डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार (Dosa Recipes In Marathi)

dosa recipes in marathi

भारतात साऊथ इंडिअन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच लोकप्रिय आहे. तव्यावर खरपूस भाजलेल्या कुरकुरीत डोसाच्या एक तुकडा मस्त चटणी अथवा सांबरमध्ये बूडवून खाणं हे स्वर्गसुखापेक्षा नक्कीच कमी नाही. म्हणूनच भारतातच नाही तर जगभरात डोसा रेसिपी मराठी हा प्रकार अप्रतिम खाद्यपदार्थांच्या यादीत टॉप लिस्टमध्ये आहे. एवढंच नाही तर डोसाचे निरनिराळे प्रकार लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या बॅटरपासून तुम्ही डोसाचे विविध प्रकार तयार करू शकता. त्याचप्रमाणे डोसा तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या आणि सांबरसोबत खाऊ शकता. थोडे फार बदल केले तर तुम्ही एकाच डिशमध्ये तुमच्या आवडीनुसार नाविण्य आणि स्वाद आणू शकता. यासाठीच आज आम्ही तुमच्यासोबत डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार शेअर करत आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी झटपट डोसा रेसिपी मराठी तयार करू शकता.

Table of Contents

  प्लेन डोसा रेसिपी (Plain Dosa Recipe In Marathi)

  डोसाचे बॅटर एकदा तयार केले की त्यापासून तुम्ही निरनिराळे डोसे तयार करू शकता. यासाठी बॅटर तयार करताना विशेष काळजी घ्या.

  साहित्य:

  • दोन वाटी जाडे तांदूळ
  • एक वाटी उकडे तांदूळ
  • अर्धी वाटी उडीद डाळ
  • चिमूटभर मेथीचे दाणे
  • चवीनुसार मीठ

  डोसाचे बॅटर कसे बनवाल:

  • डाळ, मेथीचे दाणे आणि तांदूळ स्वच्छ धुवून अथवा आठ ते दहा तास पाण्यात भिजत ठेवा.
  • आठ ते दहा तासांनी पाणी उपसून डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्या
  • चवीनुसार मीठ टाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा
  • डोसाचं पीठ रात्रभर अशा प्रकारे ठेवल्यास चांगलं फुगून वर येतं
  • थंडीच्या दिवसांमध्ये ते थोडं जास्त वेळ ठेवावं लागतं

  प्लेन डोसा करण्याची कृती:

  • डोसा तवा गॅसवर गरम करत ठेवा
  • डोसा बॅटर चांगलं ढवळून घ्या
  • तवा तापला की त्याला थोडं तेल लावून ते टिश्यू पेपरने पुसून घ्यावं. टिश्यूपेपर ऐवजी कच्चा कांदा अथवा नारळाची किशीचा वापर करू शकता. 
  • जर तवा नॉनस्टिक असेल तर तेल लावण्याची गरज नाही
  • तवा तापला आहे का हे पाहण्यासाठी तव्यावर थोडं पाणी शिंपडावं
  • पाण्याची वाफ झाली की एक डावभर पीठ तव्याच्या मध्यभागी ओताव आणि डावेच्या उलट्या बाजूने ते तव्याभर गोलाकार पसरावं.
  • बाजूने तेल सोडा आणि कुरकुरीत झालेला डोसा सर्व्ह करा.
  • चटणी आणि सांबारसोबत हा डोसा मस्त लागतो.
  Instagram

  पेपर डोसा रेसिपी (Paper Dosa Recipe In Marathi)

  पेपरडोसा साहित्य:

  डोसाचे बॅटर प्लेन डोसाप्रमाणेच तयार करावे 

  पेपर डोसा तयार करण्याची कृती:

  • डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा गरम करावा 
  • पाणी शिंपडून तवा गरम झाल्याचा अंदाज घ्यावा
  • तव्याच्या मध्यभागी डोसाचे बॅटर ओतावे
  • डावेच्या उलट्या बाजून ते गोलाकार पसरावे
  • पेपर डोसा करण्यासाठी बॅटर पातळ पसरेल याची काळजी घ्यावी
  • प्लेन डोसापेक्षा थोडा जास्त पातळ करावा ज्यामुळे तो जास्त कुरकुरीत आणि पेपरप्रमाणे पातळ दिसेल

  वाचा - आमटी डाळ (Dal Amti Recipe In Marathi)

  Instagram

  मसाला डोसा रेसिपी (Masala Dosa Recipe In Marathi)

  बॅटरचे साहित्य:

  • या डोसा रेसिपी मराठीसाठी प्लेन डोसाप्रमाणेच बॅटर तयार करून घ्यावे.

  मसाल्याचे साहित्य:

  • चार ते पाच बटाटे उकडून चिरलेले
  • एक कांदा चिरलेला
  • तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  • तेल
  • लसूण आणि आल्याची पेस्ट
  • मोहरी
  • हळद
  • हिंग
  • कढीपत्ता
  • उडीद डाळ
  • चवीनुसार मीठ

  मसाला तयार करण्याची कृती:

  • कढईत तेल टाकून तापल्यावर मोहरी, हिंग,हळद, कढीपत्ता, उडीद डाळ, हिरवी मिरची, लसूण-आल्याची पेस्टची फोडणी करावी
  •  कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
  • खंमग वास सुटल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्या 
  • मीठ टाकून एकजीव करावे
  • चवीसाठी थोडी कोथिंबीर पेरावी आणि भाजी तयार करून ठेवावी

  मसाला डोसा तयार करण्याची कृती:

  • गॅसवर तवा गरम करावा
  • पाणी शिंपडून अंदाज घ्यावा
  • तव्याच्या मध्यभागी डोसा बॅटर ओतावे
  • कडेने तेल सोडून डोसा खरपूस करावा
  • वरून थोडे बटर डोसाला लावावे
  • मसाला त्यावर लावून पसरून घ्यावे
  • दोन्ही बाजूने डोसा दुमडावा आणि सर्व्ह करावा
  Instagram

  मैसूर मसाला डोसा रेसिपी (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)

  डोसा बॅटर प्लेन डोसा प्रमाणेच करावे आणि मसाला डोसाप्रमाणे मसाला करून घ्यावा. 

  लाल चटणी बनवण्याची साहित्य:

  • पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या
  • एक इंच आले
  • दोन लाल मिरच्या
  • एक चमचा तळलेली चणाडाळ
  • चवीनुसार मीठ

  चटणी बनवण्याची कृती:

  • सर्व साहित्य एकत्र वाटून घ्या आणि जाडसर चटणी तयार करा
  • मैसूर मसाला डोसा तयार करण्याची कृती
  • तवा गॅसवर गरम करा
  • पाणी शिंपडून गरम झाल्याचा अंदाज घ्या
  • तव्याच्या मध्यबागी बॅटर टाका
  • डावेच्या उलट बाजून ते गोलाकार पसरून डोसा तयार करा
  • डोसाच्या कडेला तेल लावून तो खरपूस करून घ्या
  • वरच्या बाजूने बटर लावा
  • त्यावर लाल चटणी पसरवा
  • मसाला लावून गरमागरम डोसा सर्व्ह करा
  Instagram

  सेट डोसा रेसिपी (Set Dosa Recipe In Marathi)

  या डोसा रेसिपी मराठीसाठी प्लेन डोसा बनव्याचे बॅटर घ्या

  सेट डोसा बनवण्याची कृती:

  • डोसा बनवण्यासाठी तवा गरम करा
  • पाणी शिंपडून तवा गरम झाल्याचा अंदाज घ्या
  • डावेने तव्याच्या मध्यभागी बॅटर सोडा
  • मात्र बॅटर तवाभर न पसरवता पॅनकेक प्रमाणे थोडंसंच पसरवून घ्या
  • सेट डोसा थोडा जाडा असतो
  • त्यावर वरच्या  दिशेने चिरलेला कांदा, कोथिंबीर टाका
  • कडेने तेल लावून खालची बाजू खरपूस भाजून घ्या
  • एक बाजू शेकली की पतेल्याने तो डोसा उलटा करा ज्यामुळे वरची भाजू शेकली जाईल
  • दोन्ही बाजूने खरपूस झालेला आणि स्पॉंजी डोसा गरमगरम सर्व्ह करा
  Instagram

  मूग डाळ डोसा रेसिपी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)

  मूगडाळीचा डोसा बनवण्याची रेसिपीसाठी बॅटरमध्ये थोडा बदल करावा लागेल.

  डोसाचे बॅटर बनवण्यासाठी साहित्य:

  • दोन वाट्या जाडे तांदूळ
  • अर्धी वाटी मूगडाळ
  • चवीपुरते मीठ

  बॅटर तयार करण्याची कृती:

  • तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावी
  • सकाळी दोन्ही साहित्य दळून घ्यावे
  • चवीनुसार त्यात मीठ आणि  गरजेनुसार पाणी टाकून बॅटर तयार करावे

  डोसा बनवण्याची कृती:

  • बॅटरमध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जीरे, हळद  टाकावी
  • तवा गरम करून पाणी शिंपडून तवा जास्त गरम नाही याचा अंदाज घ्यावा
  • तव्यावर डोसा गोलाकार पसरवावा आणि तेल लावून खरपूस भाजून घ्यावा
  Instagram

  चीझ डोसा रेसिपी (Cheese Dosa Recipe In Marathi)

  डोसा बनवण्याची रेसिपी म्हणजे बॅटर प्लेन डोसा बॅटर प्रमाणेच तयार करून घ्यावे.

  चीझ डोसासाठी लागणारे साहित्य:

  • डोसा बॅटर
  • चवीपुरते मीठ
  • मोजेरोला चीझ
  • बटर
  • टोमॅटो सॉस
  • चाट मसाला

  चीझ डोसा बनवण्याची कृती:

  • तवा गरम करून त्यावर डोसा बॅटर पसरावे
  • डोसा खरपूस भाजण्यासाठी कडेने तेल सोडावे
  • वरून बटर लावावे
  • बटरवर थोडा टोमॅटो सॉस पसरावा
  • त्यावर थोडं मीठ आणि चाट मसाला शिंपडावा
  • आणि वरून मोजेरोला अथवा साधं चीज किसून पसरावे
  • डोसा तयार झाला की दोन्ही बाजूने दुमडून सर्व्ह करावा
  Instagram

  शेजवान डोसा रेसिपी (Schezwan Dosa Recipe In Marathi)

  डोसा बनवण्याचे बॅटर प्लेन डोसाप्रमाणे या डोसा बनवण्याची रेसिपी आहे. 

  इतर साहित्य:

  • पातळ चिरलेल्या कांद्याची पात
  • चिरलेली कोथिंबीर
  • पातळ चिरलेला कांदा
  • पातळ चिरलेली सिमला मिरची
  • पातळ चिकलेला गाजर
  • चिरलेला टोमॅटो
  • बटर
  • शेजवॉन सॉस
  • चवीनुसार मीठ

  सेजवॉन डोसा बनवण्याची कृती:

  • तवा गरम करा आणि पाणी शिंपडून जास्त गरम नाही  याचा अंदाज घ्या
  • तव्यावर डोसा बॅटर पसरवा आणि गोलाकार डोसा तयार करा
  • कडेने तेल सोडून डोसा खरपूस होऊ द्या
  • वरच्या बाजून बटर लावा
  • शेजवॉन सॉस संपूर्ण डोसावर पसरवा
  • सर्व भाज्या आणि कोशिंबीरीचा एक पातळ थर त्यावर पसरवा
  • पलेत्याने भाज्या सॉस आणि बटरमध्ये मिक्स करा अथवा दाबा ज्यामुळे ते एकजीव होतील
  • दोन्ही बाजूने डोसा दुमडा आणि सर्व्ह करा
  Instagram

  रवा डोसा रेसिपी (Rava Dosa Recipe In Marathi)

  रवा डोसा आणि इतर डोसा यामध्ये थोडा फरक असल्यामुळे याचे बॅटर तयार करावे लागेल.

  रवा डोसासाठी साहित्य:

  • एक वाटी रवा
  • एक वाटी तांदळाचे पीठ
  • दही
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • जिरे पावडर
  • चिरलेला कांदा
  • काजूचे तुकडे
  • चवीपुरते मीठ

  रवा डोसा तयार करण्याची कृती:

  • तीन चमचे दही घ्या आणि पाणी टाकून पातळ ताक बनवा
  • त्यामध्ये काजूचे तुकडे वगळून सर्व साहित्य मिक्स करा
  • दहा ते पंधरा मिनिटे बॅटर तसेच ठेवा
  • तवा गरम करा आणि त्यावर डोसा पसरवा
  • डोसा परसवल्यावर त्यावर काजूचे तुकडे टाका
  • डोसा कुरकुरीत करण्यासाठी कडेला तेल सोडा
  • डोसा तयार झाल्यावर गरमगरम सर्व्ह करा
  Instagram

  अडई डोसा रेसिपी (Adai Dosa Recipe In Marathi)

  अडई डोसा हा साऊथचा एक स्पेशल डोसा असल्यामुळे हा डोसा बनवण्याची रेसिपीसाठी लागणारे साहित्य इतर डोसापेक्षा वेगळे आहे.

  अडई डोसाचे साहित्य:

  • अर्धा कप जाडे तांदूळ
  • अर्धा कप मिक्स डाळी ( चणा डाळ,उडीद डाळ,मूगडाळ)
  • चवीपुरतं मीठ
  • जीरा पावडर
  • कढी पत्ता
  • किसलेलं आलं
  • लाल सुक्या मिरच्या
  • हिंग
  • चिरलेला कांदा
  • थोडं पनीर
  • चाट मसाला

  डोसा बनवण्याची कृती:

  • तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून त्यात लाल मिरची टाकून रात्रभर भिजत ठेवा
  • सकाळी मिक्सरवर वाटून त्यात इतर सर्व साहित्य फक्त कांदा आणि पनीर सोडून त्यात टाका.
  • पाणी मिसळून एक छान डोसा बॅटर तयार करा
  • कढीपत्ता बारीक चिरून टाका
  • अर्धा तासासाठी हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवा
  • तवा गरम करा. पाणी शिंपडून अंदाज घ्या आणि त्यावर डावेने बॅटर पसरवा
  • वरून चिरलेला कांदा आणि किसलेले पनीर पसरवा
  • तेल टाकून डोसा कुरकुरीत होऊ द्या
  • गरमगरम डोसा तुमच्या घरच्यांना वाढा
  Instagram

  नीर डोसा रेसिपी (Neer Dosa Recipe In Marathi)

  नीर डोसादेखील एक खास डोसा प्रकार असल्यामुळे त्यासाठी लागणारे बॅटर आणि बनवण्याची पद्धत वेगळी आहे.

  नीर डोसासाठी लागणारे साहित्य:

  • एक कप तांदूळ
  • तेल
  • किसलेलं ओलं खोबरं
  • चवीनुसार मीठ

  नीर डोसा बनवण्याची कृती:

  • तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजू द्या
  • तांदळामधील पाणी काढून ते वाटून घ्या वाटताना त्यामध्ये खोवलेला नारळही टाका
  • मीठ टाकून छान बॅटर तयार करा
  • नीर डोसा तयार करण्यासाठी बॅटर अतिशय पातळ लागत असल्यामुळे त्या अंदाजानुसार त्यात पाणी टाका
  • तवा गरम करा आणि त्याला तेल लावून घ्या
  • तव्यावर डोसा बॅटर ओता आणि तवा कौशल्याने फिरवून ते तव्यावर पसवून घ्या
  • मध्यम आंचेवर डोसा शेकू द्या
  Instagram

  गव्हाचा पीठाचा डोसा रेसिपी (Wheat Dosa Recipe In Marathi)

  डोसा म्हटला की त्यामध्ये तांदळाचा वापर केला जातो. मात्र आजकाल डाएटमुळे बिना तांदळाचे काही डोसा प्रकार लोकप्रिय होत आहेत. त्यापैकी एक गव्हाच्या पीठाचा डोसा

  गव्याच्या पीठाचा डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • गव्हाचे पीठ
  • चवीनुसार मीठ
  • तेल 
  • पाणी

  गव्हाच्या पीठाचे डोसे तयार करण्याची कृती:

  • गव्हाच्या पाठीत मीठ टाकून मिक्स करा
  • त्यात थोडं थोडं पाणी मिसळत पातळ बॅटर तयारर करा
  • तवा गरम करा आणि त्यावर हे बॅटर पसरवा
  • डोसाला सगळीकडून कडेने तेल लावा
  • झाकण ठेवून शिजू द्या
  • थोड्या वेळाने झाकण काढा आणि डोसा पलटून घ्या
  • दोन्ही भाजून खरपूस झाल्यावर गरमगरम सर्व्ह करा
  Instagram

  बाजरीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Bajara Dosa Recipe In Marathi)

  थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी शरीरासाठी फारच उपयुक्त असते. यासाठीच या काळात तुम्ही बाजरीचे डोसे खाऊ शकता.

  बाजरीचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

  • एक वाटी बाजरीचे पीठ
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • एक चमचा बेसन
  • हिरवी मिरचीची पेस्ट
  • एक वाटी ताक
  • हळद
  • लसणाची पेस्ट
  • चवीपुरतं मीठ

  बाजरीचे डोसे तयार करण्याची कृती:

  • एका भांड्याच बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि ताक एकत्र करा
  • गरजेनुसार त्यात पाणी मिसळा आणि बॅटर तयार करा
  • तवा गरम करा आणि पाणी शिंपडून अंदाज घ्या
  • तव्यावर डोसा घाला आणि एकसमान करा 
  • झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्या
  • दोन्ही बाजून शेकवून घ्या
  • गरमागरम वाढा
  Instagram

  अंड्याचा डोसा रेसिपी (Egg Dosa Recipe In Marathi)

  ज्यांना अंडे खाणं आवडत असेल त्यांच्यासाठी हा  एक बेस्ट नास्ता ठरू शकतो. 

  अंड्याचा डोसा तयार करण्यासाठी साहित्य:

  • प्लेन डोसाचे बॅटर
  • तीन अंडी
  • चिरलेला कांदा
  • काळीमिरी पावडर
  • हळद
  • तेल 
  • चवीनुसार मीठ

  एग डोसा अथवा अंडाच्या डोसा तयार करण्याची कृती:

  • एका वाटीत अंडी फेटून घ्या त्यात चिरलेला कांदा, काळीमिरी पावडर आणि हळद टाका
  • तवा गरम करत ठेवा
  • त्यावर एका डावेने प्लेन डोसा बॅटर पसरवा बॅटर थोडं गरम होताच त्यावर अंड्याचे बॅटर ओता आणि पसरवून घ्या
  • झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घ्या
  • दोन्ही बाजूने शेकवा आणि एग डोसाच्या आनंद घ्या
  Instagram

  ओट्स डोसा रेसिपी (Oats Dosa Recipe In Marathi)

  ओट्स हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ असल्यामुळे आजकाल डाएटसाठी आहारात ओटसचा वापर करणे वाढले आहे. सकाळचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी  तुम्ही ओटसचा डोसा तयार करू शकता. 

  ओट्स डोसा तयार करण्यासाठी साहित्य:

  • एक वाटी ओट्स
  • एक वाटी ताक
  • चिरलेला कांदा
  • चिरलेली हिरवी मिरची
  • चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

  ओट्सचा डोसा बनवण्याची कृती:

  • ताकामध्ये ओट्स टाका आणि ते भिजू द्या
  • ओट्स फुलून ते ताक शोषून घेतील
  • त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाका
  • पाणी टाकून पातळ बॅटर तयार करा
  • तवा गरम करा आणि त्यावर डोसा पसरवा
  • तेल सोडून दोन्ही बाजून कुरकुरीत करून घ्या
  Instagram

  नाचणीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Ragi Dosa Recipe In Marathi)

  नाचणी शरीरासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे तिचा आहारात समावेश केल्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

  नाचणीच्या पीठाचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

  • एक वाटी नाचणीचे पीठ
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • एक चमचा बेसन
  • हिरवी मिरचीची पेस्ट
  • एक वाटी ताक
  • हळद
  • लसणाची पेस्ट
  • चवीपुरतं मीठ

  नाचणीचे डोसे तयार करण्याची कृती:

  • एका भांड्यात नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि ताक एकत्र करा
  • गरजेनुसार त्यात पाणी मिसळा आणि बॅटर तयार करा
  • तवा गरम करा आणि पाणी शिंपडून अंदाज घ्या
  • तव्यावर डोसा घाला आणि एकसमान करा 
  • झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्या
  • दोन्ही बाजून शेकवून घ्या
  • गरमागरम सर्व्ह करा
  Instagram

  ज्वारीच्या पिठाचा डोसा रेसिपी (Jawar Dosa Recipe In Marathi)

  ज्वारीमध्ये फायबर्स आणि पौष्टिक घटक भरपूर असल्यामुळे ज्वारीचे डोसे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. 

  ज्वारीच्या पीठाचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

  • एक वाटी ज्वारीचे पीठ
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • एक चमचा बेसन
  • हिरवी मिरचीची पेस्ट
  • एक वाटी ताक
  • हळद
  • लसणाची पेस्ट
  • चवीपुरतं मीठ

  ज्वारीच्या पीठाचे डोसे तयार करण्याची कृती:

  • एका भांड्यात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि ताक एकत्र करा
  • गरजेनुसार त्यात पाणी मिसळा आणि बॅटर तयार करा
  • तवा गरम करा आणि पाणी शिंपडून अंदाज घ्या
  • तव्यावर डोसा घाला आणि एकसमान करा 
  • झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्या
  • दोन्ही बाजून शेकवून घ्या
  Instagram

  चण्याच्या पीठाचा डोसा रेसिपी (Chana Dosa Recipe In Marathi)

  चण्याचा डोसा करण्याचे साहित्य:

  • एक वाटी काबुळी चणे
  • एक वाटी इडलीचे तांदूळ
  • चिमूट भर मेथीचे दाणे
  • हिंग 
  • चवीनुसार मीठ

  चण्याचे डोसे बनवण्याची कृती:

  • चणे, तांदूळ स्वच्छ धुवून त्यात मेथी टाकू रात्रभर भिजवा.
  • सकाळी दोन्ही एकत्र करा आणि वाटून घ्या
  • चवीनुसार मीठ, हिंग त्यात टाका आणि बॅटर एकजीव करा
  • तवा गरम करा आणि त्यावर डावेने बॅटर टाका
  • गोलाकार पसरवून डोसा तयार करा
  • गरमगरम चटणीसोबत वाढा
  Instagram

  डोसाबाबत मनात असलेले काही प्रश्न - FAQ's

  1. डोसा बॅटर परफेक्ट होण्यासाठी काय करावे ?

  डोसा बॅटर परफेक्ट होण्यासाठी साहित्याचे प्रमाणे अचूक असावे, शिवाय साहित्य दिवसभर भिजत ठेवून रात्री वाटून घ्यावे. ज्यामुळे रात्रभर ते आंबून सकाळी चांगले डोसा बॅटर तयार होईल. थंडीच्या दिवसांमध्ये डोसा बॅटर तयार करण्यासाठी ते जास्त वेळ आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवावे.

  2. बॅटर वाटून तयार केल्यावर लगेचच डोसा करता येतो का ?

  डोसा बॅटर चांगले होण्यासाठी ते आंबण्याची क्रिया होणं गरजेचं आहे. त्यामुळे वाटल्यावर ते काही काळ आंबण्यासाठी ठेवावे लागते. थंडीच्या दिवसात या क्रियेला जास्त वेळ लागतो तर उन्हाळ्यात ही क्रिया पटकन होते.

  3. डोसा कशासोबत वाढावा अथवा सर्व्ह करावा ?

  डोसा नेहमी नारळाच्या लाल, हिरव्या चटणीसोबत आणि सांबरसोबत वाढावा. शिवाय मसाला डोसा असेल तर त्यासोबत बटाट्याची भाजी वाढावी. ज्यामुळे डोसा अधिक चविष्ट लागतो.

  4. डोसा वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आहे का ?

  नक्कीच डोसा हा एक आंबवलेला पदार्थ आहे. ज्यामुळे तो हलका आणि कमी फॅट्स असलेला असतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नाचणीच्या पिठाचे, ओट्सचे, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठाचे डोसे खाऊ शकता.