काळी द्राक्षं खाण्याचे फायदे (Black Grapes Benefits In Marathi)

Black Grapes Benefits In Marathi

द्राक्षांचे मुख्य दोन प्रकार आढतात. हिरवी आणि काळी द्राक्षं...यापैकी काळी द्राक्ष काळसर, जांभळ्या रंगाची असतात आणि चवीला अतिशय गोड असतात. महाराष्ट्रीतील नाशिकमध्ये द्राक्षांची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. द्राक्ष खाणं आरोग्यासाठी उत्तम असतंच. शिवाय यापासून फ्रूट सलाड, ज्युस, जॅम, आईस्क्रीम, जेली कॅंडी असे विविध प्रकार बनवले जातात. द्राक्षांपासून तयार केलेली वाईन सर्वात जास्त लोकप्रिय आहे. द्राक्षं खाणं आरोग्याप्रमाणेच केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यासाठीच जाणून घेऊ या काळी द्राक्ष खाण्याचे फायदे

Table of Contents

  काळ्या द्राक्षांमधील पोषक तत्त्वे (Black Grapes Nutrition)

  द्राक्षं आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. कारण द्राक्षात अनेक पोषक तत्त्वं भरलेली आहेत.

  एक कप म्हणजेच दिडशे ग्रॅम द्राक्षामध्ये असलेले पोषक घटक - 

  • कॅलरिज - 104 ग्रॅ
  • कार्ब्स - 27.3 ग्रॅम
  • प्रोटिन्स - 1.1 ग्रॅम
  • फॅट्स - 0.2 ग्रॅम
  • फायबर्स - 1.4 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी - 27 टक्के
  • व्हिटॅमिन के - 28 टक्के
  • व्हिटॅमिन बी 6 - 6 टक्के
  • पोटॅशिअम - 8 टक्के
  • कॉपर - 10 टक्के
  • मॅग्नेशिअम - 5 टक्के
  Instagram

  काळी द्राक्षं खाण्याचे फायदे (Health Benefits Of Black Grapes In Marathi)

  काळी द्राक्षं नियमित खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम होतात, यासाठीच जाणून घ्या काळी द्राक्षं खाण्याचे हे अद्भूत फायदे.

  ह्रदयाचे संरक्षण होते

  काही संशोधनात असं आढळलं आहे की काळी द्राक्षं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही असंही ऐकलं असेल की काळ्या द्राक्षापासून तयार केलेली रेड वाईन प्रमाणात घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि ह्रदयविकार होण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे संशोधकांच्या मते काळी द्राक्षे खाणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितावह ठरते. ज्यांना ह्रदयविकार, कोलेस्ट्रॉलचा त्रास अथवा रक्तदाबाची समस्या असेल अशा लोकांनी नियमित काळी द्राक्षे खाणे त्यांच्या नक्कीच फायद्याचे आहे.

  दृष्टी सुधारते

  काळ्या द्राक्षामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दृष्टीदोष कमी करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी आहारात द्राक्षांचा समावेश करण्यास काहीच हरकत नाही. द्राक्ष खाण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांमुळे डोळ्यांच्या रॅटिनाचे  होणारे नुकसान आणि आंधळेपणा रोखता येऊ शकतो. लहान मुलांची नजर चांगली करण्यासाठी त्यांना लहाणपणीच काळी द्राक्षे खाण्याची सवय लावावी. 

  कर्करोगचा धोका कमी होतो

  फ्री रेडिकल्समुळे तुमच्या शरीरातील पेशींचे नुकसान होते ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मात्र काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, बीटा कॅरेटीन सारखे अॅंटि ऑक्सडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे या फ्री रेडिकल्समुळे शरीरातील पेशींचे होणारे नुकसान टाळता येते. सहाजिकच यामुळे कर्करोगासारख्या भयंकर आजाराचा धोका कमी होतो. यासाठीच आहारात काळी द्राक्षे असणं खूप गरजेचं आहे. 

  Instagram

  मेंदूच्या कार्याला गती मिळते

  काळी द्राक्षं तुमच्या आहारात मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतात. कारण नियमित द्राक्षे खाण्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता साधणे सोपे जाते आणि एकूणच तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना सतत मायग्रेनचा त्रास होतो अशा लोकांनी नियमित काळी द्राक्षे खाल्ल्यास त्यांना चांगला आराम मिळू शकतो. अल्झामरचे रूग्ण अथवा स्मृतीभ्रंश झालेल्या रूग्णांना काळी द्राक्षे खाण्यास देणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. 

  मधुमेहाची समस्या टाळता येते

  मधुमेह हा आजकाल एक जीवनशैली विकार झाला आहे. ज्यामुळे देशभरात मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काळी द्राक्ष खाण्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवणं शक्य आहे. कारण त्यामुळे तुमची इन्सुलीनची पातळी नियंत्रित राहते. द्राक्षातील पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात. ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहतो. मात्र चांगल्या परिणामांसाठी मधुमेहींनी कमी प्रमाणात काळी द्राक्षे खावी.

  प्रतिकारशक्ती वाढते

  कोरोनामुळे सध्या प्रत्येकाला प्रतिकार शक्तीचं महत्त्वं पटू लागलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण सध्या आहारातून प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत आहे. काळ्या द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी, के आणि ए मोठ्या प्रमाणावर असतं. शिवाय त्यामध्ये फ्लेवॉनॉईड, मिनरल्सही भरपूर असतात. या सर्वांमुळे काळी द्राक्ष खाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. आजारापणातून दूर राहण्यासाठी काळी द्राक्षे खाणे हा एक चांगला उपाय आहे. 

  हाडांची झीज भरून निघते

  काळ्या द्राक्षामधून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन के मिळू शकतं. व्हिटॅमिन के तुमच्या शरीरातील हाडांच्या मजबूती आणि सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं असतं. काही संशोधनानुसार ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन केची कमतरता असते. त्यांना सतत हाडांच्या फ्रॅक्चरला सामोरं जावं लागतं. द्राक्षामध्ये यासोबतच कॉपरचंही प्रमाण पुरेसं असतं. ज्यामुळे तुमच्या हाडांची झीज लवकर भरून निघते. चाळीशीनंतर महिलांच्या आहारात काळी द्राक्षे असणं अतिशय गरजेचं आहे कारण या वयात महिलांच्या शरीरातील हाडांची मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. 

  Instagram

  वजन कमी करणे सोपे जाते

  ज्यांचे वजन अती प्रमाणात वाढत आहे किंवा लठ्ठपणामुळे जे लोक त्रस्त झाले आहेत त्यांच्यासाठी द्राक्षे वरदान ठरू शकतात. कारण वजन कमी  करण्यासाठी द्राक्ष खाणं हा एक सोपा मार्ग आहे. द्राक्षामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे द्राक्ष खाण्यामुळे तुमचे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते. ज्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी होते आणि तुमचे वजन सहज कमी होते. यासाठी हेल्थ एक्पर्ट वजन कमी करण्यासाठी आहारात काळी द्राक्षे खाण्याचा सल्ला देतात. काळी द्राक्षे सुकवून त्यापासून काळ्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या द्राक्षाप्रमाणेच काळे मनुकेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 

  बद्धकोष्ठतेवर परिणामकारक उपाय होतो

  अपचन, पोटफुगी, बद्धकोष्ठता हे पचनसंस्था कमजोर असण्याची लक्षणे आहेत. अनेक उपाय करूनही तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळाल नसेल तर काळी द्राक्षे तुमच्या नक्कीच फायद्याची आहेत. काळी द्राक्षे खाण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. कारण काळ्या द्राक्षामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. काळी द्राक्षे खाण्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्तता मिळते. 

  शरीराचा दाह नियंत्रणात येतो

  काळी द्राक्षे ही अॅंटि इनफ्लैमटरी आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराचा दाह नक्कीच कमी होऊ शकतो. एखादे इनफेक्शन मग ते शरीराच्या आतले असो वा बाहेरचे त्यामुळे होणारा दाह आणि जळजळ काळ्या द्राक्षामुळे कमी होऊ शकतो. यासाठी नियमित सकाळी एक वाटीभर काळी द्राक्षे खा, काळ्या द्राक्षांचा ज्युस प्य अथवा फ्रूट सलाडमध्ये काळी द्राक्षे वापरा. काळ्या द्राक्षांमुळे जीवजंतूंना नष्ट करणे सोपे जाते. नैसर्गिक अॅंटि बॅक्टेरिअल असलेल्या काळ्या द्राक्षांमुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो आणि शरीराचा दाह कमी होतो.

  काळ्या द्राक्षांचे सौंदर्यावर होणारे फायदे (Black Grapes Beauty Benefits)

  काळी द्राक्षे जशी आरोग्यासाठी लाभदायक असतात तशीच ती तुमच्या केस आणि त्वचेसाठी उत्तम असतात. जाणून घ्या काळी द्राक्षे खाण्याचे सौंदर्यावर होणारे हे फायदे.

  एजिंगची समस्या कमी होते

  काळ्या द्राक्षांचा तुमच्या त्वचेवर अफलातून परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात. द्राक्षामधील अॅंटि ऑक्सिडंट तुमच्या त्वचेला नेहमी टवटवीत आणि तरूण ठेवतात. त्वचेवरील सुरकुत्या, फाईन लाईन्स, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी नियमित काळी द्राक्षे खाणं फायद्याचं ठकतं. कारण काळ्या द्राक्षामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे तुमची त्वचा लवचिक राहण्यास मदत होते. काळ्या द्राक्षात व्हिटॅमिन ई भरपूर असल्यामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. 

  Instagram

  पिंपल्स कमी होतात

  काळी द्राक्षं ही त्वचेसाठी उत्तम आहेतच पण यामुळे तुमची पिंपल्सची समस्याही कमी होते. यातील अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमची त्वचा सतत डिटॉक्स होत असते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्वचा मुळापासून स्वच्छ झाल्यामुळे हळू हळू तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचा डिटॉक्स होण्याचा सर्वात जास्त मोठा फायदा हा होतो की तुमच्या त्वचेवरील पिंपल्स कमी होतात. मात्र यासाठी काळी द्राक्षं खाणं अथवा काळ्या द्राक्षाचा ज्युस पिणं गरजेचं आहे. 

  त्वचेचे संरक्षण होते

  त्वचेच्या सुरक्षेसाठी आणि त्वचेतील पेशींच्या पुर्नजीवनासाठी काळ्या द्राक्षामधील व्हिटॅमिन सी वरदान ठरू शकतं. कारण काळ्या द्राक्षामधील व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक सनस्क्रीन बनून सुर्यप्रकाशापासून संरक्षण करतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही आणि त्वचा चिरतरूण राहते. त्वचा सुंदर आणि तजेलदार राहण्यासाठी नियमित एक कप काळी द्राक्षे खाणं आवश्यक आहे. काळ्या द्राक्षांप्रमाणेच या व्हिटॅमिन सी युक्त फळांच्या ज्युसमुळे तुमची त्वचा होईल चमकदार.

  केस लांब आणि मजबूत होतात

  त्वचेप्रमाणेच काळी द्राक्षं तुमच्या केसांसाठीदेखील उपयुक्त ठरतात. द्राक्षामधील अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी केसांना मजबूत आणि घनदाट करतात. द्राक्ष खाण्यामुळे तुमच्या केसांच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळं मजबूत होतात. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर होतो आणि तुमचे  केस लांब आणि  मजबूत होतात. याशिवाय यामुळे तुमच्या केसांच्या इतर अनेक समस्या कमी होतात. जसं की केसांचा कोरडेपणा कमी झाल्यामुळे केसांमधील  कोंडा कमी होतो. केसांना पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात. 

  Instagram

  काळी द्राक्षं खाण्याबाबत प्रश्न - FAQs

  1. काळी द्राक्षं खाण्याचे दुष्परिणाम आहेत का ?

  कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच त्याचे फायदे शरीराला मिळतात. अगदी त्याचप्रमाणे काळी द्राक्षेदेखील प्रमाणातच खावी. अती प्रमाणात काळी द्राक्षे खाल्ल्यास त्यामुळे तुम्हाला पोटदुखी, जुलाब, डोकेदुखी, अपचन, गॅस, मळमळ, ओटीपोटात दुखणे, रक्ताच्या गुठळ्या होणे अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

  2. कोणत्या रंगाची द्राक्षे जास्त फायदेशीर असतात ?

  हिरवी आणि काळी दोन्ही प्रकारची द्राक्षे आरोग्यासाठी उत्तम असतात. मात्र काही संशोधनानुसार काळी द्राक्षे हिरव्या द्राक्षांपेक्षा जास्त लाभदायक असतात.

  3. दिवसभरात किती द्राक्षे खावी ?

  आधीच सांगितल्याप्रमाणे हिरवी अथवा काळी कोणतीही द्राक्षे अती प्रमाणात खाऊ नयेत. कारण अती प्रमाणात द्राक्षे खाणं आरोग्यासाठी हितकारक नाही. यासाठी दिवसभरात प्रत्येकाने एक ते दोन कप द्राक्षे खावी.