डबल चिन असेल तर वापरा अशा सोप्या मेकअप ट्रिक्स

डबल चिन असेल तर वापरा अशा सोप्या मेकअप ट्रिक्स

बऱ्याचदा आपला ड्रेसचा लुक अगदी परफेक्ट असतो. पण चेहऱ्यावरील डबल चिन अथवा चेहऱ्यावरील चरबी आपला लुक खराब करतो. वजन वाढण्यासह आपली हनुवटीदेखील खराब दिसू लागते. कारण त्यावर अधिकाधिक चरबी येते. यामुळे चेहरा अधिक जाडसर दिसू लागतो. पण तुम्हाला जर ही डबल चिन लपवायची असेल तर तुम्हाला काही फॅशन टिप्स सांगत आहोत. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हा मेकअप करून डबल चिन नक्कीच लपवू शकतो. अनेक सेलिब्रिटीही आपला चेहरा अधिक शार्प आणि बारीक दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. मेकअपचा आधार घेऊन तुम्ही आपली डबल चिन नक्कीच लपवू शकता. पण त्यासाठी नक्की काय काय करावं लागेल त्याची माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत.

डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम नाही तर वापरा या ट्रिक्स

डबल चिन लपविण्यासाठी मेकअप ट्रिक्स (Easy Makeup Tricks to Hide Double Chin)

Freepik.com

तुम्ही जर डबल चिन लपवू इच्छित असाल तर तुम्हाला काही सोप्या फॅशन आणि मेकअप टिप्सची नक्कीच गरज आहे. डबल चिन असेल तर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात फोटो काढताना अथवा इतरांना भेटताना फेशियल फिचर चांगले दिसत नाहीत असं वाटतं. पण मग अशावेळी ही डबल चिन कशी लपवायची याच्याही काही सोप्या ट्रिक्स आहेत. याच ट्रिक्स जाणून घेऊयात- 

  • चेहरा आणि मानेवर कधीही सारख्या शेड्सचा कॉम्पॅक्ट तुम्ही लाऊ नका. मानेवर लावण्यात येणारी पावडर ही नेहमी चेहऱ्याला लावण्यात येणाऱ्या पावडरच्या एक टोन गडद असायला हवी. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे चेहरा आणि मानेवरील पावडर वापरताना दोन्ही वेगवेगळ्या शेड्स वापरा 
  • डोळ्यांना हायलाईट करा. त्यावर काजळ, मस्कारा आणि आयशॅडो लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांकडे पाहणाऱ्याचे आपोआप लक्ष जाते. तुमच्या हनुवटीकडे लक्ष जात नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात जाताना तुम्ही तुमचे डोळे मेकअपने व्यवस्थित हायलाईट करा. ज्याप्रमाणे  तुम्ही ड्रेस घातला असेल त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या डोळ्यांचा मेकअप करणे आवश्यक आहे,  हेदेखील लक्षात घ्या. अतिगडद मेकअप करू नका
  • हलक्या रंगाच्या शेडची लिपस्टिक तुम्ही जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचा खालचा भाग हायलाईट होऊ नये. चेहऱ्याच्या जॉलाईनवर जास्त लक्ष द्या. जेव्हा मेकअप कराल तेव्हा तुमच्या हनुवटीवरून कसे हायलाईट कराल यावर लक्ष ठेवा. कारण असे केल्याने जास्त लक्ष जाणार नाही.  
  • आपली हेअरस्टाईल अशी ठेवा ज्यामुळे तुमचे केस हनुवटीच्या  जास्त वर दिसणार नाहीत आणि जास्त लांबडसडकही दिसणार नाहीत. डबल चिन लपविण्यासाठी फॅदर कट अथवा पुन्हा लेअर्ड हेअर एकदम परफेक्ट आहेत
    डबल चिन असणाऱ्यांनी चोकर हार अजिबात घालू नये. यामुळे चेहरा अधिक जाडसर आणि भरभक्कम दिसून  येतो. तसंच चोकर अगदी गळ्याभोवती गुंफला गेल्याने तुमची हनुवटी अधिक जाड दिसते आणि चरबी दिसून येते. हनुवाटीचा मांसल भाग बाहेर येतो आणि मानही बसकी दिसते
  • नेहमी अशा कपड्यांचा वापर करा ज्यांचा रंग गडद नसेल अथवा बंद गळ्याचे कपडे घालणं शक्यतो टाळा. बंद गळ्याच्या कपड्यातही तुमची डबल चिन पटकन दिसून येते. त्यामुळे तुमचे कपडे हे खोलगट गळ्याचे असतील तर खूपच छान दिसतात
  • आपल्या शरीराचे पोश्चर नेहमी सरळ ठेवा. मान नेहमी खालच्या बाजूने वाकवून ठेवल्यास ज्यामुळे चेहऱ्याचा सर्व चरबीयुक्त भाग एकत्र येतो.  त्यामुळे तुमची मान अधिक जाडसर दिसते आणि हनुवटी जाडसर दिसून  तुमचा चेहरा अधिक थोराड दिसून येतो. त्यामुळे मान नेहमी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा

डबलचीनचा त्रास? सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका

डबल चिन लपविण्यासाठी असे करा कॉट्यूरिंग (Contouring)

आपल्या चेहऱ्याचे फिचर्स शार्प दाखविण्यासाठी मोठे मोठे सेलेब्रिटीही कॉट्यूरिंगची मदत घेतात. त्यासाठी आपली जॉलाईन उभारण्यासाठी आणि हनुवटी बारीक दाखविण्याचा प्रयत्न करा. त्यापूर्वी आपण गाल आतल्या बाजूला ओढा आणि ब्रॉन्झर टेम्पलपासून सुरू करून चिकबोन्सपर्यंत आणा. त्यानंतर ते जॉलाईन खालपर्यंत घेऊन जा.  असं चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना करा. हे  केवळ तुमच्या डबल चिनला लपविणार नाही तर तुमची जॉलाईन अप्रतिम दर्शवेल आणि तुमचा चेहरा अधिक शार्प आणि सुंदर दिसेल. 

डबल चिन लपविण्यासाठी  तुम्ही MYGLAMM चे अप्रतिम उत्पादन वापरा. 

डबल चिन (हनुवटी)पासून सुटका हवी असल्यास, करा सोपा मसाज

Beauty

Manish Malhotra Face And Body Highlighter

INR 1,250 AT MyGlamm

Beauty

CLEAN BEAUTY ARGAN OIL BB FOUNDATION STICK

INR 950 AT MyGlamm

Beauty

POSE HD Bronzer Duo - Cinnamon | Teracotta

INR 699 AT MyGlamm

Beauty

Powder Brush

INR 1,295 AT MyGlamm

MyGlamm: 3 in 1 Face Highlighter - Blush, Bronzer, Highlighter (Contouring Palette) - Chisel It - Show Stopper

INR 1,250 AT MyGlamm

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक