ट्रॅव्हल करताना दिसायचं आहे स्टायलिश तर असे कॅरी करा कपडे

ट्रॅव्हल करताना दिसायचं आहे स्टायलिश तर असे कॅरी करा कपडे

वेकेशनवर जाणं आणि तिथे जाऊन मस्त फोटोसेशन करणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्हालाही तुमच्या ट्रव्हल फोटोजमध्ये स्टायलिश दिसायचं असेल तर काही फॅशन टिप्स फॉलो करायलाच हव्या. कारण फिरायला जाताना घालायचे कपडे फक्त स्टायलिश असून चालणार नाही तर ते आरामदायकही असायला हवेत. तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये कोणते कपडे भरता यावरून तुमचा ट्रॅव्हल लुक आणि प्रवास कसा असणार हे ठरू शकतं. यासाठी ट्रॅव्हल बॅग भरण्यापूर्वीच या गोष्टींचा विचार करा. सध्या शॉर्ट ड्रेस, मॅक्सि गाऊन असे कपडे ट्रेंडमध्ये आहेत. काही टेलिव्हिजन कलाकारांची फॅशन तुम्ही यासाठी फॉलो करू शकता. 

मॅक्सि ड्रेस -

अभिनेत्री हिना खान ही ट्रॅव्हल वेडी आहे, शिवाय तिचा फॅशन सेंस खूप चांगला आहे. ती नेहमीच तिचे वेकेशन मूडमधले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. लॉकडाऊननंतर हिना खान मालदिव्जला गेली होती.मालदिव्जमध्ये तिने निरनिराळे लुक केले होते. हे लुक तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंग पिरिएडमध्ये ट्राय करू शकता. हिनाचा हा व्हाईट मॅक्सि ड्रेस खूप व्हायरल झाला होता. हिनाचे मालदिव्जमधीस अनेक फोटोज बिकीनी लुकमधील आहेत. मालदिव्जच्या समुद्रकिनारी फिरण्यासाठी बिकनी अथवा असे मोकळे मॅक्सि ड्रेस नक्कीच शोभून दिसतात. शिवाय अशा ठिकाणी ते आरामदायकही ठरतात. 

Instagram

लॉंग वन पीस -

फिरायला गेल्यावर कुल दिसणारा आणि आरामदायक वाटणारा ड्रेस हवा असेल तर तुम्ही अभिनेत्री पूजा गौरला फॉलो करू शकता. कारम तीदेखील काही दिवसांपूर्वीच मालदिव्ज वेकेशनवर गेली होती. जिथे तिने हा स्टायलिश अटायर केला होता. अशा ड्रेससोबत मस्त स्नीकर्स अथवा सॅंडल्स कॅरी करायला हवेत. बीचवर फिरताना तुम्ही साधी पण स्टायलिश स्लीपरही घालू शकता. हॅट घालून तुम्ही उन्हातूनही फिरला तरी तुम्ही या लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये नक्कीच कुल दिसाल.  लक्षात ठेवा समुद्र किनारी फिरताना असे फिकट रंगच जास्त सोयीचे ठरतात. 

Instagram

शॉर्ट वन पीस -

अदा खान तिच्या लुक चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. अदाचा हा लुक ट्रॅव्हलसाठी अगदी बेस्ट आहे. जर तुम्हाला ट्रॅव्हलसाठी एखादा शॉर्ट ड्रेस कॅरी करायचा असेल तर हा लुक अगदी परफेक्ट आहे. अशा ड्रेसमध्ये तुम्हाला आराम  तर मिळेलच शिवाय तुम्ही फॅशनेबलही दिसाल. असे शॉर्ट वन पीस ट्रॅव्हल करताना घालण्यासाठी नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. तुम्ही एखादं म्युझियम फिरण्यासाठी, मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी असे ड्रेस ट्राय करू शकता. 

Instagram

शॉर्ट पॅंट आणि टॉप -

दिया और बाती फेम ऊर्मिला निंबाळकर नेहमीच तिचे ट्रॅव्हल व्लॉग शेअर करत असते. तिचे ट्रॅव्हल लुक नक्कीच फॉलो करण्यासारखे असतात. बऱ्याचदा ती तिच्या टॅव्हलमध्ये शॉर्ट पॅंटमध्ये दिसते. तुम्ही देखील अशी शॉर्ट पॅंट ट्रॅव्हलसाठी नक्कीच कॅरी करू शकता. याचा एक फायदा असा होतो की तुम्ही त्यावर निरनिराळे टॉप ट्राय करू शकता. ज्यामुळे तुमचं ट्रॅव्हल करताना सामानाचं ओझं कमी होतं आणि दुसरा फायदा असा होतो की फिरताना चालणं, ट्रेक करणं अशा अॅक्टिव्हिटीज या लुकमुळे सोप्या होतात. शिवाय असं स्टायलिश टॉप घालून  तुम्ही या लुकमध्ये फॅशनेबलही दिसू शकता. 

Instagram

Beauty

WIPEOUT Germ Killing Hand Cream

INR 149 AT MyGlamm