पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Stomach Pain In Marathi)

stomach pain home remedy in marathi

बरेचदा आपल्याला पोटदुखी उद्भवत असते. त्याची कारणं अनेक असतात. पण पोटात दुखायला लागल्यानंतर सगळा उत्साह निघून जातो. पोटात दुखणे (stomach pain in marathi) हे अत्यंत कॉमन आहे. पोट दुखणे कारणेही अनेक आहेत. कधी कधी  पोटात अचानक कळ येते,  तर कधी पोटात डाव्या बाजूला दुखणे सुरू होते. पोटात का दुखते हे बरेचदा कळतही नाही. पण लगेच डॉक्टरांकडे जाण्याआधी पोट दुखणे घरगुती उपाय आपण करून पाहतो. पोटात दुखणे घरगुती उपायही (stomach pain home remedy in marathi) अनेक आहेत. पोट दुखणे उपाय करताना आपल्याला घरातल्या गोष्टींची आधी मदत घेतली जाते. बऱ्याचदा चुकीच्या खाण्यामुळे पोटाला त्रास होतो हे आपण अनुभवलं आहे. पण कधी कधी ही समस्या खूप मोठीही ठरते. पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहेत आणि ते काय आहेत तेच आपण या लेखातून पाहणार आहोत.हे घरगुती उपाय पोटातील दुखणे कमी करण्यासाठी काही प्रमाणात नक्कीच मदत करतात.  

Table of Contents

  पोटदुखीचे प्रकार (Types of Stomach Pain In Marathi)

  Freepik.com

  पोटदुखीचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला फक्त पोट दुखते इतकंच जाणवते. पण याचे कोणते प्रकार आहेत पाहूया. 

  सामान्य पोटदुखी - या प्रकारामध्ये पोटात दुखणे सुरू होते. कोणत्याही पदार्थांचा खाऊन त्रास झाल्याने अथवा अपचनामुळे हा पोटदुखीचा प्रकार उद्भवतो. हे पोटाच्या पूर्ण अथवा अर्ध्या भागाला त्रासदायक ठरते. पोटात डाव्या बाजूला दुखणे अथवा अचानक पोटातून कळ येणे अशी याची लक्षणं असतात. बऱ्याचदा काहीही न खाल्ल्यास हा त्रास कमी होतो. 

  स्थानीय पोटदुखीचा त्रास - सामान्य त्रासापेक्षा याचा त्रास थोडा जास्त असतो. पोटातील एका बाजूला कुठेतरी असह्य अशा कळा येणं सुरू होतं. अल्सर अथवा अपेंडिक्स याचे कारण  असू शकते. पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. 

  कळ येणे अथवा बद्धकोष्ठ - शौचाला नीट न झाल्यामुळे पोटात गॅस होऊ लागतो. त्यामुळे संपूर्ण दिवस पोटदुखी सुरू राहते. विशेषतः पोटात जंत झाले तर याचा अधिक त्रास होतो. 

  पोटातून अचानक कळ येणे - अचानक पोटात असह्य कळा येतात. अचानक कळा थांबतात. पित्तामुळे अथवा पोटात खडे निर्माण झाल्यास असा त्रास होतो. 

                                              वाचा - Symptoms And Remedies Of Hookworm In Marathi

  पोट का दुखते (Causes of Stomach Pain In Marathi)

  पोटदुखीची अनेक कारणे आहेत. वेगवेगळ्या कारणामुळे पोटदुखी सुरू होते. त्यापैकी काही कारणे आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. 

  • बद्धकोष्ठ
  • जंत होणे 
  • जळजळ होणे 
  • अल्सर
  • मुतखडा 
  • अपेंडिक्स 
  • फूड पॉईजनिंग 
  • आतड्यांना सूज येणे 
  • पोटाचा कॅन्सर 
  • पित्ताशयाला सूज येणे 
  • आतड्यांमध्ये रक्ताची कमतरता 
  • पॅनक्रियामध्ये सूज अथवा संक्रमण 
  • मासिक पाळी

  पोट दुखणे उपाय (Home Remedies for Stomach Pain In Marathi)

  पोटदुखीवर अनेक घरगुती उपाय आहे. त्याचा कसा उपयोग करायचा आणि कोणते साहित्य वापरायचे याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. यासाठीच जाणून घ्या पोट बिघडण्यावर घरगुती उपाय.

  आले (Ginger)

  Shutterstock

  साहित्य

  • एक चमचा बारीक कापलेले आले
  • एक चमचा चहा पावडर
  • दीड कप पाणी 
  • एक चमचा मध 
  • 5-6 थेंब लिंबाचा रस 

  बनविण्याची पद्धत 

  • पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून उकळवा 
  • त्यानंतर त्यामध्ये  चहा पावडर घालून पुन्हा उकळवा 
  • हे कपमध्ये  गाळून घ्या आणि त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करा
  • हे मिश्रण हळूहळू प्या. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे पिऊ शकता 

  फायदा 

  आल्याचा उपयोग पोटदुखीवरील घरगुती उपायांसाठी केला जातो. वास्तविक आल्यामध्ये अँटिअल्सर गुण असतात जे पोटदुखीला कारणीभूत ठरणाऱ्या अल्सरवर रोख लावण्यास मदत करतात. त्याशिवाय यामध्ये अँटिट्यूमर गुणही आढळतात. ज्याच्या मदतीने पोटात ट्यूमर निर्माण होत असेल तर त्यावर रोख लावली जाते आणि परिणमी पोटदुखीही थांबते. त्याशिवाय पोटात गोळा येत असेल, गॅस निर्माण होत असेल अथवा पोट साफ होण्याचा उपाय म्हणूनही यामुळे आराम मिळतो.

  हिंग (Hing)

  साहित्य

  • चिमूटभर हिंग 
  • एक ग्लास कोमट पाणी 
  • चिमूटभर काळे मीठ (सैंधव)

  बनविण्याची पद्धत 

  • पाणी  कोमट करून घ्या 
  • त्यामध्ये हिंग आणि सैंधव नीट मिक्स करून घ्या 
  • हळूहळू याचे सेवन करा आणि ही प्रक्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा करा 

  फायदा 

  पुरातन काळात भारतामध्ये पोटदुखीची समस्या असेल तर हिंगाचा उपयोग करण्यात येत होता. असं म्हणतात की हिंगामधील अँटिस्पास्मोडिक गुणांमुळे पोटातील दुखणे कमी होते. हा अत्यंत सोपा आणि सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. तसंच पोटात गॅस  होत असेल तर त्यापासूनही हिंग सुटका मिळवून देते.  

  बडिशेप (Fennel)

  Shutterstock

  साहित्य

  • एक चमचा वाटलेली बडिशेप
  • एक कप पाणी 
  • अर्धा चमचा मध 

  बनविण्याची पद्धत 

  • पोटदुखी घरगुती उपाय करण्यासाठी एक पाण्यामध्ये वाटलेली बडिशेप घालून साधारण 10 मिनिट्स पाणी उकळवा
  • थंड होऊ द्या आणि मग गाळून यामध्ये मध मिक्स करा
  • नंतर हे पाणी प्या. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा 

  फायदा 

  बऱ्याचदा पोटाची समस्या ही अनियमित खाण्यामुळे होते. अपचन हेच त्याचे कारण असते. अपचनाच्या या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी बडिशेपचा उपयोग होतो. पचनशक्ती उत्तम करण्यसाठी बडिशेपचा उपयोग करण्यात येतो. याशिवाय बडिशेपेमध्ये असणारे एनेथॉलमध्ये अँटीमायक्रोबाल गुण असतात जे इरिटेबल बाऊल सिंड्रोमला कारणीभूत ठरणाऱ्या  सूक्ष्म जीवाना नाहीसे करतात आणि पोटातील मांसपेशींनाही आराम देतात. ज्यामुळे पोटातील दुखणे कमी होते. 

  ओवा (Ajwain)

  साहित्य

  • अर्धा चमचा जिरे पावडर
  • अर्धा चमचा ओव्याची पावडर
  • पाव चमचा आले पावडर
  • एक ग्लास कोमट पाणी 

  बनविण्याची पद्धत 

  • जिरे, ओवा आणि आल्याची पावडर नीट मिक्स करून घ्या 
  • आता कोमट पाण्यात घालून याचे सेवन करा 
  • रात्री झोपण्यापूर्वी हे तुम्ही प्या. तुम्हाला पोटदुखीतून सुटका मिळेल

  फायदा 

  ओव्याचा उपयोग पोटदुखीसाठी करण्यात येतो.  एनसीबीआयद्वारे प्रकाशित एका शोधामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे ओव्यामध्ये अँटिस्पास्मोडिक गुण असतात जे पोटदुखीची समस्या सोडविण्यसाठी उपयोग ठरतात. तसंच यामध्ये कार्मिनेटिव्ह गुणही असतात जे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्याही दूर करतात. तसंच गॅस झाला असल्यास, यापासून सुटका मिळवून देते. इतकंच नाही तर गॅससह पोटातील अपचनाची समस्याही दूर करते. त्याशिवाय डायरिया, पाईल्सवर घरगुती उपाय म्हणूनही हे फायदेशीर आहे.

  जिरे (Cumin Seeds)

  Shutterstock

  साहित्य 

  • पाच ग्रॅम जिरे 

  बनविण्याची पद्धत 

  • तव्यावर जिरे हलके भाजून घ्या
  • भाजलेल्या जिऱ्याचे दिवसातून दोन ते तीन वेळा चावून सेवन करा 

  फायदा 

  जिऱ्याचा आपण जेवणातही उपयोग करतो. पण याचा केवळ इतकाच उपयोग नाही. पोटाच्या दुखण्यासाठी घरगुती उपाय म्हणूनही याचा उपयोग होतो. जिऱ्याचा अर्क पोटातील दुखणे, गाठ अथवा कळ येणे,  पोट फुगणे, बद्धकोष्ठ यासारख्या समस्यांवर उपयोगी ठरतो. जिऱ्याच्या गुणांमुळे पोटातील समस्या दूर निघून जातात. 

  अॅपल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

  साहित्य

  • एक चमचा अॅपल साईड व्हिनेगर
  • एक कप गरम पाणी 
  • अर्धा चमचा मध 

  बनविण्याची पद्धत 

  • एक कप गरम पाण्यात अॅपल साईड व्हिनेगर आणि मध मिक्स करून घ्या 
  • आता हे मिश्रण हळू हळू प्या 
  • जास्त त्रास होत असेल तर दोन वेळा प्या

  फायदा 

  ई - कोलाई, एस. ऑरियस आणि सी. अल्बिकन्स असे बॅक्टेरिया शरीराला नुकसान पोहचविण्याचे काम करतात. तसंच यामुळे युरिनरी ट्रॅक्ट  इन्फेक्शन अर्थात मूत्रमार्ग संक्रमणाचा धोकाही असतो अथवा पचनशी संबंधित समस्याही उद्धवतात. अशावेळी अॅपल साईड व्हिनेगरचा उपयोग होतो. यातील अँटीमायक्रोबायल गुण जीवाणूंचा नायनाट करून पोटाची समस्या दूर करते. 

  कॅमोमाईल टी (Chamomile Tea)

  Shutterstock

  साहित्य 

  • एक कॅमोमाईल टी बॅग
  • एक चमचा मध 

  बनविण्याची पद्धत 

  • एक कप पाणी उकळून घ्या त्यामध्ये कॅमोमाईल टी बॅग घाला
  • त्यात मध मिक्स करा आणि प्या
  • दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा 

  फायदा 

  कॅमोमाईल चहाचा उपयोग पोटदुखी नीट करण्यासाठी होतो. ही एक नैसर्गिक वनस्पती असून दीर्घ काळापर्यंत असणाऱ्या पोटाच्या समस्या  उदाहरणार्थ अपचन, खराब पोट, गॅस आणि अल्सर यावर अत्यंत उपयुक्त आहे. तसंच मांसपेशींना रिलॅक्स करण्याचे उत्तम काम हे करते. पोटाला आराम देण्याचे आणि गॅसपासून सुटका मिळविण्याचे काम कॅमोमाईल टी मुळे होते.

  तांदळाचे पाणी (Rice Water)

  साहित्य

  • एक कप तांदूळ 
  • चार कप पाणी 
  • एक चमचा मध 

  बनविण्याची पद्धत 

  • पातेल्यात पाणी उकळून घ्या
  • पाणी उकळल्यावर तांदूळ धुवा आणि पातेल्या ओता
  • भात शिजवा आणि मग त्याचे पाणी गाळून घ्या  आणि थंड होऊ  द्या
  • थंड पाण्यात मध मिक्स करा आणि मग प्या . दिवसातून दोन वेळा ही प्रक्रिया करा 

  फायदा 

  बऱ्याचदा पोट हे अपचानाने दुखते. त्यामुळे अशावेळी हलके जेवण जेवायला हवे.  अपचनाने पोट दुखत असेल तर त्यावर तांदळाचे पाणी हा उत्तम उपाय आहे. हे गॅस आणि अपचनाची समस्या पटकन नष्ट करते. तसंच लहान मुलांसाठीदेखील हा उत्तम उपाय आहे. 

  तुळस (Tulsi)

  Shutterstock

  साहित्य

  • सात ते आठ तुळशीची पाने 

  बनविण्याची पद्धत 

  • एक कप गरम पाण्यात तुळशीची पाने घालून वाटून घ्या 
  • त्याशिवाय तुम्ही तुळशीची पाने नुसती चाऊनही खाऊ शकता

  फायदा 

  तुळशीचे अत्यंत वरचे स्थान आहे. अल्सरमुळे होणारी पोटदुखी असेल तर तुळशी अत्यंत फायदेशीर ठरते.  तुळशीमध्ये अँटिअल्सर आणि अल्सरवर चांगला परिणाम करणारे गुण असतात. त्यामुळे तुळशी अल्सरवर सकारात्मक आणि प्रभावी ठरते. तसंच तुळशीमुळे कोणताही त्रास होत नाही.

  वॉर्म क्रॉम्प्रेस (Warm Compress)

  साहित्य 

  • वॉर्म कॉम्प्रेस 

  बनविण्याची पद्धत 

  • वॉर्म कम्प्रेसर पोटावर ठेवा 
  • साधारण वीस मिनिट्स तसंच राहू द्या
  • जास्त गरम वाटल्यास, काढून टाका 
  • पोटदुखी थांबेपर्यंत करत राहा 

  फायदा 

  वॉर्म कॉम्प्रेसचा वापर पोटदुखीतून सुटका करण्यासाठी होतो. वॉर्म कॉम्प्रेसर पोटातील मांसपेशींना आराम देण्याचे काम करते. तसंच पोटदुखीचे कारण बऱ्याचदा पोटात गोळा येणे असू शकते. हे दूर करण्यासाठी वॉर्म कॉम्प्रेसचा उपयोग होतो. 

  पोटदुखीदरम्यान काय खावे आणि टाळावे (What to Eat & Avoid During Stomach Pain)

  पोटदुखीदरम्यान अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये तुम्ही पेज अर्थात तांदळाचे पाणी, मऊ भात, केळे, ड्राय टोस्ट अथवा कमी मसाल्याचे पदार्थ खाऊ शकता. पोटात दुखत असेल तर ओवा चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. यासाठीच ओव्याचे फायदे अवश्य जाणून घ्या. त्यासोबतच पोट दुखत असल्यास आंबट फळं, फॅट असणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, टॉमेटोने तयार करण्यात आलेले पदार्थ, कॅफीन, अल्कोहोल, कार्बोनेटेड पेय पदार्थ, डेअरी उत्पादने खाणे शक्यतो टाळावे. अन्यथा यामुळे अधिक पोट फुगण्याचा त्रास होतो. पोटदुखी कोणत्याही कारणाने होत असली तरीही याकडे विशेष लक्ष द्यावे. अन्यथा पोटदुखी अधिक वाढण्याचा धोका असतो.

  पोटदुखी टाळण्यासाठी टिप्स (Tips to Avoid Stomach Pain)

  पोटदुखी टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्सही फॉलो करू शकता. पोटदुखी ही कॉमन समस्या आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी घेतली तर तुम्हाला यापासून दूर राहता येतं. 

  • भरपूर प्रमाणात पाणी प्या
  • थोड्या थोड्या वेळाने आणि प्रमाणात खा 
  • रोज व्यायाम करा
  • गॅस  तयार होईल असे खाणे शक्यतो टाळा 
  • संतुलित आणि फायबरयुक्त आहाराचे सेवन करा 
  • भरपूर भाज्या आणि फळं खा 
  • व्यवस्थित झोप  घ्या

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. रिकाम्या पोटी पोट का दुखते?

  रिकाम्या पोटी गॅस अधिक निर्माण होतो आणि त्यामुळे पोट फुगून दुखते. काहीवेळेला रिकाम्या पोटी दुखणे गंभीरही असू शकते. आतड्याच्या आत असणाऱ्या ब्लॉकेजमुळेही असे होते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

  2. हिवाळ्यात पोटादुखीचा उपाय कसा करावा ?

  हिवाळ्यात पोटदुखीचा त्रास जाणवायला लागला तर एखादे आले अथवा वॉर्म कॉम्प्रेसचा उपयोग करू शकता. यामुळे पोटाला आराम मिळण्यास मदत होते. पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

  3. मुलांसाठी पोटदुखीवर घरगुती काही उपचार आहेत का?

  तांदळाच्या पाण्याचा उपयोग मुलांच्या पोटदुखीवर करता येतो. याशिवाय ओवा अथवा जिऱ्याने पोट शेकल्यास, मुलांना बरे वाटते. यामुळे पोटात गॅस झाला असेल तर निघून जातो.

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक