कपाळावर वाढतंय टक्कल? या उपायाने झाकता येईल टक्कल

कपाळावर वाढतंय टक्कल? या उपायाने झाकता येईल टक्कल

केसांची हेअरलाईन जर जास्त मागे असेल तर असे कपाळ टक्कल पडल्यासारखे दिसते. काहींची हेअरलाईन ही कालांतराने मागे जाते आणि टक्कल दिसायला लागते. पुरुषांना टक्कल पडले तर फारसे वेगळे वाटत नाही. पण महिलांच्या कपाळावरील टक्कल वाढत गेले तर ते मुळीच चांगले दिसत नाही. जर कोणाचं कपाळ मोठं असेल तर त्या व्यक्तीकडे आपले साहजिकच लक्ष जाते. केसांच्या बाबतीत जर तुम्हीही काही अंशी दुर्लक्ष करत असाल आणि तुमचेही कपाळावरील केस कमी होऊ लागले असतील तर केसांची काळजी घेत केसांचे टक्कल या सोप्या पद्धतीने झाकण्याचा प्रयत्न करायला हवा.

केसांचा वॉल्युम वाढवतील या हेअर ट्रिटमेंट्स, जाणून घ्या या ट्रिटमेंट्स

केसांची घ्या काळजी

Instagram

काही जण केसांची खूप काळजी घेतात. तर काही जणांसाठी मात्र केसांची काळजी घेणे हे डोक्याला ताप घेण्याप्रमाणे असते. काही जणांना जन्मत:च  इतके सुंदर केस मिळतात की, केस चांगले राहतील असा विचार करुन केसांची काळजी घेण्याचा ते मुळीच विचार करत नाही. केसांची योग्य काळजी राखली नाही तर केसांचे सतत गळणे तसेच सुरु राहते. केसगळती ही सर्वाधिक कपाळाच्या भागावर पटकन दिसून येते. केसांचे हे असे गळणे दुर्लक्षित केले की, केसांचे टक्कल पडणे अत्यंत स्वाभाविक आहे.  केसांची काळजी घेताना आहारात सोयाबीन, अंडी, दूध आणि योग्य प्रथिनांचा समावेश करा. केस कोणत्याही वयात येऊ शकतात.

केस बांधण्याची पद्धत

केस बांधण्याची पद्धत ही केसांची हेअरलाईन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरते. काही जणांना केस घट्ट बांधण्याची सवय असते. ते केस इतके घट्ट बांधतात की, त्यांच्या कपाळावरही ताण आलेला असतो. सतत केस घट्ट बांधल्यामुळए केस तुटतात. केस गळणे आणि केस तुटणे यामध्ये फरक आहे. केस तुटत राहिले तर त्यांची मूळ कमजोर होत जातात. त्यामुळे त्याठिकाणीहून केस येणे कालांतराने बंद होऊ लागते. त्यामुळे जर तुम्ही सतत केस घट्ट बांधत असाल तर केस बांधण्याची ही सवय सोडून द्या. जर तुमचे टक्कल दिसत असेल तर भांग बदलून केस पुढे घेऊन ते सेट करा.

मोहरीचा हेअरमास्क वापरून केस होतील अधिक घनदाट

केस विंचरण्याची पद्धत

केस विंचरणे केसांसाठी फारच गरजेचे आहे. कारण त्यामुळे केसांचा रक्तपुरवठा वाढतो. केस विंचरताना काही जण कंगव्याचा इतरा जोरदार वापर करतात की, त्यामुळे कपाळावरील केस कमजोर होऊ लागतात. त्यामुळे केस विंचरताना काळजी घ्या. केस विंचरताना हात अगदी हळुवार फिरवा. जितकी काळजी तुम्ही तुमच्या त्वचेची करता तितका हळुवारपणा तुम्हाला तुमच्या केसांसाठीही वापरणे फारच गरजेचे असते. 


केसांचे टक्कल लपवण्याची घाई करण्यापेक्षा केसांची योग्य काळजी घेतली तर केसांना वयाच्याआधीच टक्कल पडणार नाही. 

केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग