ADVERTISEMENT
home / Weight Loss
वजन वाढल्यास करा सोप्या पद्धतीने करा शरीर डिटॉक्स

वजन वाढल्यास करा सोप्या पद्धतीने करा शरीर डिटॉक्स

बरेचदा आपलं वजन पटापट वाढतं. विशेषतः सणासुदीच्या दिवसांमध्ये. घरात सतत बनणारे चविष्ट आणि गोड पदार्थ ज्यामुळे नक्कीच जिभेवर ताबा राहत नाही. सणासुदीच्या दिवसात कसलं डाएट करायचं असाही विचार येतो आणि करायचं असेल तर घरात कोणी डाएट करू देत नाही. मग काही दिवसातच जाणवायला लागतं वजन वाढलं आहे. मग अशावेळी नक्की काय करायचं असाही प्रश्न पडतो. कारण तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाऊन वजन तर पटकन वाढतं पण मग वजन कमी करताना मात्र दमायला होतं. पण अशा काही सोप्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता आणि शरीर डिटॉक्स करू शकता. अशाच काही सोप्या आणि पटकन होणाऱ्या टिप्स आम्ही या लेखाद्वारे खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हीही याचा वापर करून शरीर डिटॉक्स करू शकता आणि वजन कमी करण्यास याची मदत मिळते.

दिवसाची सुरूवात लिंबू पाण्याने

Shutterstock

लिंबू हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी उत्तम आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण नुसते माहीत असून चालत नाही तर त्याचा उपयोगही करावा लागतो. तुम्ही रोज दिवसाची सुरूवात ही लिंबू पाण्याने करा. एका ग्लासात कोमट   पाणी घ्या त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या. साखरेचा वापर अजिबात करू नका. लिंबू पाण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि त्याशिवाय नियमित तुम्ही याचे सेवन केले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी याचा योग्य उपयोग करता येतो.  तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अगदी अर्धा चमचा मधही मिक्स करू शकता.  

ADVERTISEMENT

प्रोटीनचे करा सेवन

Shutterstock

तुमचे वजन वाढले असेल तर तुम्ही प्रोटीनचे सेवन करायला हवे. आपल्या  डाएटमध्ये  अंडे, चिकन, कडधान्ये, डाळी आणि फळांचा अधिक समावेश करून घेतल्यास तुम्हाला फायदा मिळेल. कडधान्ये आणि डाळी खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त  भूक लागत नाही. विशेषतः कडधान्यामधून शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि पोटही भरलेले राहते. त्यामुळे याचा आहारामध्ये अधिक वापर करा. यामुळे वजन वाढण्यावर नियंत्रण येते आणि शरीरही डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

ADVERTISEMENT

फायबर आहे नैसर्गिक डिटॉक्सिफाईंग

Shutterstock

फायबर हे अत्यंत नैसर्गिक डिटॉक्सिफाईंंग एजंट आहे. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये अधिकाधिक फायबरचा वापर करून घ्या. विशेषतः काकडी, गाजर, बीट, सलाड, कडधान्ये आणि हिरव्या भाज्या या जास्त प्रमाणात खा. त्यामुळे शरीराला फायबर मिळून पोट रिकामं राहात नाही. सलाड आणि भाज्यांमुळे पोट भरलेले राहून भूक लागत नाही आणि आपोआपच वजन वाढण्यावर नियंत्रण येते. तसंच एकाच वेळी सगळं खाऊ नका. तर दिवसातून साधारण चार पाच वेळा थोडं थोडं खा. जेणेकरून ओव्हरइटिंगचा त्रास होणार नाही.

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

ADVERTISEMENT

भरपूर पाणी प्या

Shutterstock

फेस्टिव्हल आणि पार्टी असली की अनहेल्दी खाणे खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे त्यानंतर  शरीर डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी  पाणी हादेखील उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दिवसभरात किमान 8-10 पाणी शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरामध्ये जमा झालेले सगळे विषारी तत्व बाहेर येण्यासाठी आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. पचनतंत्रावजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स
ची प्रक्रिया यामुळे अधिक चांगली होते आणि झोपही चांगली येते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका राहात नाही. म्हणूनच तुम्ही याचाही  उपयोग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करू शकता.  

उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार

ADVERTISEMENT

व्यवस्थित झोप घ्या

Shutterstock

सणासुदीला अथवा कार्यक्रमांना आपण कामांमुळे आणि धावपळीमुळे थकून जातो.  झोपही पूर्ण झालेली नसते. त्यामुळे हे सर्व संपल्यावर सर्वात पहिले थकवा घालविण्यासाठी तुम्ही तुमची झोप  पूर्ण करायला हवी. रात्री झोपण्यापूर्वी रोज एक ग्लास दूध त्यामध्ये दालचिनी पावडर आणि आल्याची पावडर मिक्स करून उकळून प्या. त्यामध्ये हवा तर थोडासा गूळही तुम्ही मिक्स करू शकता. यामुळे चांगली झोप लागते आणि शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. तसंच झोप अपूर्ण असेल तर वजन वाढू शकते. त्यामुळे झोप पूर्ण करण्याची गरज आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT