सतत होत असेल पोटाची समस्या तर प्या हे ज्युस, होईल पोट साफ

सतत होत असेल पोटाची समस्या तर प्या हे ज्युस, होईल पोट साफ

कब्ज अर्थात बद्धकोष्ठ ही पचनसंस्थेशी निगडीत समस्या आहे.  कोणत्याही वयामध्ये ही समस्या निर्माण होऊ शकते. पण याचे  कारण  नक्की काय तर जेवण वेळेवर न खाणे आणि पोट साफ न होणे. यापासून सुटका मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच काही घरगुती उपयांनी ही समस्या पटकन बरी होऊ शकते. 

या रोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीचे पोट साफ होत नाही. तसंच आतड्यांमध्ये तरल पदार्थांचे पचन होण्यासाठी खूपच वेळ लागतो कारण त्यामध्ये थंड आणि कठोर मळ एकत्रित होण्यासाठी वेळ लागतो. ज्यामुळे बद्धकोष्ठ असणाऱ्या व्यक्तीला संडासला जाताना अधिक त्रास होतो. शौच स्वच्छ होत नाही आणि सतत त्रास होत राहातो. तसंच शौच सुके आणि अतिशय कमी प्रमाणात बाहेर येते. शौचाला जाताना पोटात खूप दुखते आणि खूपच त्रास होतो. साधारण व्यक्तीला दिवसातून दोन ते तीन वेळा शौचाला जाता येते. पण बद्धकोष्ठ असणाऱ्या व्यक्तींना बरेच दिवस शौचाला जायला त्रास होतो. सतत पोटात दुखत असल्याने अन्न खाण्याची इच्छाही होत नाही. कारण पोटातील अन्न बाहेरच पडत नसल्याने पोट सतत जड जड राहते. अनियमित जेवण, शिळं अन्न खाणे, मानसिक तणाव, अधिक तेलकट खाणे आणि आतड्यांची कमजोरी यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोटाची ही समस्या दूर करण्यसाठी तीन पदार्थ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.  याचा नक्की कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण या लेखातून पाहूया. यासाठी नैसर्गिक उपाय करून पोटाची ही समस्या दूर करू शकतो.  यासाठी तुम्ही घरच्या घरी एक ज्युस बनवा जे तुम्हाला लाभदायक ठरते. 

लिंबू

Shutterstock

लिंबामध्ये बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी अनेक पोषक तत्व आहेत. कोणालाही पोटाची समस्या असेल तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी एक लिंबू पाण्यामध्ये पिळून त्यामध्ये दोन चमचे साखर घालून मिक्स करा. हे पाणी प्या.  असे केल्याने तुमच्या बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू कमी होऊ लागते. लिंबू हे शरीरामध्ये पाचक रस बनविण्यासाठी मदत करते. तसंच लिंबू हे पचनक्रिया अधिक चांगली करण्यास मदत करते. लिंबामध्ये असणारे विटामिन सी हे अत्यंत फायदेशीर असते. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. ज्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास आणि त्वचा अधिक सुंदर होण्यासही मदत मिळते. 

त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon And Honey For Skin)

आले

Shutterstock

आले नेहमी आपल्या औषधीय गुणांसाठी ओळखले जाते. यामध्ये अनेक विटामिन्स असून आयर्न, कॅल्शियम, आयोडीन, क्लोरिन यासह अनेक पोषक तत्वदेखील आढळतात.  तसंच आल्यामध्ये एक शक्तिशाली अँटिव्हायरलदेखील आहे. यामुळे शरीरातील पचनशक्ती चांगली राहते आणि खाण्यानंतर याचा पचनशक्तीसाठी चांगला उपयोग होतो. पोटाची समस्या असेल अथवा अपचन झाले असेल तर हमखास आल्याचा उपयोग करण्यात येतो. आल्याचा ताज्या आणि सुकलेल्या दोन्ही स्वरूपात आपण उपयोग करून घेऊ शकतो. 

आलं टिकवून ठेवायचं असेल तर वापरा सोप्या युक्ती

सफरचंद

Shutturstock

रोज सफरचंद खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे सहसा कोणत्याही रोगाला जवळ येऊ देत नाही. रोज सफरचंद खाल्ल्याने हृदयरोग होत नाही. सरफरचंदाच्या सालीसकट सफरचंद खाल्ल्यास पोटाच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच जास्त एनर्जीही मिळते. सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाल्ल्याने पॅक्टिन लॅटिन अॅसिड बॅक्टेरिया पोटात विकसित होते आणि यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. 

या तिन्ही पदार्थांचे ज्युस बनवून तुम्ही प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत मिळते. हे ज्युस कसे बनवायचे आणि काय साहित्य लागते याची माहिती 

सालीसकट सफरचंद खाल्ल्याने होते वजन कमी, जाणून घ्या फायदे

साहित्य 

  • 2 चमचे ताजा लिंबाचा रस
  • अर्धा चमचा मीठ
  • एक चमचा आल्याचा रस 
  • अर्धा कप ताजा सफरचंदाचा रस 
  • अर्धा कप गरम पाणी 


बनविण्याची पद्धत 

  • एका भांड्यात पाणी गरम करून घ्या 
  • त्यामध्ये मीठ, आल्याचा रस, लिंबाचा रस आणि सफरचंदाचा रस मिक्स करून घ्या
  • हे ज्युस तुम्ही प्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक