दिसायचं असेल तरूण तर 5 सोप्या टिप्स, नक्की करा फॉलो

दिसायचं असेल तरूण तर 5 सोप्या टिप्स

कितीही वय झालं तरीही तरूण दिसायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की पार्लरमध्ये जाऊनच अधिक तरूण दिसता येतं. पण तरूण दिसणं इतकंही अवघड नाही. तुम्ही काही आम्ही सांगितलेल्या सोप्या टिप्स (5 simple tips) वापरल्या तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि तुम्ही याचा वापर करून तुम्ही नियमित तरूण दिसू शकतात. तसंच या टिप्स तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. तरूण लुक मिळविण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल ते तुम्ही या लेखातून जाणून घ्या. अशाच काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी - 

मॅट बेस्ड मेकअपचा वापर

Beauty

MANISH MALHOTRA LIMITED EDITION MAKEUP BAG

INR 1,495 AT MyGlamm

यंग लुकसाठी तुम्ही नेहमी मॅट बेस्ड मेकअप उत्पादनांचा वापर करावा. तसंच मॅट बेस्ड मेकअप उत्पादन हे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या लपविण्यास आणि येण्यास कमी करते. कारण तुम्ही जर चेहऱ्यावर ग्लॉसी मेकअप केलात तर त्यामुळे चेहरा जास्त हायलाईट होतो आणि तुम्ही दिसताना तरूण न दिसता वयाने मोठे दिसता. त्यामुळे ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवायलाच हवी. 

थ्री इन वन फाऊंडेशन

Beauty

Total Makeover FF Cream Foundation Palette - Cappuccino

INR 1,450 AT MyGlamm

तरूण दिसण्यासाठी दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही थ्री इन वन फाऊंडेशनचा वापर करा. तुमच्या जवळ तयार होण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही थ्री इन वन फाऊंडेशनचा वापर करा आणि अगदी मिनिट्समध्ये तुम्हाला अगदी फ्रेश आणि तरूण लुक मिळेल. या फाऊंडेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थकवा तर लपवू शकताच.  त्याशिवाय तुमचा चेहरा थोराड वाटत असेल तर त्याचा थोराडपणा कमी करण्यासाठीही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. 

डोळ्यांचा मेकअप करा लाईट

Make Up

Manish Malhotra Eye Advanced Makeup Kit by MyGlamm

INR 1,999 AT MyGlamm

तरूण लुक हवा असेल तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप अत्यंत लाईट करा. तुमच्या ओठांना लागणारी लिपस्टिक आणि डोळ्यांसाठी करण्यात येणारा मेकअप यामध्ये किमान दोन शेड्सचा फरक दिसायला हवा. तुम्हाला थोराड लुक नको असेल आणि तरूण दिसायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता.  ही टिप अत्यंत सोपी आणि तत्काळ लागू होणारी आहे. 

फ्रेश रंगांचा करा वापर

Beauty

LIT Liquid Matte Lipstick- Datereview

INR 395 AT MyGlamm

तुम्हाला तरूण आणि फ्रेश लुक हवा असेल तर कोरल, ऑरेंज, गुलाबी अशा ब्राईट रंगांचा आणि फ्रेश ताज्या रंगांंचा वापर मेकअप करताना करायला हवा. एकच त्याच त्याच शेड्सची लिपस्टिक वापरण्यापेक्षा तुम्ही आता बदलत्या काळानुसार वापरलेली लिपस्टिक तुम्हाला अधिक चांगला आणि तरूण लुक मिळवून देते. याचा वापर केल्यास,  तुमचे वय किमान 8-10 वर्षांनी लहान दिसून येते. ही टिप नक्कीच तुम्हाला तरूण दिसायला अधिक उपयोगी ठरेल. 

हेअरस्टाईलची योग्य निवड

बऱ्याचदा चुकीची हेअरस्टाईल निवडल्याने तुमचे वय अधिक दिसते.  तुम्हाला तरूण दिसायचे असेल तर तुम्ही नीट विचार करून हेअरस्टाईल करा. तरूण लुकसाठी तुम्ही केसांचे स्ट्रेटनिंग करून केसांना नवा लुकही देऊ शकता.  यामुळे तुमच्या दिसण्यातही फरक पडतो आणि तुमचा लुक अधिक चांगला आणि फ्रेश दिसतो. तुम्हाला स्ट्रेटनिंग आवडत नसेल तर तुम्ही किमान  तुमच्या केसांचा भांग तरी बदला आणि स्वतःमध्ये फरक पाहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक