नव्या वर्षाच्या पार्टीला नेसा अशा ट्रेंडी स्टाईलने साडी

नव्या वर्षाच्या पार्टीला नेसा अशा ट्रेंडी स्टाईलने साडी

नवं वर्ष लवकरच येणार आहे आणि आपली सर्वांचीच तयारी आता नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सुरू झाली आहे. बरेचदा नव्या वर्षाच्या पार्टीसाठी आधुनिक कपड्यांचाच विचार केला जातो. पण तुम्हाला यावर्षी नववर्षाच्या (New Year) पार्टीला काही वेगळं करायचं असेल तर तुम्हाला तसा विचार करावा लागेल. वास्तविक यावर्षी जास्त बाहेर जाऊन पार्टी तर होणार नाही. पण घरातल्याय घरात अथवा काही अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींसह तुम्ही कुठेतरी पार्टी करणार असाल तर तुम्ही यावेळी वेस्टर्न कपड्यांऐवजी भारतीय अटायर अर्थात साडी नेसा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि घरातील लोकांचंही मन जिंकून घ्या. नववर्ष आपल्या आयुष्यात बदल आणतं असा समज आहे तर मग लुकमध्येही आणा थोडासा बदल! पण नेहमीप्रमाणे अगदी टिपीकल साडी नेसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्रींप्रमाणे हा ग्लॅमरस लुक नक्की नव्या वर्षासाठी कॅरी करू शकता. तो नक्की कसा कॅरी करायचा हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

रसिका सुनील

Instagram

आपल्या अभिनयाने आणि आपल्या अदांनी सर्वांना घायळ करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. शनाया ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात इतकी ठासून भरली की रसिका सुनीलची प्रत्येक स्टाईलही फॉलो होऊ लागली. यावर्षी तुम्हाला जर पार्टीसाठी खास आणि वेगळा लुक हवा असेल तर रसिकाचा हा साडी लुक तुम्ही नक्की फॉलो करू शकता. हल्ली साडी अगदी पारंपरिक पद्धतीनेच नेसायला हवी असं नाही. अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लुक आता समोर येत आहेत. त्यापैकीच हा एक लुक. या लाल रंगाच्या साडीमध्ये रसिका अत्यंत सुंदर दिसत असून यावर तुम्ही अगदी सटल मेकअप केल्यानंतर तुमचा लुकही नक्कीच ग्लॅमरस दिसू शकतो. न्यू इअर नाईट पार्टीसाठी हा साडी लुक एकदम परफेक्ट आहे. मेकअप करताना तुम्ही MyGlamm ची मॅट लिपस्टिक वापरून अधिक आकर्षक दिसाल. 

Beauty

Molten Matte Metallic Liquid Lipstick- Aphrodite

INR 645 AT MyGlamm

सोनाली कुळकर्णी

Instagram

सोनाली कुळकर्णी अनेक कार्यक्रमांना वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसत असते. तिचा हा ग्लॅमरस लुक नेहमीच सर्वांना भावतो. न्यू इअर पार्टीसाठी अर्थातच तुम्ही पारंपरिक साडी नेसणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडी सिल्की आणि सुळसुळीत फॅशनेबल साडी हवी असेल तर सोनालीचा हा साडी लुकही तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तिरंगी अर्थात तीन रंग मिक्स असणारी ही साडी पार्टीसाठी तुम्हाला नक्कीच कॅरी करता येईल. या साडीला पिनअपच्या ठिकाणी एक गाठ आहे जी दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्हालाही काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही अशी साडी कॅरी करा आणि त्यावर गळ्यात काहीही न घालता केवळ मोठे कानातले घालून तुमचा लुक परिपूर्ण करा. मेकअप करतानातुम्ही MyGlamm चे आयशॅडो पॅलेट वापरू शकता. 

‘रंग माझा वेगळा' मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

Beauty

Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Enchanté

INR 1,850 AT MyGlamm

भाग्यश्री लिमये

Instagram

तुम्हाला जड साड्या पेलणं थोडं कठीण होत असेल तर तुम्ही अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या या साडीची फॅशन फॉलो करू शकता. अगदी सोबर आणि तितकीच उठून दिसणारी अशी ही साडी आणि त्यावर ऑक्सिडाईज्ड दागिने घातले की तुमचा लुक पूर्ण होतो. सध्याचा हा ट्रेंड असून तुम्ही हा ट्रेंडही फॉलो करू शकता. तसंच तुम्हाला अगदी सरळ पदर या साडीचा काढायचा नसेल तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने याची फॅशन करून याचा वेगळा लुकही तुम्ही करू शकता. एकाच रंगाची ही साडी आणि त्यावर कॉन्स्ट्रास्ट ब्लाऊज तुमचा संपूर्ण लुक बदलून टाकेल आणि तुम्ही यावर कोणतीही हेअरस्टाईल न करता केस मोकळे सोडलेत तर अधिक आकर्षक दिसाल. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार - कशी नेसावी साडी

अभिज्ञा भावे

Instagram

अभिज्ञा भावे ही अत्यंत स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साडीचा स्वतःचा ब्रँड असणारी ही अभिनेत्री नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून आपले साडीतील फोटोही पोस्ट करत असते. अभिज्ञा अत्यंत अप्रतिमरित्या साडीची फॅशन कॅरी करते. तसंच तिच्या साड्या टिपिकल नसतात आणि म्हणूनच नव्या वर्षाच्या पार्टीला तुम्ही अभिज्ञाची ही साडी स्टाईल नक्कीच फॉलो करू शकता. आधुनिक आणि पारंपरिक अशा मेळ असणाऱ्या साडीचा लुक तुम्ही यावेळी करू शकता. 

प्राजक्ता माळीच्या साडीतील अदा करतील घायाळ!

श्रेया बुगडे

Instagram

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेयाकडेही साडीचे अप्रतिम कलेक्शन आहे हे तिचे इन्स्टाग्राम फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसून येईल. श्रेया बरेचदा वेगवेगळ्या साड्यांच्या लुकमध्ये दिसते. तुम्हालाही श्रेयासारखा लुक पार्टीसाठी करता येईल. अत्यंत साधा आणि तरीही आकर्षक असा हा लुक तुम्ही फॉलो करू शकता. सध्या साड्यांचा ट्रेंड अधिक आहे. त्यामुळे पार्टीत साडी कसं नेसून जायचं असा विचार अजिबातच करू नका. पार्टीसाठी खास डिझाईनर साड्याही आजकाल बनवून घेतल्या जातात. त्यामुळे श्रेयाने नेसलेली ही साडी तुम्ही नक्कीच फॉलो करून तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ती वापरू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक