोणतीही गोष्ट खरेदी करताना ती तुमच्या कडे असलेल्या जास्तीत जास्त कपड्यांसोबत मॅच होईल याचा अंदाज घेऊन मगच ती खरेदी करा. हा कमी खर्चात स्टायलिश आणि ग्लॅम दिसण्याचा एक चांगला मार्ग आहे.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या टिप्ससोबत अधिक ग्लॅम दिसण्यासाठी मायग्लॅमची लिपस्टिक वापरण्यास मुळीच विसरू नका.