सेक्स ही अशी भावना ज्याच्यातून बाहेर पडावेसे अजिबात वाटत नाही. पण सेक्स झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवायला लागतात. हे बदल काही अंशी चांगले असले तरीदेखील काही बदलांकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही. सेक्स केल्यानंतर केवळ प्रेग्नंसीमुळेच नाही. तर अन्य कारणांमुळेही पिरेड्सच्या तारखा मागे- पुढे होतात. सुरक्षित शारिरीक संबंध केल्यानंतर तुम्हाला तुमच्या या पिरेड्सच्या तारखांमध्ये कधी बदल जाणवला आहे का? जर सेक्सनंतर तुमच्या पिरेड्सच्या तारखांमध्ये आणि फ्लोमध्ये फरक झालेला जाणवत असेल तर हा परिणाम नेमका कशामुळे होतो ते जाणून घेऊया.
तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?
पिरेड्सच्या तारखा बदलतात
सेफ सेक्स केल्यानंतरही शरीरात काही काळासाठी ती भावना तशीच असते. जर तुम्ही पहिल्यांदा सेक्स केलं असेल तर पाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, पाठदुखी असे त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचसोबत पिरेड्सच्या तारखा बदलण्याच्या तक्रारीही अनेकांच्या असतात. सेक्स केल्यानंतर काही जणांना त्यांच्या पिरेड्सच्या तारखा पुढे गेलेल्या जाणवल्या आहेत तर काहींना पिरेड्स हे आधी देखील आले आहे. पण या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण आहेत. पिरेड्सच्या तारखा या इतरवेळीही शारीरिक बदलामुळे बदलत असतात. त्याच्यात नवीन असे काही नाही. सेक्सनंतर पिरेड्समध्ये फरक होत असेल तर तो कदाचित ताण तणावामुळे होण्याची शक्यता अधिक असते.
म्हणजे तुमचे पिरेड्स आलेत जवळ, जाणून घ्या पिरेड्सची लक्षणं
फ्लोमध्ये जाणवतो का फरक
सेक्सनंतर ज्यावेळी पिरेड्स येते. त्वावेळी पिरेड्सच्या फ्लोमध्ये अनेकांना बदल जाणवतो. काहींना त्यांच्या फ्लो हा सुरळीत वाटतो. तर काहींना हा फ्लो फार कमी आणि गुढळ्यांप्रमाणे होते असे जाणवते. आता ही गोष्टही सर्वस्वी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे फ्लोवर तसा परिणाम होत नाही. जर तुम्हाला पिरेड्समध्ये असा त्रास कायम जाणवत असेल तर कदाचित यंदाच्या मानसिक ताणामुळे तुमच्या फ्लोवर परिणाम होतो. त्यामुळे हा परिणामही तुम्हाला जाणवतोच असे नाही. पण असे जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
पोटदुखी
shutterstock
तुम्ही जर पहिल्यांदा सेक्स केले असेल तर काही कारणास्तव तुम्हाला अंगदुखी जाणवणे स्वाभाविक आहे. बरेचदा सेक्स हे अनेक प्रश्नांमध्ये आणि तणावांखाली केले जाते. बरेचदा ते व्यवस्थित होत नाही. जर तुम्ही सेक्स तुमच्या पिरेड्सच्या जवळ असलेल्या तारखांदरम्यान केले असेल तर तुम्हाला पोटदुखी होणे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय शारीरिक ताण, पिरेड्स येण्याच्या लक्षणांपैकी एक असलेल्या पोटदुखीमुळे स्वाभाविकपणे पोटदुखी जाणवत राहते. त्यामुळे होणारी पोटदुखी ही देखील फार काही विपरित परिणाम करते असे मुळीच होत नाही.
पिरेड्स चुुकवण्यासाठी गोळ्या घेताय, मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात
भुकेवर परिणाम
अनेकांना सेक्स केल्यानंतर भूक जास्त लागू लागते किंवा भूक कमी देखील होते. काहींना पिरेड्सदरम्यान खूप भूक लागते. सतत काहीतरी खावंसं वाटतं किंवा एखाद्या ठराविक पदार्थांचा वास आला तर नकोसे होते. हे असे होणे अगदी स्वाभाविक आहे. हा परिणाम तुम्हाला जाणवत असेल तर फार काही काळजी करु नका. कारण तुम्हाला तसे काही विशेष झालेले नाही.
पिरेड्सच्या तारखा वगळता जर तुम्हाला पिरेड्स आले नसतील आणि तुम्हाला प्रेग्नंट व्हायचे नसेल तर मात्र तुम्ही योग्य वेळी टेस्ट करायला विसरु नका.वरील बदलांपैकी तुम्हाला आणखी काही बदल होत असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.