डेनिमचे जॅकेट आवडतात, मग हिवाळ्यात ट्राय करा हे प्रकार

डेनिमचे जॅकेट आवडतात, मग हिवाळ्यात ट्राय करा हे प्रकार

डेनिमची फॅशन कधीच आऊट ऑफ ट्रेंड नसते. कारण डेनिम पूर्वीही होतं भविष्यातही असेल आणि आजही आहेच. फॅशन ट्रेंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर बॉलीवूड सेलिब्रेटीजमध्ये डेनिम जॅकेटची क्रेझ कायम दिसून येते. मग एखादा रेड कार्पेट लुक असो अथवा नॉर्मल प्रवास करताना एअर पोर्टवरील लुक... एखादं डेनिम जॅकेट सेलिब्रेटीज नेहमीच कॅरी करतात.  विशेष म्हणजे हिवाळा असो वा उन्हाळा तुम्ही डेनिमचे कपडे घालू शकता. डेनिमचे जॅकेट मात्र हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर फॅशनमध्ये असतात. एखादं टीशर्ट, शॉर्ट पॅंट, स्कर्ट, वनपीस असं कशावरही डेनिम जॅकेट कॅरी करता येतं. दीपिका पादुकोन, अनुष्का शर्मा, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा अशा बॉलीवूड अभिनेत्री नेहमी डेनिम जॅकेट कॅरी करताना दिसतात. या बॉलीवूड सेलिब्रेटीजप्रमाणे स्टायलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी या फॅशन टिप्स तुमच्यासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील. 

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा बऱ्याचदा डेनिम जॅकेट कॅरी करते. ज्यामुळे तिचा लुक भन्नाट आणि स्टायलिश दिसतो. आम्ही तुमच्यासोबत अनुष्काने कॅरी केलेले काही डेनिम जॅकेटचे लुक शेअर करत आहोत. यातील एका फोटोमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाच्या जीन्ससोबत काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि ओव्हरसाईज जॅकेट घातलं आहे. एखाद्या वेकेशनवर असताना असा रफ अॅंट टफ लुक अप्रतिम दिसू शकतो. जॅकेटप्रमाणेच तुम्ही डेनिमचं जंप सूट आणि त्यावर डेनिम जॅकेट असाही  लुक करू शकता. 

करिना कपूर

करिना तिच्या फॅशनेबल कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. गरोदरपणातही तिचे लुक व्हायरल होत आहेत. त्याआधी तिने डेनिम जॅकेटमध्ये काही लुक केले होते. जे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेले आहेत. त्यापैकी काही लुक आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ज्यातील एका फोटोत तिनने क्लासिक जीन्स आणि डेनिमचं जॅकेट घातलं आहे.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा तिच्या रफ अॅंट टफ लुकसाठी जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्हालाही असा टॉम बॉय लुक करायचा असेल तर सोनाक्षीप्रमाणे फॅशन कॅरी करा.  तिने यातील एका फोटोमध्ये डेनिमचा जंपसूट आणि त्याला साजेसं असं डेनिमचं जॅकेट घातलं आहे. अशा फंकी लुकसोबत कमी ज्वैलरी आणि हाफ पोनीटेल जास्त खुलून दिसतो.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणने फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अफलातून फॅशनने ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. ट्रॅव्हल करताना तिचा साधा एअरपोर्ट लुकही नेहमीच स्टायलिश असतो. यासाठीच तिचे हे काही खास डेनिम लुक नक्की फॉलो करा. 

आलिया भट

आलिया भट सध्या ही तरूणाईचं नेतृत्व करणारी एक युवा अभिनेत्री आहे. ज्यामुळे प्रत्येक तरूणीला आपण आलियासारखं दिसावं असं वाटत असतं. जर तुमची शरीर प्रकृतीदेखील आलिया सारखी असेल तर अशा डेनिम जॅकेटमध्ये तुम्ही फार बारीक दिसणार नाही. शिवाय स्टायलिश  आणि हटके दिसण्यासाठी हे  जॅकेट्स् लुक नक्कीच तुमची मदत करतील.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले सेलिब्रेटीज हे डेनिम जॅकेट लुक तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा. 

Skin Care

MyGlamm GLOW Iridescent Brightening Essence

INR 1,195 AT MyGlamm