कानदुखीचा त्रास कित्येकांना असतो. कानाचे दुखणे सुरु झाले की काही करावेसे वाटत नाही. हातातले सगळे काम सोडून गडाबडा लोळण्याची वेळ कानदुखीमुळे कित्येकांवर येते. काहीजणांना कानदुखीचा त्रास फारस होत नसेल पण काहींसाठी कानदुखी हा एक आजार होऊन गेला आहे. कानांना सतत काहीना काही होत राहणे.कान अचानक दुखणे, कानात मळ साचणे, कानात पू होणे, कानातून पाणी येणे अशा कही त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला कानाचे आजार व घरगुती उपाय याबद्दल माहिती असायला हवी. म्हणूनच कानांसदर्भात काही कानाचे आजार व घरगुती उपचार यांची माहिती आम्ही एकत्र केली आहे. जाणून घेऊया अशाच कानांचे आजार व घरगुती उपाय याविषयी अधिक माहिती.
कानांसदर्भात काही ठराविक समस्या या हमखास दिसून येतात. कानांच्या या नेमक्या समस्या काय आहेत ते आपण आधी जाणून घेऊया.
कानांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी प्रत्येकाच्या कानांमध्ये मळ असतो. हा चिकट तेलकट असा मळ कानांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी असतो. पण कधी कधी कानांमध्ये हा मळ वाढू लागतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा मळ इतका वाढतो की, कानांच्या पडद्यापासून बाहेरही दिसू लागतो. कानांमध्ये साचलेला हा मळ जास्त झाला की, तो कान बंद करतो. त्यामुळे अचानक कमी ऐकायला येणे किंवा कान दुखायला लागण्याचा त्रास होऊ लागतो.
कानांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे इजा होऊ शकते. अनेकांना कानात बोट घालण्याची किंवा अणुकुचीदार वस्तू घालण्याची सवय असते. कानांमध्ये येणारी खाज किंवा मळ काढण्यासाठी खूप जण कानांमध्ये पीन, पेन्सिल किंवा अशा काही वस्तू घालतात त्यामुळे कानांसारख्या नाजूक जागेला इजा होण्याची शक्यता असते. कानांमध्ये जर तुम्हाला अशाप्रकारे इजा होत असेल तर तुम्ही कानांमध्ये अशा गोष्टी वापरणे कमी करायला हवे. पण पीन किंवा काही अणुकुचीदार गोष्टीमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर ते टाळा.
कानांच्या आजारासंदर्भातील आणखी एक त्रास म्हणजे कान बंद होणे. कान गप्प होणे आणि बंद होणे यामध्ये फरक आहे. प्रवासादरम्यान कानांची जी अवस्था होते त्याला कान गप्प होणे असे म्हणतात. तर कान बंद होणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे होते. सायनस, संसर्ग,सर्दी आणि अॅलर्जीमुळ कान बंद होऊ शकतात. कानांमध्ये जेव्हा नवा मळ तयार होतो तेव्हा जुना मळ हा बाहेर फेकला जातो. असा मळ जर स्वच्छ झाला नाही तरी देखील कान बंद होतो. कान बंद झाल्यामुळे कमी ऐकू येते. शिवाय कानांमधून मळ दिसू लागतो. सतत कानातून चिकट द्रव्य बाहेर येते. कान दुखू लागतो.
बरेचदा कानात काही अडकले की ते काढताना नाकी नऊ येतात. लहान असो वा मोठे कानात बरेचदा अशा काही गोष्टी अडकतात की त्यामुळे त्रास होऊ लागतो. बरेचदा कानात फुल अडकणे, काहीतरी बारीक सारीक वस्तू जाणे अशा तक्रारी अगदी सर्रास होत असतात. तुम्हालाही असा त्रास झाला की, ती वस्तू काढताना का अनेकदा दुखावला जातो. चिमटा किंवा इतर कोणत्याही साहित्याचा वापर करताना कानांना जखम झाली की, कानांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता ही थोडी जास्त असते. त्यामुळे अशावेळी जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते.
सगळ्यांच्याच कानांमध्ये मळ असते. पण कानांमधील आवश्यक असलेले मॉईश्चर कमी झाले की, कानांमधील मळ हा कडक होऊ लागतो. कानांमधील मळ कडक झाला की, त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. कान हा जड वाटतो. कान दुखू लागतो, कानातील मळ कडक झाल्यामुळे तो कानातून काढताना कानामध्ये हा जखम होऊ शकते. कानातील मळ हा कडक झाला की, त्याचा त्रास कानांच्या पडद्यालाही होऊ शकतो. त्यामुळे Earwax चा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्याची योग्य वेळी काळजी घ्यायला हवी.
कानाचे कार्य हे कानाच्या पडद्यावर अवलंबून असते. कानांमध्ये काहीही जाऊ नये यासाठी कानांच्या आत एक पातळ असा पडदा असतो. जर कानांमध्ये सतत काही टाकले तर कानांचा पडदा हा फाटत राहतो. कानांच्या पडद्याला दुखापत झाली तर त्या ठिकाणी सूज राहते त्यामुळे आणखी काही त्रास बळावू शकतात. अंतकर्णाच्या आजारापैकी हा एक आजार असून यामुळे कानदुखी होऊ शकते. अशा प्रसंगी कानाला सूज येणे, उलट्या येणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागतो. याकडे दुर्लक्ष केल्यास बहिरेपणा देखील येऊ शकतो.
कानात अचानक कळ येण्याचा त्रासही अनेकांना होतो. काहीही कारण नसताना कानातून कळ येण्यामागे बरीच कारणं असतात. कानांच्या अशा दुखण्यामागे वातावरण बदल हे देखील कारण असू शकते. वातावरण बदलानुसार कानातील ओलावा हा कमी-जास्त होत असतो. कानांमधील ओलावा कमी-जास्त झाला तरी अशाप्रकारे कानदुखी होऊ शकतो. याशिवाय कानांमध्ये मळ झाला असेल आणि तो काढताना जर चुकीच्या गोष्टींचा वापर झाला असेल तर कानांच्या पडद्याला त्रासही होऊ शकतो.
कधी अचानक कानांमध्ये वेगवेगळे आवाज आल्याचा भास तुम्हाला झाला आहे का? कानांमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे आवाज येणे याला कान वाजणे असे म्हणतात. कान वाजतात म्हणजे कानांमध्ये शिट्ट्यांचे, फुसफुसण्याचे किंवा काहीतरी गोंधळाचे आवाज ऐकू येऊ लागतात. या आजाराकडे दुर्लक्ष केले तर हा आजार उगीचच मानसिक आजाराचे रुप धारण करु शकतो. वैद्यकिय भाषेत या आजाराला टिनीटस असे म्हणतात. हा आजार जास्त करुन वृद्धांमध्ये जाणवू येतो. वयोमानानुसार कमी ऐकू येताना कानांमध्ये अशाप्रकारे वेगवेगळे आवाज उगीच ऐकू यायला लागतात. याशिवाय हार्मोन्समधील बदल, सायनसचा संसर्ग, कानामध्ये जमा झालेला मेणासारखा मळ यामुळेही समस्या जाणवू शकते.
कधीतरी कान फडफडण्याचा त्रासही अनेकांना होतो. कानात काहीतरी सतत फडफडत आहे असे वाटत राहते.कान फडफडताना कानात काहीतरी पाखरु गेल्यासारखे वाटते. कान फडफडण्याचा त्रास हा तेव्हाच होतो. ज्यावेळी कान हा कोरडा पडतो. कान स्वच्छ असणे जितके गरजेचे असते तितकेच कानामध्ये आवश्यरक असलेला मळही असणे गरजेचे असते. कान फडफडण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी.
स्विमर्स इअर हा कानांच्या संदर्भातील आजार असून हा आजार बुरशी आणि बॅक्टेरियाशी निगडीत आहे. याला स्विमर्स इअर म्हणण्यामागे कारण एकच आहे की, कानातील ओलाव्यामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कानात पाणी जाण्याचा त्रास हा स्विमिंग केल्यामुळे होतो. जे लोक त्यांचा वेळ पाण्यात अधिक काळ घालवतात त्यांना हा स्विमर्स इअरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना त्वचेची अॅलर्जी होण्याची जास्त शक्यता असते त्यांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. स्विमर्स इअरचा त्रास पहिल्यांदा जाणवत नाही. हा त्रास थोड्या दिवसांना जाणवतो. कान लाल पडणे, कान दुखणे, कानातून पाणी येणे, कानातून कळ येणे असा त्रास होऊ लागतो. कधीकधी या त्रासामध्ये कानांमध्ये खाजही येऊ लागते. जर तुमचा पाण्याशी जास्त संबंध असेल तर तुम्हाला असा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. याकडे योग्य लक्ष द्या.
कानांच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार काही घरगुती उपचार पद्धती या कामी येतात. या घरगुती उपचार पद्धती कोणत्या त्या जाणून घेऊया.
अचानक तुम्हाला कमी ऐकू येत असेल किंवा कानांमध्ये मळ साचला असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने कानांचा मळ काढून घ्या. कानातील मळ काढण्यासाठी इयर ड्रॉप देखील मिळतात. त्यांचा उपयोग करुनही तुम्हाला काळातील अतिरिक्त मळापासून सुटका मिळवता येऊ शकते. कानांमधील मळ कडक होऊ द्यायचा नसेल तर कानांमध्ये आवश्यक असलेला ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे कानांमध्ये तुम्ही तेल किंवा इअर ड्रॉप घाला. त्यामुळे कानांमधील मळ हा कानाबाहेर निघण्यास मदत मिळते.
इयर बडचा उपयोग करुन तुम्ही काळातील मळ अगदी अलगद काढू शकता. कानांमधील मळ काढताना कानांचा पडदा दुखावला जाणार नाही याची योग्य काळजी घ्या.कानांमधील मळ काढताना इअर बड्सचा वापर सुरुवातीला करु नका. कारण त्यामुळे कानामधील मळ सैल झाल्यानंतरच तो काढा. कानातील मळ तुम्हाला सहज काढता येत नसेल तर तुम्ही योग्य सल्ला घ्या. डॉक्टरही तुम्हाला मळ अगदी सहज काढून देण्यास मदत करतील.
कान फडफडण्याचा त्रास अधिक होत असेल तर तुम्ही कानामध्ये लसणीचे तेल, खोबऱ्याचे तेल किंवा तिळाचं तेल घालू शकता. कानात तेल घालून कान ल्युब्रिकंट केल्यानंतर तुम्हाला थोडासा आराम मिळेल.कानांमध्ये अशा प्रकारे इजा झाली असेल तर तुम्ही कानांमध्ये तेल कोमट करुन घाला. काही दिवस हा प्रयोग करा. कानांमध्ये तुळशीचा पाल्याचा रस किंवा जास्वंदाच्या पानांच्या रसही घालू शकता. त्यामुळेही तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो.
कानातील मळ काढणाऱ्या सुरक्षित अशा सक्शन मशीनचा उपयोग करणे. त्यामुळे कानातील मळ कमी होण्यास मदत मिळते. काही अँटी बायोटिक्स आणि औषधांच्या मदतीने देखील कानातील मळ निघून जातो. कान स्वच्छ होतो त्यामुळे हा त्रास कमी होतो. जर कान वाजण्याचा त्रास अधिक झाला असेल तर डॉक्टरांचा औषधानेही तो बरा होतो.
च्युईंगम चघळण्याने बंद झालेला कान उघडण्यास मदत मिळते. कानांमधील मळ काढण्यासाठी जर योग्य इअर ड्रॉपचा उपयोग केला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. सायनस आणि सर्दी संदर्भातील औषधांनीही कानांच्या आतल्या बाजूला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते.
कान दुखी ही कानांसंदर्भातील सर्वसाधारण अशी तक्रार आहे. खूप जणांना अगदी कधीही आणि कोणत्याही क्षणी होणारा हा त्रास वेगवेगळ्या गोष्टीमुळे होऊ शकतो. कानात पाणी साचणे, कानात पुळी येणे, कान कोरडा होणे, कानात दुखापत झाल्यामुळे कानांसंदर्भात ही तक्रार अगदी कोणालाही होऊ शकते. याशिवाय कानांमध्ये उष्णतेने पुळी येण्याचा त्रासही खूप जणांना होतो.
विमान प्रवासात, कानात पाणी गेल्यावर किंवा फटाक्यांच्या आवाजामुळे अनेकदा कान गप्प झाल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. तुमचेही कान गप्प होत असतील अशावेळी नाकपुड्या पकडून तोंड बंद करुन कानांनी हवा बाहेक काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला त्याचा इतकासा त्रास होत नसेल तर तसेच थांबा कारण गप्प कान कधी की आपोआप ही सुटतात. कानातून हवा गेल्यानंतर मग थोडेसे बरे वाटते. पण तोपर्यंत कमी ऐकू येते असेच होते.
कानांच्या आत पाणी आंघोळीच्या वेळी जातेच. पण ते पाणी जर कानांच्या बाहेर आले नाही तर बरेचदा कान दुखू लागतो. त्यामुळे शक्य असेल तर कानात पाणी गेल्याचे जाणवत असेल तर त्याच वेळी ज्या कानात पाणी गेले आहे त्या कानातून पाणी काढून टाकण्यासाठी इयर बड्सच्यामदतीने कानातील पाणी टिपून घ्या. कानात पाणी जास्तवेळ राहिले तर तुम्हाला दिवसभर कान दुखी जाणवू शकते. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कानांची अधिक काळजी घ्या.
कानांच्या समस्या आणि उपचाराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा.