ADVERTISEMENT
home / Weight Loss
अबब! बदाम पीठाच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल वजन, असा करा वापर

अबब! बदाम पीठाच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल वजन, असा करा वापर

वजन कमी करण्यासाठी आहारात अनेक बदल आपण करतो. चांगल हेल्दी असा आहार घ्यायला सुरुवात करतो. वजन कमी करायचं असेल तर आहारातून सगळ्यात आधी फॅट कमी करावे लागते. त्यानंतर साखर आणि अति आहार असे सगळे आपण कमी करण्याचा आटोकाट करण्याचा प्रयत्न करतो. पण हे डाएट करताना अनेकदा आपला संयम सुटतो. जी गोष्ट खायची नाही अशाच पदार्थांवर आपण फडशा पाडतो. जर तुम्हाला गोड आवरता येत नसेल आणि काहीतरी चांगलं खायची इच्छा असेल तर तुम्ही बदामाच्या पीठापासून तयार केलेले काही खास पदार्थ खाऊ शकता. बदाम पीठ हे आरोग्यासाठी फारच चांगले आहे. Almond flour नावाने हे पीठ ओळखले जाते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.

कपाळावर वाढतंय टक्कल? या उपायाने झाकता येईल टक्कल

Almond flour अर्थात बदामाचे पीठ म्हणजे काय?

बदामाचे पीठ

Instagram

ADVERTISEMENT

अख्ख्या बदामापासून जे पीठ बनवले जाते त्याला बदामाचे पीठ म्हणतात. बदामाचे पीठ हे कोरड्या बदामापासून बनवले जाते. बदामाचे पीठ बनवण्याची ही पद्धत थोडी वेगळी आहे. बदाम भिजवून त्याच्या साली काढून त्यांना वाळवले जाते. बदाम चांगले कडकडीत सुकले की, मग त्याला बारीक दळले जाते. त्याचाच उपयोग बदामाचे पीठ म्हणून केला जातो. 

बदामाच्या पीठाने वजन होते कमी

बदाम पीठापासून बनवा ब्राऊनी

Instagram

मैद्याच्या पीठाला पर्याय म्हणून बदामाचे पीठ वापरले जाते. बदमाच्या पीठापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्याचा फायदा कसा होतो ते जाणून घेऊया 

ADVERTISEMENT
  • बदामाच्या पीठामध्ये कार्ब्स( Carbs) मैदा आणि गव्हाच्या पीठाच्या तुलनेत फार कमी असते. त्यामुळे शरीरात जास्त कार्ब्स जात नाहीत 
  • बदामाच्या पीठामध्ये साखर कमी असते त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही बदामाचे पीठ मदत करते. 
  • बदाम पीठाच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. यामध्ये असलेले ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 
  • शरीरातील फॅट कमी झाल्यामुळे पिळदार शरीराचा बांधा मिळण्यास मदत होते.

वजन वाढल्यास करा सोप्या पद्धतीने करा शरीर डिटॉक्स

असे करा बदाम पीठाचे सेवन

  1. बदाम पीठाचा फायदा लक्षात घेत तुम्ही त्याचा वापर करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करु शकता. बदामाच्या पीठाचा उपयोग करुन तुम्हाला छान पेस्ट्री करता येतील. कधीतरी ज्यावेळी तुम्हाला खूप गोड खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्ही बदामाचा अशा पद्धतीने वापर करुन पेस्ट्री तयार करा. 
  2. बदामाच्या पीठाचा उपयोग अनेक जण रोजच्या जेवणात देखील करतात. गव्हाचे पीठ आणि बदामाचे पीठ एकत्र करुन पोळ्या केल्या जातात. ज्या अधिक चविष्ट आणि पौष्टिक लागतात. 
  3. बदामाचे पीठ थोडे महाग असते. त्यामुळ बजेटचा विचार करुनच तुम्हाला त्याचा वापर करावा लागतो. बदामाचे पीठ विकत घेण्यापेक्षा घरीच केले तर ते अधिक परवडते. 

 आता आहारात बदामाच्या पीठाचा वापर करुन जर तुम्ही वजन झपाट्याने कमी करण्याचा विचार करत असाल तर आताच करा याचा वापर. 

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

10 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT