ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
उटणे लावण्याचे फायदे -  ubtan in marathi

उटणे लावण्याचे फायदे, कसे तयार कराल घरच्या घरी (Benefits Of Ubtan In Marathi)

उटण्याचे नाव घेतलं की आपल्या सर्वात पहिले डोळ्यासमोर आणि डोक्यात येते ती म्हणजे त्वचा. अगदी लग्नातही नवरीच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी यासाठी उटण्याचा वापर होतो. पण उटणे हे फक्त नवरीसाठी नाही तर तुम्ही तुमची त्वचा नियमित चमकविण्यासाठीही याचा उपयोग करून घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन उटणे आणण्याची अजिबात गरज नाही. खरं तर उटणे म्हणजे एक प्रकारचे हर्बल मास्क आहे ज्याचा उपयोग अगदी पुरातन काळापासून करण्यात येतो. तुमच्या आजीच्या बटव्यात तर हे हमखास सापडते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासह तुमचे आरोग्य आणि तुमचे सौंदर्य जपण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा अगदी नैसर्गिक पद्धतीने त्वचा जपायची असेल तर तुम्ही नियमित उटण्याचा वापर करा आणि घरच्या घरी उटणे तयार करून त्याचा फायदा करून घ्या. त्याआधी उटणे म्हणजे नक्की काय ते आपण पाहू.

उटणे म्हणजे काय? (What Is Ubtan)

उटणे म्हणजे काय?

Shutterstock

ADVERTISEMENT

पुरातन काळापासून उटणे हे अत्यंत उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणून ओळखले जाते.  मुळात हे आयुर्वेदिक असून यामध्ये उपयोग करण्यात आलेले साहित्य हे केमिकलमुक्त आणि त्वचेला फायदेशीर ठरते. शरीराच्या स्वास्थतेसाठी उटणे अत्यंत चांगले मानण्यात येते. उटण्याचा उपयोग राजा – महाराजांपासून अगदी  सामान्य व्यक्तींपर्यंत पूर्वीपासून करण्यात येत आहे. वनस्पती आणि सुगंधी  तेलांचा मिलाफ करून उटणे तयार करण्यात येते. याचे एकत्रित गुण त्वचा अधिक चमकविण्यासाठी आणि ताजीतवानी राहण्यासाठी मदत करतात. आपल्याकडे उटणे घरी बारीक करण्यात आलेल्या डाळी आणि अगदी सहनजतेने मिळणाऱ्या गोष्टींपासून तयार करण्यात येते. त्वचेला अधिक चांगले करण्यासाठी उटण्याचा उपयोग करण्यात येतो. 

घरगुती उटणे हे दूध, बेसन, बदाम पावडर, हळद, क्रिम, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी याचा वापर करून सर्रास बनविण्यात येते. तर काही वेगवेगळ्या पदार्थांचाही यामध्ये समावेश करण्यात येतो. या लेखातून आपण उटण्याचे नक्की काय फायदे होतात तेदेखील पाहणार आहोत. महत्वाचे म्हणजे उटणे तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू या तुम्हाला घरच्या घरीच मिळतात.  तुम्हाला खूप फिरून या वस्तू शोधाव्या लागत नाहीत.  तसंच याचा अप्रतिम फायदा होतो. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीने शरीरातील दोषांचा विचार करून उटण्याचा वापर करायला हवा. शरीरातील दोषांनुसार तयार करण्यात  आलेले उटणे हे त्वचेवरील पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करते. 

वात दोष असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले उटणे हे त्वचेला पोषण देते आणि वात दोष असलेल्या व्यक्तींसाठी तयार केलेले उटणे हे सामान्य तापमानावरच तुम्ही वापरू शकता. वातदोष स्वरूपाचे उटणे हे तुम्हाला जाडी वाढण्याचा त्रास असेल तर त्यासाठीदेखील उपयुक्त ठरते. 

दरम्यान पित्त दोष असणाऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे उटणे हे थंड तापमानवर लावण्यात यावे. पित्त दोष दूर करण्यासाठी तयार केलेले उटणे हे शरीराच्या आतील उष्णता बाहेर काढून टाकते. त्वचेवर आलेले मुरूमं आणि पुळ्या यांची समस्या दूर करण्यासाठी या उटण्याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

तर कफ दोष असणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करण्यात येणारे उटणे हे गरम तेल मिक्स करून बनवावे. कप दोष दूर कऱण्यासाठी तयार करण्यात येणारे उटणे  हे शरीरातील कफसारख्या समस्या दूर करण्यास उपयोगी ठरते. तसंच शरीरातील सर्वात आवश्यक लिक्विडचा फ्लो सामान्य करण्यास याची मदत मिळते. 

उटणे लावण्याचे फायदे (Benefits Of Ubtan In Marathi)

उटणे लावण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला कदाचित त्वचेला चमक आणण्याचा फायदा माहीत असेलच. पण त्याशिवाय  उटणे लावण्याचे फायदे अनेक आहेत. 

त्वचेवर चमक आणण्यासाठी (Skin Glow)

त्वचेवर चमक आणण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

उटणे हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. ज्यामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. हे नियमित स्वरूपात लावल्यास, तुमची त्वचा अधिक ताजीतवानी आणि मऊ मुलायम राहते. उटण्यामध्ये वापरले जाणारे बेसन हे त्वचेवरील डेड स्किन घालवून तुम्हाला उत्तम त्वचा मिळवून देण्यास अधिक लाभदायक ठरते. तर यामध्ये चंदन पावडर मिक्स केल्यास, त्वचेवरील अधिक तेल निघून जाण्यास मदत मिळते. दुधाने त्वचेवरील काळे डाग कमी होतात आणि त्यामळे त्वचेवर अधिक चमक आणण्यासाठी उटण्याचा उपयोग होतो. म्हणूनच त्वचेवरील चमक कायम ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच उटण्याचा वापर करायला हवा. 

डागविरहीत त्वचेसाठी (Gives Clear Skin)

कोणत्याही व्यक्तीला त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर डाग असलेले आवडत नाहीत. पण बऱ्याच जणांना त्वचेवर डागांची समस्या असते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, मुरूमं येणे आणि त्याचे डाग राहणे अथवा प्रदूषणामुळए चेहऱ्यावर काळपटपणा येणे या सगळ्या गोष्टी अत्यंत कॉमन झाल्या आहेत. उटण्याच्या नियमित वापराने या समस्येपासून सुटका मिळविण्याचा फायदा होतो. तुम्ही जर सतत उन्हात काम  करत असाल तर डागविरहीत त्वचेसाठी उटणे हा उत्तम उपाय आहे. तसंच तुमची त्वचा अधिक टॅन झाली असेल तर तुम्ही उटण्याने त्यावरील काळेपणा घालवू शकता.  

अधिक तरूण दिसण्यासाठी (Makes You Look Younger)

अधिक तरूण दिसण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

तुमचं वय इतकं मोठं वाटत नाही असं कोणी म्हटलं तर आपल्याला नक्कीच आनंद होतो. पण तशी त्वचेची काळजी घेणंही गरजेचे आहे. हळदीला जगातील सर्वात जुने आणि वापरण्यात आलेले अँटिबायोटिक मानण्यात येते. हळदीमध्ये शरीरावर झालेल्या जखमा बरं करण्याचीही ताकद आहे. उटण्यामध्ये हळदीचा वापर हा सर्रास केला जातो. त्याशिवाय उटणे पूर्णच होत नाही. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुण असल्याने त्वचेसाठी उत्तम ठरते. त्वचेवरील निस्तेजपणा काढून टाकून तुम्हाला अधिक तजेलदार आणि तरूण दाखविण्याचे काम हळद घातलेले उटणे करते. अगदी पहिल्यापेक्षा अधिक तरूण दिसायचे असेल तर तुम्ही हळदीच्या उटण्याचा वापर नक्कीच करू शकता. याशिवाय गडृद डाग असणारी त्वचा असेल तर त्यासाठीदेखील याचा उपयोग होतो. 

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी (Remove Body Hair)

उटण्यामुळे तुमच्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यास मदत  मिळते. वास्तविक उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी अत्यंत सौम्य, नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत आहे. तसंच हा अतिशय परिणामकारक उपायही आहे. अगदी पूर्वी नवजात बाळांच्या शरीरावरील केस काढण्यासाठीही उटण्याचा वापर करण्यात येत होता. आताही बऱ्याच ठिकाणी बाळांना हे नैसर्गिक उटणे लावण्यात येते. या उटण्याने शरीरावरील केस काढण्याचा फायदा मिळतो. 

अॅक्ने रोखण्यास मदत (Prevents Acne)

अॅक्ने रोखण्यास मदत

ADVERTISEMENT

Shutterstock

उटण्याने केवळ त्वचेचे टेक्स्चर मुलायम होत नाही तर त्वचा अधिक सुंदर होते आणि चेहऱ्यावर येणारे अॅक्ने अर्थात मुरूमांना रोखण्याचे कामही उटणे करते. हळद आणि चंदनामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात. हे त्वचेच्या आत जाऊन अॅक्ने आणि मुरूमं होण्याचा त्रास कमी करण्यास याची मदत होते.

त्वचेमध्ये उजळपणा आणण्याासाठी फायदेशीर (Gives You Toned Skin)

उटण्याचा उपयोग तुम्ही त्वचेमध्ये उजळपणा आणण्यासाठीही करू शकता. यामध्ये असणारी चंदन पावडर त्वचेवर अधिक फायदेशीर ठरते. हे उटणे नियमितपणे वापरले तर चेहऱ्यावर रोमछिद्रे टाईट करण्यासाठी याची दत  मिळते आणि त्यामुळे त्वचा अधिक तरूण दिसते आणि उजळते.  त्वचेमध्ये असणारी घाण निघून जाण्यास मदत  मिळते. तसंच चंदनामुळे त्वचेमध्ये उजळपणा येतो. 

अँटि टॅन मास्क म्हणून फायदेशीर (Anti Tan Mask)

अँटि टॅन मास्क म्हणून फायदेशीर

ADVERTISEMENT

Shutterstock

उटणे लावण्याचा फायदे अनेक आहेत आणि याचा फायदा तुम्ही अँटिटॅन मास्क म्हणूनही करून घेऊ शकता. दोन चममचे बेसन घेऊन त्यात एक चमचा दही आणि पाव चमचा लिंबाचा रस मिसळून उटणे तयार करून घ्या आणि हे तुम्ही चेहऱ्याला लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा आणि तुमच्या चेहऱ्यावरील फरक पाहा. बेसन आणि लिंबाच्या  रसामुळे टॅन निघून जायला मदत मिळते आणि हे उटणे तुम्ही कधीही तयार करून वापरू शकता. 

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी (To Remove Blackheads)

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी

Shutterstock

ADVERTISEMENT

ब्लॅकहेड्सचा त्रास  प्रत्येकालाच असतो. त्यासाठी  अनेक उपायही केले जातात. पण घरच्या घरी केलेल्या उटण्याने तुम्ही ब्लॅकहेड्सही काढून टाकू शकता. बेसन, हळद पावडर, चंदन पावडर, कडुलिंबाची पावडर आणि काकडी किसून त्याचा रस काढून  उटणे तयार करून घ्या. हे उटणे त्वचेला लावा आणि सुकू द्या. सुकल्यावर काही मिनिट्सने मसाज करा आणि आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा वापर केल्यास, तुमच्या ब्लॅकहेड्सच्या समस्येवर तुम्हाला नक्कीच समाधान मिळू शकेल. 

शरीरावर आलेले पॅच घालविण्यासाठी (Patchy Complexion)

बऱ्याचदा काही जणांच्या शरीरावर उन्हाच्या त्रासामुळे पॅच उमटतात. पण हे पॅच  अजिबातच दिसायला चांगले दिसत नाहीत. यासाठी डॉक्टरांकडे जाऊन महाग उपचार करण्यापेक्षा तुम्हाला सोपा उपाय आणि फायदेशीर उपाय आहे तो म्हणजे उटण्याचा वापर करणे. तुम्ही ब्रेडचा चुरा,  बेसन, गव्हाचे पाठी, लिंबाचा रस, काकडीचा ज्युस, बटाट्याचा रस, हळद पावडर आणि ताजे क्रिम एकत्र करून उटणे तयार करून घ्या.  हे उटणे तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या पॅचच्या ठिकाणी लावा. तुम्ही संंपूर्ण  चेहऱ्याला लावला तरीही चालेल. हलकेसे सुकल्यावर तुम्ही हाताने हा मळ काढा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून  तुम्ही असं दोन वेळा केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील पॅच गेलेले दिसून येतील. हे उटणे तुम्हाला अशा तऱ्हेने फायदेशीर ठरते.  

टॅनिंग दूर करण्यासाठी (To Remove Tanning)

टॅनिंग दूर करण्यासाठी

Shutterstock

ADVERTISEMENT

आपल्याकडे उन्हाचा त्वचेला खूपच त्रास होतो. जरा जरी उन्हामध्ये फिरलं की त्वचा टॅन होते. मग अशावेळी तुम्हाला उटण्याचा फायदा मिळतो. अंगावरील हे टॅन काढण्यासाठी तुम्ही संत्रे, लिंबू आणि कडुलिंबाच्या सुक्या पानांची पावडर घ्या आणि हे एकत्र दुधामध्ये मिक्स करा. हे तयार केलेले उटणे तुम्ही अंगाला लावलं तर टॅन घालविण्यासाठी मदत मिळते. हे उटणे एक्सफोलिएशनचे काम करते. तसंच रोज याचा वापर केल्यास, काहीच आठवड्यात तुम्ही तुमच्या त्वचेवरील फरक जाणवू शकता.  

उटणे कसे तयार कराल (How To Make Ubtan In Marathi)

उटणे कसे तयार कराल

shutterstock

ADVERTISEMENT

उटणे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येते. पण सोपी पद्धत आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. हे उटणे आयुर्वेदिक असून तुम्ही घरच्या घरी पटकन तयार करू शकता. यातील काहीही साहित्य नसेल तर किमान बेसन, गुलाबपाणी आणि लिंबाच्या रसानेही तयार होणारे उटणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. 

आर्युवेदिक उटण्यासाठी लागणारे साहित्य:

बेसन अर्धी वाटी, मसूर डाळीचे पीठ अर्धी वाटी, चंदन पावडर दोन चमचे, मुलतानी माती दोन चमचे, अनंत मूळ पावडर एक चमचा, गव्हला कचरा पावडर एक चमचा, आंबेहळद पाव चमचा, स्वयंपाकातील हळद पाव चमचा आणि दारुहळद पाव चमचा, कचोरा पावडर एक चमचा, वाळा पावडर एक चमचा, गुलाबाची पावडर, आवळा पावडर एक चमचा, नागरमोथा पावडर एक चमचा, बावची पावडर एक चमचा, कडुलिंबाची पावडर एक चमचा (यातील जे साहित्य तुमच्या घरात उपलब्ध असेल आणि ज्याची तुम्हाला अॅलर्जी नसेल ते साहित्य तुम्ही उटणं तयार करण्यासाठी घेऊ शकता.)

उटणे तयार करण्याची पद्धत:

ADVERTISEMENT
  • वरील साहित्यातील बेसन,मसूर डाळीचे पीठ व कडूलिंब पावडर हे साहित्य सोडून इतर  सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या 
  • मिश्रण जाडसर असल्यास अथवा लहान मुलांना वापरायचे असल्याचे ते वस्त्रगाळ करुन घ्या. उटणे लहान मुलांच्या त्वचेसाठीही उत्तम ठरते.
  • चाळून न घेतल्यास त्यापासून नैसर्गिक स्क्रब तयार होतो. 
  • उटणं लावण्यापूर्वी तयार उटण्याच्या मिश्रणात बेसन, मसूर डाळीचे पीठ आणि कडूलिंब पावडर मिसळा मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या
  • मिश्रणात सायीचे कोमट दूध अथवा गुलाबपाणी मिसळून उटणं सर्वांगाला लावा, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण निघून जाईल आणि त्वचेची छिद्रे मुळापासून स्वच्छ झाल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. 

उटणे अंगाला लावण्याची योग्य पद्धत:

सर्व प्रथम कोमट अभ्यंगतेल अथवा शुद्ध नारळाचे तेल संपूर्ण अंगाला लावा. त्याने तुमच्या त्वचेवर हळूवार मसाज करा त्यानंतर अंगाला उटणं लावा. तेल लावल्यामुळे कोरडी त्वचा मऊ होईल आणि उटणं लावल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. उटण्यामुळे अलर्जी होऊ शकते का?

उटणे हे खरं तर आयुर्वेदिक आहे. त्याने अलर्जी होण्याचा सहसा धोका नसतो. पण काही जणांना जर एखाद्या पावडरची मुळातच अलर्जी असेल तर त्यांनी टेस्ट न करता उटणे लाऊ नये.

2. कोणकोणते उटणे वापरता येते?

घरच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने उटणे बनवता येते. तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार उटणे तयार करून वापरता येते. त्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या प्रकृती वात, पित्त अथवा कफ स्वरूपाची आहे की नाही याची माहिती करून घ्यायला हवी. त्यानुसार तुम्हाला उटणे लावल्यास फायदा मिळतो.

3. घरी उटणे तयार करताना काही विशिष्ट सामानाची गरज भासते का?

घरच्या घरी उटणे तयार करण्यासाठी तुमच्या घरात असणाऱ्या पदार्थांचा वापर करूनही तुम्ही उटणे तयार करू शकता. याचा उपयोग तुमची त्वचा अधिक चांगली राखण्यासाठी होतो. त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींमधून तुम्ही उटणे तयार करू शकता.

You Might Also Like

ADVERTISEMENT

Ubtan – Benefits & Recipe in English

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT