हिवाळ्याला हळूहळू सुरूवात होत आहे. त्यामुळे वातावरणात अचानक बदल जाणवू लागले आहेत. हिवाळ्यात दमट वातावरणामुळे घरात कुबट आणि घाणेरडा वास निर्माण होतो. अशा वेळी घरात प्रसन्नता आणण्यासाठी घराला कुत्रिम पद्धतीने सुंगधित करणं गरजेचं असतं. जर घर सुंगधित असेल तर काम करण्याचा उत्साह तर वाढतोच शिवाय घरात येणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटतं. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की घरातील वातावरणाचा त्या घरात राहणाऱ्य माणसांच्या मनाच्या स्थितीवर परिणाम होत असतो. यासाठीच हिवाळ्यात घर सुंगधी ठेवणं गरजेचं आहे. जाणून घ्या आणखी काही कारणं...
कोरोनामुळे सध्या सर्वजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशावेळी हिवाळ्यातील हवामानामुळे घरात कुबट वास येऊ लागला तर त्याचा परिमाम तुमच्या मनावर आणि कामावर होऊ शकतो. अशा वेळी एखादं चांगलं रूम फ्रेशनर अथवा घराच्या देव्हाऱ्यात लावलेली सुंगधित अगरबत्ती तुमचं मन प्रसन्न करू शकते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होऊन तुमची प्रगती होऊ शकते.
घरात जर घाणेरडा वास येत असेल तर कामाचा थकवा असूनही तुम्हाला शांत झोप येत नाही. झोपेचं चक्र बिघडलं तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यासाठीच झोपण्यापूर्वी अथवा संध्याकाळी घरात धूप, कापूर अथवा अगरबत्ती लावा. ज्यामुळे तुमचा मूड सुधारेल, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल.
घरात लहान मुले असतील तर घाणेरड्या वासामुळे ती वैतागतात आणि चिडचिड करू लागतात. ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते आणि मुलांच्या अभ्यासावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन स्कुलमुळे मुलांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक आणि बौद्धिक विकासाची जबाबदारी आता पालकांनीच घेणं गरजेचं आहे. यासाठी मुले अभ्यासाला बसण्यापूर्वी घरातील वातावरण सुंगधित करा ज्यामुळे मुलांचे मन अभ्यासात रमू लागेल.
घरातील वातावरण लहरी घरात राहणाऱ्या माणसांच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर परिणाम करत असतात. यासाठी घरात सदैव सकारात्मक वातावरण निर्माण होईल याची काळजी घ्यायला हवी. जर घरात वातावरण प्रसन्न असेल तर तुमचे मन आपोआप प्रसन्न राहते. ज्या घरात असं वातावरण असतं त्या घरातील माणसांची मने नेहमी एकमेंकाशी जोडलेली असतात आणि त्यांच्यात खूप प्रेम असतं. यासाठी जाणिवपूर्वक सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप, कापूर, अगरबत्ती अशा गोष्टी लावून घर सुंगधित करा.
घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरात सकारात्मक आणि चांगले वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे. जर घरात नकारात्मक लहरी निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो आणि पर्यायाने त्यामुळे तुमच्या काम करण्याच्या शक्तीवर आणि आर्थिक परिस्थितीवरही त्याचा परिणाम दिसून येतो. यासाठीच घरात सुख, समाधान, यश, ऐश्वर्य नांदण्यासाठी घरातील वातावरण प्रसन्न असणं गरजेचं आहे. घरातील वातावरण जितकं चांगलं असेल तितकं ते तुमच्या जीवनात सुख आणि ऐश्वर्य खेचून आणतं.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा -
तुमचं वर्क फ्रॉम होम ऑफिस कसं ठेवाल स्वच्छ आणि सुंदर
घरच्या झाडांची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants In Marathi)