लग्नसराईसाठी असा करा वापर वेलवेटच्या ड्रेसचा, दिसाल स्टायलिश

लग्नसराईसाठी असा करा वापर वेलवेटच्या ड्रेसचा, दिसाल स्टायलिश

लग्नसराईचा काळ हा ऑक्टोबर ते जून पर्यंतचा असतो. सध्या हिवाळा सुरू असल्याामुळे या ऋतूला साजेसे कपडे लग्नात घालायला हवेत. जर तुम्ही हिवाळ्यात लग्नासाठी जाणार असाल तर वेलवेटचे कापड खूपच आरामदायक ठरते. शिवाय वेलवेटचे एथनिक ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अशा ड्रेस अथवा साडीमध्ये तुम्ही रॉयल तर दिसताच शिवाय तुम्हाला थंडीदेखील वाजत नाही. त्यामुळे यंदा लग्नसराईत नवरीपासून लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठीही वेलवेट हा बेस्ट ऑप्शन आहे. तु्म्ही वेडिंग आऊटफिटसाठी निरनिराळ्या प्रकारे वेलवेटचा वापर करू शकता. साडी, ड्रेस, लेंगा यासारख्या वेडिंग आऊटफिटमध्ये वेलवेटचा वापर करण्याची सध्या फॅशन आहे. यासाठीच  आम्ही काही प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 

वेलवेट साडी -

साडी हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं प्रेम असतं. पण लग्नात पारंपरिक साडी न नेसता चक्क वेलवेटची साडी नेसणं ही एक भन्नाट आयडिया आहे. खरंतर वेलवेट साडी सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्हाला यात निरनिराळे प्रकार मिळू शकतात. बऱ्याच साड्यांमध्ये पदर वेलवेटचा असतो. तर काही साड्या वेलवेटच्या असून पदर जाळीदार असतो. तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार तुम्ही यातील साडी निवडू शकता. लाल, मरून आणि निळ्या रंगाच्या वेलवेट साड्या लग्नात शोभून दिसतात. आजकाल नववधूच्या नऊवारी साड्यांमध्येही वेलवेटच्या कापडाचा वापर करण्यात येतो.

वेलवेट गाऊन -

लग्नातील संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी अथवा रिसेप्शनसाठी तुम्ही एखाद्या खास गाऊनची निवड करू शकता. वेलवेटचा वापर करून तयार केलेला ऑफ शोल्डर गाऊन तुम्हाला एक हटके लुक देऊ शकतो. गाऊनच्या खालील भागाला एक्स्ट्रा व्हॉल्युम देऊन तुम्ही पार्टीच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनू शकता. पार्टीची थीम रेड, ब्लॅक अथवा व्हाईट असेल तर वेलवेट गाऊन ट्राय करायला काहीच हरकत नाही.

वेलवेट ड्रेस -

जर तुम्हाला एखाद्या दूरच्या लग्नाचं आमंत्रण असेल तर साडी, गाऊन पेक्षा वेलवेटचा कुर्ता अथवा पंजाबी ड्रेस घालणं जास्त सोयीचं ठरेल. ज्यामुळे तुम्ही फार उठूनही नाही दिसला तरी सर्वांपेक्षा हटके मात्र नक्कीच दिसाल. यासाठी एखाद्या ब्राईट रंगाच्या वेलवेट कुर्त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी करून घ्या. त्यावर मॅचिंग पॅंट अथवा ट्राऊझर घाला आणि प्रिंटेड दुपट्टा कॅरी करा. अशा ड्रेसवर फक्त मोठे कानातले घालूनही तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल.

वेलवेट लेंगा -

लग्नसराईसाठी हिवाळ्यात वेलवेटचा लेंगा घालणं अगदी योग्य ठरेल. जांभळ्या, हिरव्या अथवा लाल रंगाच्या लेंग्यामध्ये तुमचा एथनिक लुक शोभून दिसेल. असा लुक तुम्ही लग्नसराईप्रमाणेच एखाद्या सणासुदीलाही करू शकता. जर लेंग्यावर गोल्डन वर्क असेल तर गोल्डन ज्वैलरी आणि सिल्व्हर वर्क असेल तर सिल्व्हर अथवा डायमंड ज्वैलरी कॅरी करा. लग्नसराईत वेलवेटचे ड्रेस घातल्यामुळे तुमचे फोटो आकर्षक आणि  छान दिसतील. 

लग्नसराईसाठी वेलवेटच्या ड्रेसने मस्त तयार व्हा आणि मेकअपसाठी मायग्लॅमचे प्रॉडक्ट वापरा. ज्यामुळे तुम्ही लग्नात ग्लॅमरस दिसाल. 

Beauty

MyGlamm Gift Of Glamm Box For Megastars

INR 7,360 AT MyGlamm