फोटो काढून सोशल मीडियावर टाकायला सगळ्यांनाच आवडतं. या फोटोंमध्ये कसे दिसायला हवे या काही गोष्टीही आपल्या डोक्यात एकदम फिक्स असतात. फोटोमध्ये उंच दिसायला सगळ्यांना आवडतं.उंची कमी असली तरी देखील फोटोमध्ये सुंदर आणि उंच दिसण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स कामी येतात. यासाठी कपडे किंवा ठराविक पद्धतीची हेअरस्टाईल असा काही हट्ट नसतो. तर आहे त्या कपड्यांमध्ये आणि तुमच्या आहे त्या स्टाईलमध्ये तुम्हाला तुमचे उंच असे फोटो काढता येतात. तुम्हालाही तुमच्या फोटोमध्ये दिसायचे असेल उंच तर या पोझमध्ये काढा फोटो
कोणताही फोटो लो अँगलने काढला की, तुमचे पाय हे लांबसडक दिसतात. पाय लांब दिसले की, अर्थात तुम्ही अशा फोटोंमध्ये साहजिकच उंच दिसता. लो अँगलचे फोटो तुम्हाला अगदी बिकिनीपासून ते तुमच्या लेहंग्यापर्यंत कोणत्याही कपड्यात काढता येतात.
उदा. हा लो अँगलने काढलेला फोटो तुम्हाला दिसताना पायांकडील भाग हा जास्त उंच आणि लांब दाखवत आहे. इतकेच नाही. तर तुम्ही या फोटोमध्ये साहजिकच बारीकसुद्धा दिसता. त्यामुळे लो अँगलने एखादा फोटो काढायला काहीच हरकत नाही .
आता जर तुम्हाला बसून फोटो काढायचा असेल पण तुमच्या शरीराचा गोळा दिसू नये असे तुम्हाला बसतानाही अगदी ताठ आणि चांगल्या पोझमध्ये बसता यायला हवे. क्रॉस लेग सीटिंग ही बसण्याची अशी आदर्श पद्धत आहे त्यामुळे तुम्ही उंच दिसता. असे करताना तुमचा खालचा पाय हा थोडा उंचावर ठेवा आणि वरचा पाय थोडा हवेवर ठेवा. त्यामुळे तुमचे पाय उंच दिसतात किंवा तुम्ही दोन हात थोडे बाजूला ठेवून पुढे रेलून पायावर पाय ठेवताना ते दोन्ही पुढच्या दिशेला येतील असे बघा. म्हणजे तुम्ही अशा पोझमध्ये नक्कीच उंच दिसाल.
मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट (Best Pre-Wedding Shoot Locations In Mumbai In Marathi)
सरळ फोटो काढताना ही उंच दिसायचे असेल तर पाय अगदी स्तब्ध किंवा सावधान ठेवून चालत नाही. असे फोटो काढताना पायामध्ये ग्रेस असणे फारच गरजेचे असते. पायांमध्ये अशा प्रकारे गॅप ठेवताना तुम्ही थोडेसे अंतर ठेवा एक पाय असा ठेवा की, त्यामुळे तुम्ही उंच दिसायला हवे. पायांमध्ये थोडे अंतर ठेवले की, तुमचे फोटो छान खुलून येतात.
आता फोटो काढताना या गोष्टी लक्षात ठेवा.