ADVERTISEMENT
home / Dry Skin
Best Facial Kits For Dry Skin In Marathi

कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)

कोरड्या त्वचेला नेहमीच खास निगा राखण्याची गरज भासते. कारण थोडंसं दुर्लक्ष झालं तर त्याचे दुष्परिणाम त्वचेवर लगेच दिसू लागतात. जरी तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेवर भरपूर क्रिम लावलं तरी ते क्रिम तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का हे लक्षात ठेवायला हवं. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेशिअल करणं म्हणजे जणू काही त्वचेचे लाडच पुरवणं. कारण फेशिअलमध्ये निरनिराळ्या स्टेप्स असतात ज्यामुळे चेहऱ्यावर लावलेलं क्रिम त्वचेत हळूहळू मुरू लागतं. यासाठीच कोरड्या त्वचेच्या महिलांनी फेशिअल करताना हे खास फेशिअल किट वापरावं. कारण कोरड्या त्वचेसाठी फेशिअल किट खास बनवण्यात आले आहेत.

VLCC Diamond Facial Kit

व्हिएलसीसीचं डायमंड फेशिअल किट तुमच्या चेहऱ्याला हिऱ्याप्रमाणे चमक देतं आणि त्वचेला फ्रेश करतं. तुम्ही घरच्या घरी हे फेशिअल करू शकता. विशेष म्हणजे या मध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही. यातील डायमंड स्क्रब तुमच्या त्वचेवरील डेड स्किन काढून टाकतं. त्याचप्रमाणे खोलवर जाऊन त्वचेतील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स नष्ट करतं. शिवाय यामध्ये भरपू प्रमाणात जोजोबा ऑईल, व्हिटॅमिन ई आणि हिऱ्याच्या अर्काचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषणही होतं आणि त्वचेवर हिऱ्याप्रमाणे चमकही दिसू लागते. त्वेचेच्या पेशींनी टवटवीत करण्यासाठी यामध्ये खास डायमंड डिटॉक्स लोशन देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे यातील डायमंड मसाज जेलमध्ये खास कोरफड आणि ग्लिसरिनचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात. शेवटी वापरण्यासाठी दिलेला डायमंड वॉश ऑफ मास्क ऑरेंज पिल, व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरिन युक्त आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं खास पोषण होतं आणि त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. 

फायदे –

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
  • अप्रतिम सुगंध
  • स्वस्त आणि परवडणारी किंमत
  • हायजेनिक पॅकेजिग
  • एका किटमध्ये होतो दोन वेळ वापर
  • त्वचा स्वच्छ होते
  • कोरडी त्वचा मॉईस्चराईझ होते
  • जास्त दिवस परिणाम दिसतो
  • त्वरीत परिणाम जाणवतो
  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग


तोटे –

ADVERTISEMENT
  • पॅराबेन आणि सल्फेट फ्री नाही

Oriflame Love Nature Tropical Fruits Facial Kit

ओरिफ्लेमचं हे लव्ह नॅचरल ट्रॉपिकल फ्रूट फेशिअल किट घरच्या घरी अगदी फक्त चार स्टेप्समध्ये वापरता येईल असं आहे. यात वापरण्यात आलेले घटक हे पपई, पेरू, अननस अशा फळांचे असल्यामुळे ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. नैसर्गिक घटकांमुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. या किटमध्ये तुमच्यासाठी फेस क्लिंझर, स्क्रब, फेस मसाज क्रिम आणि फेस मास्क देण्यात येतो. ज्यामुळे तुमची त्वचा प्रथम मुळापासून स्वच्छ होते. त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, तेल निघून जातं. स्क्रबमुळे त्वचेवरील डेड स्किन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी होतात. क्रिम आणि फेस मास्क त्वचेला पोषण आणि  मऊपणा देतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते.

फायदे –

  • संवेदनशील त्वचेसाठी उत्तम
  • नॉन ग्रेसी फेस क्रिम
  • स्क्रबमुळे होते त्वचा स्वच्छ
  • क्रिममुळे त्वचा हायड्रेट राहते
  • हायजिन ट्युब पॅकेजिंग
  • स्वस्त आणि मस्त
  • सुंगधित आणि मनमोहक
  • लगेच परिणाम दिसतो

तोटे –

  • हेव्ही मेकअप काढण्यासाठी क्लिंझर उपयुक्त नाही
  • पॅकेजिंग ट्रॅव्हल फ्रेंडली नाही

Lotus Herbals Radiant Gold Cellular Glow Facial Kit

लोटस कंपनीचं हे रेडिअंट गोल्ड फेशिअल किटमध्ये सोन्याचा अर्क वापरण्यात आला आहे. ज्यामुळे तीस मिनिटांमध्ये तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होते असा कंपनीकडून सांगण्यात येतं. या फेशिअल किटचे वैशिष्ट्य असं की यात तुम्हाला वापरण्यासाठी अतिशय सोप्या अशा स्टेप्समध्ये प्रॉडक्टचं पॅकेजिंग करण्यात आलं आहे. ज्यामध्ये क्लिंझिंग स्क्रब, अॅक्टिव्हेटर, मसाज क्रिम, फेस मास्क यांचा समावेश आहे. स्टेप बाय स्टेप हे किट वापरण्यासाठी तुम्हाला फक्त तीस मिनिटं लागतात. ज्यामुळे तुमची त्वचा त्वरीत मऊ आणि चमकदार दिसू लागते. 

ADVERTISEMENT

फायदे –

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम
  • क्लिंझिंग स्क्रबमुळे त्वचा होते स्वच्छ
  • सोन्याच्या अर्काने युक्त उत्पादने
  • फेशिअलसाठी वेळ कमी लागतो
  • हायजेनिक ट्यूब पॅकेजिंग

तोटे –

  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग नाही

O3+ Glow As You Go Facial Kit

ओथ्री प्लसचे हे फेशिअल किट तुमच्या त्वचेवर एक छान ग्लो येण्यासाठी आणि त्वचा मऊ होण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. हे किट वापरण्यासाठी एकूण चार स्टेप्स आहेत. ज्यामध्ये हायड्रेटिंग अॅंड सूदिंग फेस वॉश, मिल्क स्क्रब, डर्मा फेस मास्क, अॅलो डर्मा हायड्रेटिंग जेल यांचा समावेश आहे. स्टेप बाय स्टेप हे किट वापरण्यामुळे तुम्हाला एखाद्या स्पामध्ये फेशिअल केल्यावर जसा ग्लो मिळतो तसा ग्लो मिळू शकतो. कारण यामध्ये वापरण्यात आलेला फॉर्म्युला खास कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त असा आहे.

फायदे –

ADVERTISEMENT
  • संवेदनशील त्वचेसाठी अतिशय उपयुक्त
  • त्वचा खोलवर हायड्रेट होते
  • त्वचा स्वच्छ आणि मऊ होते
  • त्वचेचा दाह कमी होतो
  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग
  • मनाला वेड लावणारा सुगंध

तोटे –

  • थोडे महाग आहे
  • पॅराबेन फ्री प्रॉडक्ट नाही

Jovees Fruit Facial Value Kit

जोवीसचे हे फ्रूट व्हॅल्यू किट नैसर्गिक फळांच्या पावडरने युक्त आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक चांगले फायदे मिळतात. या फेशिअल किटमध्ये पपई, सफरचंद, केळं आणि अॅव्होकॅडोचा वापर करण्यात आला आहे. यातील पपईच्या अर्कामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. केळ्याच्या अर्कामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होते. यामध्ये तुमच्या त्वचेचं पोषण करण्यासाठी व्हिटॅमिन्सस आणि अॅंटि ऑक्सिडंट वापरण्यात आले आहेत. एकूण सहा स्टेप्समध्ये तुम्ही हे फेशिअल किट वापरू शकता. ज्यात क्लिंझर, फेशिअल स्क्रब, मसाज क्रिम, टोनिंग जेल, फेस पॅक आणि फेश क्रिमचा समावेश आहे. 

फायदे –

  • संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त
  • दोन ते तीन वेळ वापरण्यासाठी पुरेसं
  • त्वचेला मुळापासून हायड्रेट करते
  • सुंगधित आणि परिणामकारक

तोटे –

ADVERTISEMENT
  • अनहायजेनिक ट्युब पॅकेजिंग
  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग नाही
  • स्क्रबच्या अती वापरामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं

Shahnaz Husain Shalife Plus Facial Kit

शेहनाज हुसेन यांची सौंदर्य उत्पादने महिलांमध्ये अनेक वर्षे प्रसिद्ध आहेत. या फेशिअल किटमध्ये आयुर्वेदिक झाडांच्या अर्काचा वापर करण्यात आलेला आहे. या फेशिअल किटमध्ये फेशिअल करण्यासाठी शालाईफ प्लस स्किन नरिशिंग प्रोग्रॅम, शालाईफ प्लस रिजुव्हिनेटिंग मास्क, शालाईफ प्लस फेस अॅंड बॉडी स्क्रब, त्यासोबतच प्रोफशनल पॉवर स्किन टॉनिक कॉम्लिमेंटरी देण्यात आलं आहे. ज्यामुळे तुमची कोरडी त्वचा त्वरित मऊ आणि मुलायम होऊ शकते. नियमित वापरामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. 

फायदे –

  • त्वचा चांगली हायड्रेट होते
  • चेहऱ्यावर त्वरित ग्लो दिसतो
  • हायजेनिक ट्युब पॅकेजिंग
  • चार वेळा वापरण्यासाठी पुरेसं किट
  • त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते

तोटे –

  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग नाही
  • तीव्र सुंगध आहे
  • संवदेनशील त्वचेसाठी नाही
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नाही

Aroma Magic 7 Step Skin Glow Facial kit

अरोमा मॅजिक स्किन ग्लो फेशिअल किट इतरांपेक्षा थोडं वेगळं आहे. यामुळे तुमची त्वचा डिटॉक्स तर होतेच शिवाय तुम्हाला सलॉन सारखा परिणाम जाणवतो. हे किट वापरण्यासाठी सात स्टेप्स आहेत. ज्यामध्ये मॉईस्च कॉटन, प्रोटिन ब्लीच प्लस एएचए जेल, अरोमा सिरम, ऑक्सिजेनेटिंग जेल. अरोमा मॅजिक फेस पॅक, सनस्क्रिन लोशनचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

फायदे –

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
  • त्वचा मुळापासून डिटॉक्स होते
  • त्वचा खोलवर स्वच्छ होते
  • त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो
  • त्वचेची छिद्रे मोकळी आणि स्वच्छ होतात

तोटे –

  • थोडे महाग आहे
  • यासाठी लागणारे मशिन घरी वापरता येत नाही

Roop Mantra Herbal Facial Kit

रूप मंत्रा हर्बल फेशिअल किटमध्ये कोरफड, काकडी, संत्रे आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क वापरण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेचं खोलवर पोषण होतं. या फेशिअल किटचा वापर करणं अगदी सहज असून त्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा, सौंदर्य आणि चमक मिळू शकते. पाच स्टेप्समध्ये तुम्ही हे फेशिअल किट वापरू शकता. ज्यामध्ये क्लिंझिंग मिल्क, फेस स्क्रब, मसाज जेल, फेस पॅक आणि नरिशिंग क्रिमचा समावेश आहे.

फायदे –

ADVERTISEMENT
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
  • त्वचा मऊ आणि चमकदार होते
  • त्वचेचं योग्य पोषण होते
  • त्वचा उजळ आणि नितळ दिसते

तोटे –

  • विशेष तोटे नाहीत

Vedicline Moroccan Argan Oil Facial Kit

वेदिकलाईन मोरक्कन आर्गन ऑईल फेशिअल किटमध्ये आर्गन ऑईल हा मुख्य घटक आहे. आर्गन ऑईल गे लिक्विड गोल्ड म्हणून ओळखलं जातं कारण ते सोनेरी रंगाचं दिसतं. अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ अशा मोरोक्को इथल्या आर्गन झाडावरील फळांच्या बियांपासून ते तेल काढलं जातं. आर्गन ऑईल युक्त या फेशिअल किटमुळे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईझिंग मिळतं. त्वचेचं एजिंग पासून संरक्षण होतं आणि त्वचा उजळ होते. या किटमध्ये यासाठी क्लिंझर, स्क्रब, क्रिम, जेल, सिरम आणि फेसमास्क देण्यात आले आहेत. यातील प्रत्येक प्रॉडक्टमध्ये ऑर्गन ऑईलचा वापर करण्यात आलेला आहे.


फायदे –

  • पॅराबेन फ्री आहे
  • ट्रॅव्हल फ्री पॅकेजिंग
  • दहा वेळा पुरेल इतकं पुरेसं प्रमाण यात आहे
  • त्वचा खोलवर मॉईस्चराईझ होते
  • चेहऱ्यावर सुंदर ग्लो येतो

तोटे –

ADVERTISEMENT
  • थोडे महाग आहे
  • अल्कोहोलचे घटक वापरण्यात आले आहेत
  • संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त नाही

Vaadi Herbals Deep Moisturising Chocolate Spa Facial Kit

वाडी हर्बल डीप मॉईस्चराईझिंग चॉकलेट स्पा फेशिअल किट कोरड्या त्वचेला कंडिशनिंग करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. शिवाय ते वापरण्यास सोपे असल्यामुळे तुम्ही घरी देखील वापरू शकता. यातील कोकाचे फॅटि असिड तुमच्या त्वचेत खोलवर मुरतात आणि तुमच्या त्वचेला मुलायम करतात. व्हिटॅमिन सी आणि स्टॉबेरीचा अर्क त्वचेला टोन करतो आणि तेलाचा चिकटपणा जाणवू देत नाही. या फेशिअल किटमुळे त्वचेवरील डेड स्किन निघून गेल्यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यात फक्त चार स्टेप मध्ये वापरता येतील असं चॉकलेट स्टॉबेरी क्लिंझिंग क्रिम, चॉकलेट स्टॉबेरी फेस स्क्रब, चॉकलेट स्टॉबेरी मसाज क्रिम आणि चॉकलेट स्टॉबेरी फेस पॅक याचा समावेश आहे.

फायदे –

  • त्वचा हायड्रेट करते
  • त्वचेचा दाह कमी होतो
  • नैसर्गिक ग्लो येतो
  • तीन ते चार वेळ वापरण्यासाठी पुरेसं
  • मनमोहक सुगंध
  • स्वस्त आहे

तोटे –

  • ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकजिंग नाही
  • संवेदनशील त्वचेसाठी नाही

कोरड्या त्वचेसाठी फेशिअल किटबाबत निवडक प्रश्न – FAQS

1. फ्रूट फेशिअलमध्ये कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट कोणते ?

फळांचा वापर करून अनेक फेशिअल किट तयार करण्यात येतात. मात्र कोरड्या त्वचेसाठी तेच फेशिअल किट उपयुक्त ठरतात ज्यामध्ये कोरड्या त्वचेला मुलायम करणारे अर्क असतात. वर दिलेल्या व्हिएलसीसी,शेनाज हुसेन आणि ओरिफ्लेम सारख्या ब्रॅंडचे फेशिअल किट तुम्ही यासाठी नक्कीच वापरू शकता. ज्यामध्ये संत्रे, पपई, स्टॉबेरी, केळ्याचा वापर केलेला असेल.

2. कोरड्या त्वचेसाठी फेशिअल करताना स्टिम घ्यावी का ?

फेशिअल करताना त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्टिम घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र बऱ्याचदा स्टिम घेतल्यामुळे त्वचेतील आवश्यक असणारे नैसर्गिक तेल, सीबम निघून जाते. मुळातच कोरड्या त्वचेला नैसर्गिक तेलाची जास्त गरज असते. यासाठी कोरड्या त्वचेवर फेशिअल करताना स्टिम घेऊ नये अथवा गरज असल्यास कमी प्रमाणात स्टिम घ्यावी.

11 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT