कॉफीचे डाग घालवायचे असतील तर करा सोपे उपाय

कॉफीचे डाग घालवायचे असतील तर करा सोपे उपाय

कॉफी खूप आवडत असली तरीही कोणत्याही आवडत्या कपड्यांवर पडलेली कॉफी मात्र आपल्याला नक्कीच आवडत नाही. कारण कॉफीचे डाग कपड्यांवरून कितीही घासले तरीही निघत नाहीत. तुम्हालादेखील हा अनुभव कधी ना कधीतरी आलाच असेल. कॉफीचे कपड्यांवर पडलेले डाग सहसा पटकन निघत नाहीत आणि हे डाग काढताना नक्कीच जीव निघतो. जरी कपडे नीट धुतले तरीही कुठेतरी त्याचा लहानसा डाग राहतोच असं तुमच्याही लक्षात आलं असेल. पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, यावर आमच्याकडे सोपा उपाय आहे तर...काही अशा गोष्टी आहेत ज्यांनी कॉफीचा डाग नक्कीच निघून जातो. फक्त त्याचा कसा वापर करायचा हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही तुम्हाला तीन सोपे हॅक्स सांगत आहोत.

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

सोडा वॉटर

तुम्हाला माहीत आहे का? तुमचा आवडता क्लब सोडा हा केवळ कॉकटेल अथवा मॉकटेल तयार करण्यासाठीच उपयोग पडत नाही तर याचा उपयोग तुमच्या कपड्यांवरील कॉफीचा डाग काढण्यासाठीही होतो. तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये असाल आणि जर तुमच्या कपड्यांवर अचानक कॉफी सांडली तर घाबरून जाऊ नका. तुम्ही हे डाग नक्कीच सहजपणे काढू शकता.  थोडासा सोडा घ्या आणि ज्या ठिकाणी कॉफी सांडली आहे अथवा डाग पडला आहे तिथे सोड्याने घासा. हा डाग पटकन जाण्यासाठी याची मदत तुम्ही घेऊ शकता. 

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

लिंबाचा रस

Shutterstock

कॉफीचा कपड्यांवरील डाग पटकन घालविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे लिंबाचा रस. कॉफीचा डाग पडला असेल तर तुम्ही एक स्वच्छ कापड घ्या. लिंबाच्या रसामध्ये हे कापड भिजवा आणि मग कपड्यांवर पडलेला डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या कपड्याचा वापर करा. लिंबाचा रस हा ब्लिचींग स्वरूपात काम करतो आणि कपड्यांवरील जिद्दी डाग आणि तेलाचे डाग हटविण्यासाठीही याचा उपयोग होतो. लिंबू हे केवळ चेहऱ्यासाठीच नाही तर अगदी कपड्यांवरील डाग घालविण्यासाठीही उपयुक्त ठरते.  यातील विटामिन सी युक्त गुण डाग काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. तुम्ही डाग पडलेल्या ठिकाणी काही काळ नुसती लिंबाची साल अर्थात लिंबाचा रस लाऊन ठेवलात आणि थोड्या वेळाने कपडे धुतल्यास, तुम्हाला डाग निघून गेल्याचे दिसून येईल. तसंंच तुम्हाला पुन्हा एकदा तो कपडा अगदी जसाच्या तसा वापरता येईल. 

शर्टावर लिपस्टिकचा डाग लागल्यास, काढा सोप्या उपायांनी

शँपू

freepik.com

शँपू हा कॉफीच्या डागासाठी उत्तम मानला जातो. तुमच्या कपड्यांवर जर कॉफीचा डाग पडला असेल तर तुम्हाला त्याजागी केवळ एक थेंब शँपू घेऊन त्यात पाणी मिक्स करा. नंतर डागावर हे घासा आणि डाग पूर्ण जाईपर्यंत तुम्ही हे हलक्या हाताने घासा. तुम्ही हे केल्याने तुमच्या कपड्यांवरील कॉफीचा डाग पटकन निघून जातो. तुम्हाला जास्त रगडावेही लागत नाही. शँपूमध्ये असणाऱ्या काही केमिकल्समुळे डाग पटकन जाण्यास मदत मिळते. शँपूमध्ये असणारे सल्फेट हे कपड्यांवरील कॉफीचा डाग काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही कॉफीचा डाग कपड्यावर पडला तर त्रास करून घेऊ नका. यासाठी हे सोपे तीन उपाय करून यातून सुटका करून घेऊ शकता.

सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक