ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
डाएट न करताही दिसायचं असेल लग्नात बारीक, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

डाएट न करताही दिसायचं असेल लग्नात बारीक, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

प्रत्येक मुलीसाठी स्वतःचं लग्न हा अत्यंत खास दिवस असतो. लग्नाच्या वेळी मुली आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देण्याच्या प्रयत्नात असतात. बारीक दिसण्यासाठी कितीतरी महिने आधीपासूनच मुली डाएटिंग सुरू करतात. मात्र काही जणींना जिममध्ये जाणं अथवा व्यायाम करण्याइतका वेळ खरंच नसतो. तुम्हाला जर व्यायाम न करता अथवा जिमला न जाता आणि डाएट न करता लग्नात बारीक दिसायचं असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या सोप्या ट्रिक्स नक्कीच वापरू शकता. जाणून घेऊया काय आहेत या टिप्स. मुळात आपण लग्नामध्ये कोणते कपडे घालणार आहोत ते लक्षात घेणं जास्त गरजेचे आहे. त्यानुसारच आपण आपल्या टिप्स फॉलो करू शकतो. 

लेहंग्याचे अथवा साडीचे डिझाईन

Instagram

लग्नामध्ये सहसा मुली अगदी भरजरी लेहंगा अथवा साडी नेसतात. पण हे योग्य नाही. जेव्हा तुम्हाला बारीक दिसायचं आहे. तेव्हा तुम्ही लहान डिझाईन असणारे आणि कमी भरजरी असे लेहंगा अथवा साडीची निवड करावी. बारीक दिसण्यासाठी सहसा तुम्ही पातळ बॉर्डरवाले कपडे घालावेत. त्यामुळे तुमची जाडी कपड्यांमध्ये लपली जाते. तसंच तुम्ही अधिक आकर्षक दिसता. यावर हलकासा मेकअप केला की तुम्ही अगदी सुंदर दिसाल. 

ADVERTISEMENT

स्लीव्ह्ज डिझाईन

तुम्हाला डाएट न करताही बारीक दिसायचं असेल तर तुम्ही बारीक दिसण्यासाठी कोणता कपडा वापरत आहाता तेदेखील पाहणं गरजेचं आहे. कारण जितका लेहंगा गरजेचा आहे तितकेच त्याचे डिझाईनही महत्वाचे आहे. ब्लाऊजच्या कापडासाठी आणि स्लीव्हची विशेष काळजी घ्यावी लागते. लेहंग्या ब्लाऊज हा नेट अथवा शीर थ्रू फॅब्रिक असायला हवा. जेणेकरून तुम्ही यामध्ये फिट आणि बारीक दिसू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे स्लीव्हज हे साधारण हाताच्या कोपऱ्यापर्यंत शिऊन घ्या. जेणेकरून तुम्ही यामध्ये अधिक बारीक दिसाल. कारण हात जितके लहान तितके जास्त जाड दिसते. त्यामुळे सहसा साडीचा ब्लाऊज अथवा लेहंग्याचा ब्लाऊज हा पूर्ण स्लीव्ह्जचा ठेवा.

वर्षानुवर्ष टिकण्यासाठी अशी घ्या बनारसी साडीची काळजी

रंगाची निवड

आपल्याला आवडतो तो रंग आपण घेतो हे खरं आहे. पण रंगामुळेही तुम्ही बारीक दिसू शकता हेदेखील तितकंच खरं आहे. आजकाल बरेचजा मल्टिकलर रंगाच्या साड्या अथवा लेहंगा लग्नात वापरला जातो. पण तुम्हाला जर बारीक दिसायचं असेल तर तुम्ही एकाच रंगाचा लेहंगा अथवा साडी नेसायला हवी. उदाहरणार्थ लाल रंग, वाईन कलर तुम्ही यासाठी वापरू शकता. गडद रंग सहसा तुम्हाला अधिक बारीक दिसायला मदत करतो. त्यामुळे तुम्ही लग्नात गडद रंगाचा वापर करावा.

हवा असेल स्लिम लुक तर वापरा या रंगाचे कपडे

ADVERTISEMENT

दागिनेही तुमच्यासाठी ठरतात उपयोगी

बारीक दिसण्यासाठी दागिनेही तुम्हाला मदत करतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा आकार आणि मान लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आपल्या ब्रायडल ज्वेलरीचा अर्थात दागिन्यांचा विचार करायला हवा. तुमचा चेहरा जर जाड असेल तर तुम्ही गोल आकाराचा मांगटिका घेऊ नये. त्यापेक्षा तुम्ही वेगळ्या डिझाईनचा मांगटिका वापरू शकता. तसंच तुम्ही बारीक दिसण्यासाठी गळ्यामध्ये राणी हार अथवा अन्य तत्सम दागिन्यांचा वापर करू शकता. जेणेकरून तुमचा चेहरा अधिक जाड दिसणार नाही. तसंच अगदी भरगच्च दागिने घालणं सहसा टाळा. 

जंपसूट करा अशा प्रकारे कॅरी, दिसाल अप्रतिम

ओढणी

तुम्हाला लग्नात जर लेहंग्यावर ओढणी घ्यायची असेल तर तुम्हाला त्याचीही काळजी घ्यावी लागते. बारीक दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ओढणी घ्या जेणेकरून ती ट्रँगल आकारामध्ये दिसेल. ओढणीच्या प्लेट्स हा अत्यंत बारीक काढा. जेणेकरून तुम्हाला बारीक दिसण्यास मदत होईल. साडीच्या बाबततीही हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. साडीच्या प्लेट्स अर्थात पदर जर तुम्ही बारीक निऱ्या काढल्यात तुम्ही अधिक बारीक दिसता.  त्यामुळे लग्नात जर साडी नेसणार असाल तर साडीच्या पदराच्या निऱ्या बारीक काढा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT