झोपेत गळत असेल तोंडातून लाळ तर करा सोपे उपाय

झोपेत गळत असेल तोंडातून लाळ तर करा सोपे उपाय

लहान मुलांची झोपेत लाळ गळत असते ते आपण पाहिलं आहे पण बरेचदा मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे घडतं. पण असं नक्की का घडतं याबाबत तुम्ही विचार केला आहे का? झोपेत तोंडातून लाळ गळत असेल तर तुम्ही त्यावर उपायही करू शकता. बदलत्या खाण्यामुळे आणि काहीवेळा औषधांंच्या सेवनाने मोठ्या माणसांच्या बाबतीत ही प्रक्रिया होत असते. पण तुम्हाला या त्रासातून नक्कीच सुटका मिळू शकते. यासाठी आम्ही तुम्हाला या लेखातून काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ते उपाय करून तुम्ही झोपेत गळणारी लाळ नक्कीच बंद करू शकता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. जाणून घेऊया काय आहेत हे सोपे उपाय. 

आवळ्याचा उपयोग

Shutterstock

तुम्ही जर दिवसा अथवा रात्री झोपल्यानंतर तोंडातून लाळ गळत असल्यामुळे त्रस्त असाल तर तुम्ही त्यासाठी आवळा पावडरचा उपयोग करून घेऊ शकता. यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे. यासाठी जेव्हा तुम्ही जेवाल त्यानंतर कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये आवळा पावडर मिक्स करून हे पाणी प्या. याचे नियमित काही दिवस तुम्ही सेवन केलेत तर तुम्हाला झोपेत तोंडातून लाळ गळण्याच्या त्रासातून नक्कीच सुटका मिळेल. शिवाय आवळ्याच्या पावडरमुळे तुम्हाला शरीरात विटामिन सी देखील उत्तम मिळेल. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

तुरटीचा करा वापर

Shutterstock

घरात जर कोणी पुरुष दाढी करत असेल तर सहसा घरामध्ये तुरटी असतेच. तुरटी घरात असेल तर तुमचे काम अधिक सोपे होईल. तुम्हाला यासाठी तुरटी एका ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये फिरवावी लागेल. दिवसातून एक किंवा दोन वेळा तुम्ही या पाण्याने चूळ भरा. हे केल्याने तुमच्या तोंडात सतत येणाऱ्या लाळेपासून तुम्हाला सुटका मिळेल. झोपेत तुम्हाला लाळ गळण्याचा त्रास होणार नाही.

दालचिनीचा करा उपयोग

Shutterstock

झोपेत जर तोंडातून लाळ गळत असेल तर दालिचिनी हा त्यावरील उत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्ही दालचिनीचा चहा बनवा आणि या शहामध्ये थोडासा मध मिक्स करा. तुम्ही जर याचा नियमित स्वरूपात कमीत कमी एक ते दोन आठवडा उपयोग करून घेतलात आणि नियमित सेवन केले  तर तोंडातून लाळ गळण्याची समस्या अगदी सहज कमी होऊ शकते. थंडीच्या दिवसात तुम्हाला दालचिनीच्या चहाने अधिक फायदा मिळतो शरीर गरम ठेवण्यासाठीही उपयोग होतो. 

 

तुळस आहे फायदेशीर

Shutterstock

यासाठी तुम्ही तुळशीचाही वापर करून घेऊ शकता. बऱ्याच घरांमध्ये तुळशीचे झाड लावलेलेच असते. त्यामुळे तुम्हाला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा उपयोग करा. दिवसातून दोन ते तीन वेळा तुळशीचे पान तुम्ही खा. यामुळे तुम्हाला काही दिवसाताच झोपेत तोंडातून लाळ गळण्याचा त्रास कमी झालेला दिसून येईल. यासाठी तुम्ही तुळशीचा रसही वापरू शकता. शिवाय तुमचे जेवणखाण व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा त्रास होणारही नाही. 

झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

झोपण्याची पद्धत बदला

Shutterstock

यासाठी तुमच्या झोपण्याची पद्धतही काही अंशी कारणीभूत ठरते. त्यामुळे तुम्ही काही दिवस उपडी न झोपता पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर ही सवय चांगली नाही. त्यामुळे काही दिवस तुम्ही ही सवय बदला. 

टीप - हे उपाय घरगुती आहेत. तुम्हाला कोणतीही शंका येत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक