ADVERTISEMENT
home / Recipes
भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)

अशी करा चविष्ट भोगीची भाजी रेसिपी मराठी | Bhogi Bhaji Recipe In Marathi

मकरसंक्रांत हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. हा सण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे या उत्साहाचा गोडवा काही औरच असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेंकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सोबत तिळगूळ देण्याची पद्धत आहे. यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड बोला असंदेखील आवर्जून म्हटलं जातं. या प्रथेमागे सर्वांनी एकत्र येणं आणि तिळगुळाप्रमाणे गोडीनं राहणं हा हेतू आहे. एवढंच नाही तर मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी देवाला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी असा नैवेद्य करून सर्वांनी एकत्र बसून खाणं हे देखील एका खास उद्देशाने केलं जातं.

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds During Sankranti In Marathi)

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी

मकरसंक्रांत हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा  वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण  आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भूक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास  शरीराला चांगला फायदा होतो. पण बऱ्याच जणांना ही भाजी करता येतेच असं नाही. तर खास तुमच्यासाठी ही भोगीच्या भाजीची रेसिपी

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड

ADVERTISEMENT

भोगीच्या भाजीची रेसिपी

भोगीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • साधारण 10 वालाच्या शेंगा
  • अर्धी वाटी सोललेले हरभरे
  • पाव वाटी शेंगदाणे
  • 2-3 चमचे तीळ
  • कोथिंबीर
  • 2 गाजर
  • बटाटा
  • अर्धी वाटी मटारचे दाणे
  • 2 वांगी
  • एक लहान चिरलेला कांदा
  • 2 शेवग्याच्या शेंगा
  • ओले खोबरे
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • हिरव्या मिरच्या
  • आलं – लसूण (पेस्ट आवडत असेल तर पेस्ट घ्या)
  • हिंग
  • हळद
  • तेल
  • कढीपत्ता

कशी करावी भाजी 

  • सर्वात आधी तीळ, आलं – लसूण, हिरव्या मिरच्या, खोबरं, कोथिंबीर, धणे हे सर्व भाजून त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी
  • सर्व भाज्या नीट चिरून घ्याव्या. एका कढईत तेल, त्यात हिंग आणि हळद घालून त्यावर भाज्या वाफवून घ्या
  • दुसऱ्या कढईत तेल घालून त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, हिंग, हळद, लाल मिरची पावडर घालून मिक्स करावे आणि त्यात पेस्ट घालून नीट मिक्स करावे. तुम्हाला हवं तर त्यात थोडा  गरम मसाला टाकावा
  • थोडं पाणी घालून परतावे आणि वरून परतलेल्या भाज्या त्यात घालाव्या आणि मग वाफवावे. शिजत आल्यावर मीठ घालावे. तुम्हाला आवडत असल्यास, त्यात गूळ आणि चिंचेचे आंबट पाणी घालूनही तुम्ही शिजवू शकता. भाजी शिजत आली की, वरून ओलं खोबरं घालावं.
  • गरमागरम भाजी आणि बाजरीची भाकरी लोणचं आणि कच्च्या कांद्यासह अप्रतिम लागते

You Might Like These:

संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार
अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT