5 मिनिट्समध्ये काढा ब्लॅकहेड्स, करा या वस्तूचा वापर

5 मिनिट्समध्ये काढा ब्लॅकहेड्स, करा या वस्तूचा वापर

ब्लॅकहेड्स (Blackheads) आपल्या त्वचेसाठी भरपूर नुकसानकारी आहेत. हे दिसायलाच घाण दिसतात असं नाही तर आपल्या त्वचेच्या आत साठलेल्या या घाणीमुळे मुरूमं आणि डागासारख्या समस्याही निर्माण होतात. ब्लॅकहेड्सची समस्या सर्वांनाच असते आणि ज्या व्यक्तींच्या त्वचेवरील पोअर्स मोठे आहेत अथवा ज्यांची त्वचा अधिक तेलकट आहे त्यांना तर यामुळे खूपच त्रास होताना दिसतो. त्यामुळे चेहऱ्याची स्वच्छता करून ब्लॅकहेड्स काढणं अत्यंत गरजेचे आहे. पण कितीतरी वेळा आपल्याला पार्लरला जायला वेळ नसतो अथवा कधी कधी घाईमध्ये असे कार्यक्रम आपण ठरवतो आणि मग जाणवतं की, आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दिसून येत आहेत. मग अशावेळी तुम्हाला जर त्वरीत 5 मिनिट्समध्ये ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर तुम्ही आम्ही सांगितलेले उपाय करून पाहू शकता. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण घरातील बऱ्याच गोष्टींचा वापर करू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा वापर करून आपण याचा त्वरीत उपयोग करून घेऊ शकतो. याचा कसा वापर करायचा हे आपण या लेखातून पाहू. यामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम होईल. तुम्हाला घाईघाईत जर ब्लॅकहेड्स काढायचे असतील त्यावर हे उत्तम उपाय आहेत.

बेकिंग सोडा उत्तम उपाय

Shutterstock

तुम्हाला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करून घेता येऊ शकतो. तसंच तर बेकिंग सोड्याचा उपयोग आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी याचा त्वरीत उपयोग होतो. 

कसे वापरावे 

 • सर्वात पहिले एक चमचा बेकिंग सोडा पाण्यासह मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या 
 • ही पेस्ट ब्लॅकहेड्स असणऱ्या ठिकाणी लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.  काही वेळ तसंच राहू द्या
 • नंतर कोमट पाण्याने नाक हलक्या हाताने रगडून हे काढून टाका 
 • यामुळे तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स निघून जातील आणि चेहराही अधिक मुलायम दिसून येईल

‘या’ घरगुती वस्तूंचा करा वापर आणि मिळवा ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका (How to remove Blackheads)

लिंबाने होईल काम

Shutterstock

लिंबाचा वापर करूनही तुम्ही ब्लॅकहेड्स काढण्याचे काम करू शकता. वास्तविक यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी  जर तुम्ही लिंबाचा वापर करत असाल तर तुम्ही त्याआधी त्वचेवर पॅच टेस्ट करून घ्यावी.  कारण काही जणांच्या त्वचेवर लिंबाच्या रसाने अलर्जी येते. त्यामुळे याचा आधी वापर हातावर करून पाहावा

कसे वापरावे 

 • लिंबाचे गोल स्लाईस करून घ्या 
 • यामध्ये काही थेंब मधाचे मिक्स करा आणि ब्लॅकहेड्सच्या जागेवर तुम्ही हे अगदी हलक्या अथवा मीडियम प्रेशरसह घासा 
 • लक्षात ठेवा की, तुम्ही हे जोरजोरात रगडू नका. यामुळे नुकसानदेखील होऊ शकतं
 • यानंतर 5 मिनिट्सपर्यंत आपल्या चेहऱ्यावर हे असंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा 

घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय

ब्लॅकहेड्स घालविण्यासाठी पील ऑफ मास्क

Shuttestock

तुम्हाला जर पाच मिनिट्समध्ये सोप्या पद्धतीने ब्लॅकहेड्स घालवायचे असतील तर तुम्ही घरीच पील ऑफ मास्क तयार करू शकता. असं करण्यासाठी तुम्हाला केवळ जिलेटीनची गरज भासेल. बऱ्याचदा तुम्ही जेली बनविण्यासाठी जिलेटिन वापरत असाल, तर त्याचा उपयोग तुम्ही ब्लॅकहेड्स घालविण्यासाठीही करू शकता. 

कसे वापरावे 

 • एक चमचा जिलेटिन, एक चमचा दूध घेऊन दोन्ही नीट मिक्स करून घ्या 
 • ब्लॅकहेड्स असणाऱ्या ठिकाणी हे मिश्रण लावा 
 • साधारण पाच मिनिट्समध्ये हे सुकेल आणि मग हे नॉर्मल पीलऑफ मास्कप्रमाणे काढून टाका 

ब्लॅकहेड्स घालविण्यासाठी  या तीन सोप्या पद्धती नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. पण यापैकी कोणत्याही वस्तूंची अलर्जी असेल तर त्याचा वापर तुम्ही करू नका. वापर करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करून घ्या. तुमच्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम नाही झाला तरच तुम्ही याचा वापर करा. हे ब्लॅकहेड्ससाठीचे उपाय मात्र तुम्ही नक्की करून पाहा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की तुमचा अनुभव सांगा. 

अंड्याचा वापर करून घरच्या घरी हटवा ब्लॅकहेड्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक