ADVERTISEMENT
home / Fitness
गुडघेदुखीवर रामबाण उपाय

गुडघेदुखीवर रामबाण उपाय जाणून घ्या (Knee Pain Home Remedies In Marathi)

 

वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक दुखण्यापैकी एक दुखणं म्हणजे ‘गुडघेदुखी’ अनेकांना गुडघेदुखीचा त्रास हा अगदी पस्तिशीपासून सुरु होते. चालताना किंवा  दैनंदिन हालचाली करताना गुडघ्याच्या सांध्यांमध्ये दुखत राहते. त्यामुळे चालतना अगदी नकोसे होऊन जाते. गुडघे दुखीची कारणं ही अनेक आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या गुडघे दुखीकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. कारण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चालण्याच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत चालता यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. कोणत्याही काठीचा आधार न घेता आपल्या दोन पायांवर चालणे ही अभिमानाची गोष्ट असते. पण वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी किंवा वजन वाढीमुळे येणारी गुडघे दुखी योग्यवेळी जाणून घ्यायला हवी. जर ती योग्यवेळी जाणून घेतली तर गुडघे दुखीवर घरगुती उपचार (knee pain home remedies in marathi) देखील करता येतात. गुडघेदुखीच्या याच त्रासापासून मोकळे करण्यासाठी आम्ही गुडघेदुखीवर रामबाण उपाय शोधून काढले आहेत ते जाणून घेऊन या

बर्फाचा शेक

बर्फाचा शेक - गुडघेदुखीवर रामबाण उपाय

Instagram

गुडघे दुखीवर घरगुती उपाय करण्याचा विचार करत असाल तर बर्फाचा उपयोग हा अगदी सगळीकडे केला जातो. बर्फ एका कपड्यात घेऊन किंवा एखाद्या कपड्यात बर्फाचे खडे घेऊन किंवा आईस पॅकची पिशवी घेऊन गुडद्याच्या आजुबाजूला फिरवा. अनेकदा गुडघेदुखीमुळे गुडघे लाल होतात. गुडघ्यांना सूज येते. बर्फ हे त्यावर कमालीचे काम करते. बर्फाचा शेक दिल्यामुळे पायांना आराम मिळतो. सूज कमी होते. त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने पायांना बर्फाचा शेक द्यावा. नक्की आराम मिळेल. बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक हा गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी होतो. 

ADVERTISEMENT

                             वाचा – केवड्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Kewra In Marathi)

कंप्रेशन बँडेज

 

कंप्रेशन म्हणजेच एखाद्या ठिकाणी दाब निर्माण करणे. गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे. बाजारात अशा प्रकारच्या बँडेज मिळतात. ज्या लावल्यानंतर गुडघेदुखी नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तुम्ही संपूर्ण दिवस हे कंप्रेशन बँडेज वापरु शकता. रात्री झोपताना हे कंप्रेशन बँडेज वापरु शकता. कंप्रेशन बँडेजमध्ये उबदारपणा राहतो. अनेकदा थंडीच्या काळात गुडघेदुखी जास्त त्रासदायक वाटू लागते. वातावरणात थंडावा आला की, गुडघेदुखीचा त्रास अति होऊ लागतो. अशावेळी या कंप्रेशन बँडेज आणि ही पद्धत तुम्हाला आराम देते. कंप्रेशन बँडेज बांधताना योग्य पद्धतीने तुम्ही कंपेशन बँडेज बांधण्याची पद्धत जाणून घ्या. फक्त झोपताना तुम्ही ती काढून ठेवायला विसरु नका.

वाचा – व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय

 

ADVERTISEMENT

 

अॅक्युपंचर

अॅक्युपंचर - गुडघेदुखीवर रामबाण उपाय

Instagram

अॅक्युपंचर ही देखील गुडघे दुखीवर चांगली पद्धत आहे. एखाद्या दुखण्यावर काही ठराविक पाँईट्स दाबले की दुखणे कमी होते. ही एक पद्धत असून यालाच अॅक्युपंचर असे म्हटले जाते. अॅक्युपंचर हे एक संवेदनात्मक संप्रेरक असल्यामुळे वेदनेत आराम मिळण्यासाठी ही अॅक्युपंचर हे फारच फायदेशीर ठरते. अॅक्युपंचर करण्याचा विचार करत असाल तर त्याचे योग्य प्रशिक्षण असलेल्यांकडूनच तुम्ही हे अॅक्युपंचर करुन घ्यायला हवे. अॅक्युपंचर करताना अगदी मसाज प्रमाणेच त्याचा प्रेशर आणि प्रेशर पाॅईंट हे ठरलेले असतात. त्यामुळे अॅक्युपंचरचा वापर करुन तुम्ही गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.

ADVERTISEMENT

ताई ची चायनीज मसाज पद्धत

शारिरीक त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी अशा अनेक पद्धती आहेत ज्याने आराम मिळतो. मसाजच्या अनेक चायनीज पद्धती संपूर्ण जगात फारच प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक पद्धत आहेत ती म्हणजे ‘ताई ची’ नावाची मसाज पद्धत. ताईची नावाची ही पद्धत रिलॅक्स करण्याचे काम करते. शरीराचे दुखणे कमी करण्यासही मदत करते. ताई ची हा मसाज प्रकार फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. काही ठराविक वेळेत हा मसाज केला जातो. या पद्धतीने देखील गुडघ्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. थाई ची या पद्धतीमुळे वजन नियंत्रणास आणण्यास मदत करते.

व्यायाम

कोणतीही व्याधी नसली तरी देखील शरीराच्या योग्य हालचालीसाठी आणि हाडांच्या स्नायूंच्या बळकटीसाठी योग्य हालचाल गरजेची असते. व्यायाम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा गुडघेदुखी फार जास्त असेल अशांनी तर व्यायाम हा करायलाच हवा. पायांचा व्यायाम करताना नेमका तो कसा करावा याचे योग्य मार्गदर्शनही तुम्ही घ्यायला हवे. यासाठी जीम किंवा एखादा असा कोर्स लावा ज्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांच्या उत्तम व्यायाम करुन घेण्यास मदत करेल.

वजन नियंत्रित ठेवणे

वजन नियंत्रित ठेवणे

Instagram

ADVERTISEMENT

हल्लीच्या काळात वाढते वजन हे अनेकांसाठी आरोग्याचा गंभीर विषय आहे. जंक फूडचे अति सेवन, खाण्याच्या चुकीच्या सवयी या सगळ्यामुळे वजन वाढणे हे आता अगदी साहजिक झाले आहे. वजन वाढून गोल गरगरीत होणे हे इतर कोणत्याही कारणासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच हानिकारक झाले आहे. जर तुमचे वजन सतत वाढत राहिले तर त्याचा परिणाम हा तुमच्या गुडघ्यांवर होतो. तुमच्या शरीराचा वाढता भार जर गुडघ्यांना पेलला नाही तर गुडघेदुखीची तक्रार ही अगदी कमी वयातच सुरु व्हायला लागते. त्यामुळे गुडघे दुखीवर रामबाण उपाय (knee pain home remedies in marathi) म्हणजे वजन कमी करणे. जर तुम्ही आदर्श वजन तसेच ठेवण्यात यशस्वी झालात तर तुमचा गुडघेदुखीचा त्रास हा आपोआप कमी होण्यास मदत मिळते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करण्याचा डाएट नक्की करा. म्हणजे योग्य पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करेल.

योग्य मसाज

मसाज हा अगदी कोणत्याही वयात शरीराला आराम देणारा असा उपाय आहे. गुडघेदुखी सुरु झाल्यावर गुडघ्यांना मसाज करुन घेणे फारच फायद्याचे ठरते. हल्ली गुडघेदुखी सुरु झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने फिझिओथेरपी करण्याचा सल्ला दिला जातो. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने हा मसाज केला जातो. मसाज करण्याची ही पद्धत इतकी लाभदायक असते की, त्यामुळे अडकलेले सांधे सुरळीत होण्यास मदत मिळते. बरेचदा वेगवेगळ्या आर्युवेदिक तेलांचा उपयोग करुन ही मसाज थेरपी केली जाते. पायांचे दुखणे असल्यावरही अशा पद्धतीने मसाज केला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला काही दिवसांचा फरक ठेऊन हा मसाज करणे गरजेचे असते. याशिवाय जर तुम्ही स्वत: असा मसाज करण्याचा विचार करत असाल तर त्याची योग्य माहिती आधी घ्या. मगच मसाज करा.

आलं

आर्थरायटीससाठी आलं हे फारच फायदेशीर ठरते हे अनेक अभ्यासांती सिद्ध झाले आहे. आल्याचे फायदे अनेक आहेत. पण आल्याच्या अर्काच्या सेवनामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. आर्थरायटीसचा त्रास कमी होण्यासाठी आल्याचे सेवन किंवा आल्याचा अर्क गुडघ्यांना लावण्यास सांगितला जातो. आल्याचा अर्क लावल्यामुळेच गुडघेदुखीपासून सुटका मिळते.

हिट अँड कोल्ड थेरपी

हिट अँड कोल्ड थेरपी

ADVERTISEMENT

Instagram

गरम आणि थंड पाण्याचा उपयोग करुनही गुडघे दुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. हिट अँड कोल्ड थेरपी ही सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे जी तुम्ही घरबसल्या करु शकता. गरम पाण्याचा शेक तुम्ही गुडघ्यांना द्या. गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे जॉईंट्समधील ल्युब्रिकंट चांगले होण्यास मदत मिळते. गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे स्नायूंवरील आलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. तर बर्फाचा उपयोग केल्यामुळे गुडघ्यांना आलेली सूज आणि लालिमा कमी होण्यास मदत मिळते. शक्य असेल त्यावेळी तुम्ही गुडघ्यांना हिट अँड कोल्ड थेरपीचा उपयोग करु शकता. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यात मदत मिळेल. गुडघेदुखीच्या त्रासापासून थोडा आराम मिळतो. गुडघेदुखीवर घरगुती उपचार (home remedies for knee pain in marathi) करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही पद्धतही नक्की ट्राय करु शकता.

विलो बार्क

विलो बार्क नावाच्या झाडाची पाने ही देखील गुडघेदुखीवर वापरु शकतात. विलो बार्क ही अँटीपरस्पिरंटची पानं आणि त्याचा अर्क हा यामध्ये लावला जातो. आर्थरायटीसवर विलो बार्कची पानं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. विलो बार्क असे  नाव घेतल्यावर ही एखादी पद्धत आहे असे वाटू शकते. पण असे मुळीच नाही. ही विलोची पानं असतात. बिलो बार्कचा वापर करतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण विलो बार्कचा वापर केल्यामुळे काही त्रासही होऊ शकतात. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन तुम्ही त्याचा वापर करा. एखाद्या आर्युवेदिक दुकानांमध्ये तुम्हाला याचा अर्क आणि पावडर दोन्ही मिळू शकते. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न ( FAQ’s)

1. तुमच्या गुडघ्याचे दुखणे हे फारच गंभीर आहे हे कधी समजावे ?

गुडघ्याचे दुखणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही अशाप्रकारे गुडघेदुखी होऊ शकते. पण ती कालांतराने बरी होते. पण संधीवात आणि इतर काही शारिरीक त्रास तुम्हाला असतील आणि तुम्हाला गुडघेदुखी सातत्याने होत असेल तर तुम्ही अशी गुडघेदुखी गंभीर समजावी. कारण त्यावर योग्य वेळी इलाज केला तर तुम्हाला त्यापासून थोड्याफार प्रमाणात लवकर सुटका मिळेल.

2. गुडघेदुखीची कारणं कोणती ?

गुडघेदुखीची अनेक कारणं आहेत. वाढतं वय हे त्यापैकी एक कारणं असलं तरी देखील गुडघेदुखीसाठी एखादी दुखापत, सांध्यामधील वंगण कमी होणं ते घासले जाणं, हाडांचे आर्थरायटीस आणि संधीवात हे देखील कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रत्येकाची गुडघेदुखीची कारणं ही वेगळी असू शकतात.

3. चालणे हा गुडघेदुखीसाठी चांगले आहे का ?

गुडघेदुखी सुरु झाली की, चालण्यास अडथळा निर्माण होणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण अशा अवस्थेतही शरीराची हालचाल होणे फारच महत्वाचे असते. जर तुम्ही शारीरिक हालचाल करत नसाल तर गुडघेदुखी वाढण्याची आणि पायांना चालण्याची सवय कमी होऊ शकते. त्यामुळे गुडघेदुखी असणाऱ्यांना योग्य पद्धतीने चालण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही थोडे का होईना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्याचा सराव ठेवलात तर तुम्हाला चालताना अडथळा निर्माण होणार नाही.

गुडघेदुखीवर रामबाण उपाय जाणून घेतल्यानंतर गुडघेदुखीपासून अशी सुटका मिळवू शकता.

ADVERTISEMENT

पुढे वाचा – 

Kewra Benefits for Skin in Hindi

28 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT